त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो
ग्रेस
काळे सर तुमच्याकडून वर्गात शिकता आले नाही. पण कोल्हापुरात झालेल्या परिषदेत (conference) तीन दिवस तुमच्या बरोबर राहायला मिळाले आणि खूप काही शिकायला मिळाले.
कृष्णाची होळी हे अनेक गीतातून आपण पाहिली असेल. पण महादेवांची होळी कशी असेल?
खेले मसाने में होरी दिगम्बर
भुत पिसाच बटोरी दिगंबर खेले मसाने में होरी||
लखि सूंदर फागुनी झता के,
मन से रंग गुलाल हटा के,
चिता बसम की झोरी दिगंबर खेले मसाने में होरी||
नाचत गावत डमरू धारी,
छोडत सर पे गर्ल पिचकारी,
बीते प्रेत थपोरी दिगंबर खेले मसाने में होरी||
भुत नाथ की मंगल होरी,
देख सिहाये ब्रिज की छोरी,
धन धन नाथ अगोहरी, दिगंबर खेले मसाने में होरी||
गोप न गोपी श्याम न राधा,
ना कोई रोक न कोहनू वाधा
न साजन न गोरी, दिगंबर खेले मसाने में होरी,
तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मराठी भाषा दीनाच्या शुभेच्छा दिल्या असतील, त्यांना सांगा
दीन नाही दिन. 'दीन'मुळेच भाषा दीन झाली आहे व त्यासाठी भाषा दिन साजरा करावा लागतो.
हा "मराठी भाषा गौरव दिन" आहे.
Richard Jewell नावावरून या चित्रपटात बघण्यासारखा असेल का? असा प्रश्न मला पडला होता. पण तो चुकीचा होता हे संपूर्ण चित्रपट बघितल्यावर लक्षात आले.
चित्रपटाचा नायक(?) रिचर्ड(Richard Jewell) हा एका छोट्या विधी संस्थेत कारकून म्हणून काम करत असतो. वॅटसन (Watson Bryant) या वकिलाबरोबर त्यांची चांगली मैत्री होती. संरक्षण दलात काम करण्यासाठी तो नोकरी सोडतो.
थोडे दिवस पोलिसात काम करतो पण त्याला काढून टाकण्यात येत. त्यानंतर काॅलेजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पण तिथून सुध्दा त्याला काढण्यात येत. कारण एकच असते, अती नियम पाळणे व पाळायला लावणे.
यानंतर तो सेंटेनियल बागेत (Centennial Park) सुरक्षा रक्षक म्हणून काम सुरू करतो. पण एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्याला एक बेवारशी पिशवी सापडते. नीट पाहिल्यानंतर त्यात बाॅम्ब असल्याच निष्पन्न होत. गर्दी बाजूला केली जाते. त्यानंतर बाॅम्बचा स्फोट होतो. त्यामुळे होणारी प्रचंड जिवित हानी कमी होते.
या सर्व प्रकरणात रिचर्डला नायक ठरवून अनेक ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात. फेबीआयला (FBI) वाटत बाॅम्ब ठेवायचे व दाखवायचे काम रिचर्डनेच केले आहे. आतापर्यंत नायक असणारा रिचर्ड प्रसारमाध्यम त्याला खलनायक म्हणून दाखवायला सुरुवात करतात.
या वेळी रिचर्डचा मित्र व वकील वॅटसन मदतीसाठी धावून येतो. रिचर्डला अटक होते का? तो ही लढाई कशी लढतो? हे सर्व चित्रपटातच पाहणे उत्तम होईल.
चित्रपटात रिचर्डचे काम करणारा पॉल वॉल्टर हॉसर यांनी सुरेख अभिनय केला आहे. या कामाची तुलना मला मराठीतील दादांशी करावीशी वाटते. चित्रपटाच्या कथानकाला कुठे ही तिखट मीठ लावले नाही. प्रसारमाध्यम, समाज या सर्वांवर जळजळीत प्रहार करताना कुठेही चित्रपट स्वातंत्र्य घेतलेले नाही.
क्लिंट ईस्टवूड (Clint Eastwood) यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. क्लिंट ईस्टवूड हे म्हणजे नव्वदीत असणारे भीष्मपितामहच आहेत. यांनी दिग्दर्शित केलेले जुन्या चित्रपटापेक्षा मला सध्याचे चित्रपट जास्त आवडतात. सुली (Sully), अमेरिकन स्नायपर (American Sniper) ही काही नावे. अतिशय परिपक्व व साधेपणाने केलेली मांडणी हे यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य.
नक्कीच बघण्यासारखा चित्रपट
Trial by Fire (2018)
कॅमेराॅनाला {Cameron} (तापट डोक्याचा माणूस) त्यांच्या घराला लागलेल्या आगीमुळे जाग येते. प्रयत्न करूनसुध्दा त्याला आपल्या तीन मुलांचा प्राण वाचवता येत नाही.
प्रथम निकषात जाणवत की घरात पेट्रोल टाकलेल होत तसेच फ्रीज मुद्दामून दाराजवळ ठेवलेला होता. कॅमेराॅनाला संशयावरून अटक करण्यात येते.
कोर्ट केस दरम्यान त्याचा सह कैदी सांगतो, कॅमेराॅनाने त्याला सांगितले होते की त्यानेच आग लावली. कॅमेराॅनाच्या बायकोच्या साक्षीतील काही वेचक भाग व सह कैद्याची साक्ष यावरून कॅमेराॅनाला मृत्युदंड दिला जातो.
कॅमेराॅनाने आपल्याच पोटच्या पोरांचा बळी दिला आहे अस वाटल्यामुळे त्यांच्याबद्दल कुणाचेच मत चांगले नसते.
मृत्यूदंडची वाट पाहत असताना त्याचे व पोलिस तसेच इतर कैद्याबरोबर खटके उडतात. त्यामुळे त्याला एकांताची शिक्षा दिली जाते. त्या वेळेस तो आपला भूतकाळ आठवत बसतो. शिक्षेतून वाचण्याकरिता तो अनेक खटाटोपही करतो पण व्यर्थ.
त्याच वेळेस त्यांची ओळख होते, ग्रिलबर्ट {Gilbert} या स्त्री लेखिकेशी. ती घरच्या विरोधाला पत्करून कॅमेराॅनाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करते. अनेक साक्षीदारांना भेटून ती सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यात तिला लक्षात येते कॅमेराॅन निरपराध आहे.
मृत्युदंडासाठी थोडेच दिवस राहिले असताना ग्रिलबर्टचा अपघात होतो.
ती अपघातातून वाचते का? ती निरपराध कॅमेराॅनाला वाचवू शकते का? हे चित्रपटातच पहावे.
नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट. चित्रपटातील संवाद फारच सुरेख आहेत. अभिनय मस्त.
मॅटरसनच्या ("Bat" Masterson) एका वाक्याचा फारच सुंदर उपयोग या चित्रपटात केला आहे. "We all get the same amount of ice. The rich get it in the summer. The poor get it in the winter.” — Bat Masterson
© कल्याण जोशी
आर्.के./RKay
२०१४ मधील चार्ली (Charlie McDowell) दिग्द
लेखक, दिग्दर्शक व अभिनेता आर्.के. एक चित्रपट बनवत असतो. आर्.के. स्वतःच्याच चित्रपटात मेहबूब (Mahboob) ही नटाची भूमिका साकारत असतो. चित्रीकरण पूर्ण होत, पण चित्रपटाचा शेवट (हिरो मरण्याचा) बर्याच जणांना आवडत नाही. चित्रपटाच संकलन (editing) चालू असताना चित्रफितीतून मेहबूब गायब होतो.
गायब झालेला मेहबूब खर्या जगात येतो. त्याला समजावून चित्रपटात परत पाठवण्याच्या तयारीत असतानाच चित्रपटाचा खलनायकसुध्दा खर्या जगात येतो.
आर्.के. मेहबूबला चित्रपटात पाठवू शकतो का नाही हे चित्रपटातच पहावे.
अतिशय सुंदर अभिनय, संवाद व दिग्दर्शन. चित्रपटाची सुरुवात चुकवू नका.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: हिंदी
नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट
गेले तीन आठवडे मी #PIFF2021 मध्ये जे मी चित्रपट पाहिले त्याबद्दल लिहले. हे चित्रपट म्हणजे वेगवेगळी फुले. त्यांना एकत्र गुंफण्याचा हा प्रयत्न. त्यामध्ये कुणाला गुलाब आवडेल तर कुणाला चाफा.
परत एकदा धन्यवाद PIFF अशी फुली वेचून रसिकांसमोर ठेवल्याबद्दल. विशाल शिंदे (Vishal Shinde) तुझेसुध्दा मनःपूर्वक आभार.
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
इति PIFF2021 लेखनसीमा
ईलीरालारे अलगिरे होगालारे (illiralaare allige hOgalaare)/Neither Can I Stay Here nor Journey Beyond.
चित्रपटात दोन कथा आहेत.
कथा-१ (१९६०च्या दशकातील) किरवंताच्या घरी काम करणारी एक स्त्री, तिचा नावाडी नवरा व नागा नावाचा त्यांचा मुलगा. अतिशय शांत असे हे खेडे, पण शिक्षण व पैसे कमवण्यासाठी नागा खेड्यातून पळण्याचा प्रयत्न करतो. तो त्यात यशस्वी होतो का? तो शिक्षण घेऊ शकतो का? हे चित्रपटातच पहावे.
कथा-२ (२०१० च्या दशकातील) बंगलोरमध्ये उच्चशिक्षित परिवारात राहणारा पुंडलिक (पुंडा) नावाचा मुलगा. घरातील मालकाने आपल्या लहान मुलीला संभाळायला ठेवलेला. तो त्याच घराचा एक अविभाज्य भाग बनून गेलेला असतो. त्यांचा परिवार खेडेगावात राहणारा. पुंडाला खेडेगावात परत जायचे असते.
दोन भिन्न कथा, पण एक सामायिक धागा असलेल्या.
या दोन कथा एकमेकांत कशा गुंफल्या आहेत हे चित्रपटातच पहावे.
सर्वाचे अभिनय उत्तम, छान दिग्दर्शन व सुरेख चित्रीकरण असणारा हा चित्रपट. चित्रपटात काही घागे अधांतरी सोडले आहेत असे वाटते.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: कन्नड
खरं तर कथानक नसलेला पण तुम्हाला दोन तास खेळवून ठेवणारा व नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट
पिंकी इली (Pinki Elli?) /Where is Pinki?
बिंदू व गिरीश हे एक जोडपे व बिंदूनी बाळाला(पिंकी) सांभाळायला ठेवलेली सन्नम्मा (Sannamma) आया. सन्नम्मा बाळ संभाळण्याच्या नावाखाली पिंकीचा वापर भीक मागण्यासाठी करत असते. बिंदू एके दिवशी लवकर घरी येते त्या वेळेस पिंकी व सन्नम्मा घरी नसतात. त्याच दिवशी सन्नम्माकडून पिंकी हरवली जाते.
पोलिसात तक्रार करण्याच्या वेळी प्रेक्षकांना समजत की गिरीश हा बिंदूचा मित्र असतो तर खरे वडील मंजूनाथ हे आहेत. पिंकीचा हरवल्यापासूनचा प्रवास हा चित्रपटातच पहाण्यासारखा आहे.
पिंकी सापडते का? ती सापडली तरी ती कोणाकडे सोपवण्यात येते? बिंदू ही निष्काळजीपणाने वागते असे मंजूनाथला वाटते तर मंजूनाथ पिंकीला भेटायला एकदा ही आलेला नसतो. त्यामुळे तिला कोणाकडे सोपवण्यात येते या प्रश्नाचे उत्तर चित्रपटच देईल.
वेगळा विषय व त्या विषयाला दिलेली अनपेक्षित कलाटणी हे लेखक व दिग्दर्शक पृथ्वी(Prithvi Konanur) यांना छान जमले आहे. जवळपास सर्वच कलाकारांचे अभिनय छान आहेत.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: कन्नड
नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट
सिस्टर! दि समर वी फाउंड आवर सुपरपॉवर/Tottori! Sommeren vi var alene
वेगा (Vega) नऊ वर्षाची मुलगी व तिची पाच वर्षाची लहान बहीण बिल्ली (Billie) आपल्या वडिलांबरोबर नॉर्वेजियन वूड्स येथे सफरीसाठी जातात. सफरीसाठी निवडलेले ठिकाण खूपच निर्जन असते. या तिघांशिवाय कोणीच नसलेले हे ठिकाण.
दोघीजणी सराफीचा आनंद मस्त लुटत असतात. पण अचानक त्यांचे वडील डोंगराच्या कपारीत अडकून पडतात व त्याचा पाय दुखावतो.
वडिलांना कपारीतून काढणे दोघींना शक्य नसल्यामुळे त्यांना मदतीसाठी परत सफरीच्या सुरुवातीच्या ठिकाणी जावे लागणार असते. जंगलातून जाताना त्या रस्ता चुकतात.
त्या परत जातात का? वडिलांची सुटका करू शकतात का? हे चित्रपटातच पहावे.
लेखकाने घेतलेल्या चित्रपट स्वातंत्र्याकडे सहज दुर्लक्ष करत हा ७७ मिनिटांचा अतिशय हलकाफुलका चित्रपट नक्कीच बघू शकतो. दोन्ही लहान मुलीचा अभिनय फारच सुरेख आहे.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: नॉर्वेजियन
नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट
मध/Tēṉ/Thaen
निलगिरी (कुरिंजिपाड़ी) पर्वतावर राहणारा वेलू हा मध गोळा करण्याच काम करणारा, त्यांची गाठ शेजारील खेड्यात राहणारी पुनगुडीशी (Poongodi) होते व ते लग्न करण्याचे ठरवतात. निसर्ग देवता या लग्नाला मान्यता देत नाही (निसर्ग देवतेला लावलेला कौल चित्रपटातच पहावा). तरी ही ते लग्न करतात. यथावकाश त्यांना एक मुकी मुलगी होते.
काही वर्षानंतर पुनगुडीच्या पोटात दुखायला लागते. डोंगराखाली असणार्या शहरात नेल्यावर त्यांना कळत तिला असाध्य रोग झाला आहे.
वेलूकडे भारतीय असण्याचा कोणताच पुरावा नसतो. तिच्या उपचारासाठी वेलूला आधारकार्ड, रेशन कार्ड काढावे लागते. त्यासाठी होणारा त्रास चित्रपटात फारच चांगला रंगवला आहे. तथाकथित समाजसेवक, सरकारी अधिकारी, डॉक्टर यांचे छान चित्रण चित्रपटात पहावयास मिळते.
हा आजार तिला का होतो? या सर्वानंतर ती बरी होती का? हे चित्रपटातच पहावे.
संवाद व अभिनय छान आहे. चित्रीकरण अतिशय सुरेख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट पहाताना तुम्ही त्या जंगलात गेल्याचा भास होतो.
वेलूच्या डोंगरावरील घरात लाईट व लाईटच मीटर तांत्रिकदृष्ट्या चुकीचे वाटतात.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. sonyliv वर बहुधा आहे.
भाषा: तामिळ
नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट
अरण्येर दिन रात्री /Days and Nights in the Forest
आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून जंगलात चार दिवस फिरायला येतात.
सर्वमान्य नियमांना झुगारुन त्यांना हे चार दिवस घालवायचे असतात. त्यांची सुरुवात फॉरेस्ट हाऊस मध्ये विनापरवानगी राहण्यापासून होते.
त्याच वेळेस तेथेच अपर्णा व जया (अपर्णाची विधवा भावजय) ह्यासुध्दा जंगलात राहायला आलेल्या असतात.
सहा समवयस्क व्यक्तीमध्ये परस्पर संवाद व वेगवेगळ्या घटना ह्या चित्रपटातच पाहणे गरजेचे आहे. गावातील जत्रेच्या वेळेस ज्याच्या त्याच्या आवडीनावडीनुसार जत्रेचा आनंद घेतात.
या काळात चार पैकी तीन मित्र एकएक गोष्ट हरवतात (अस मला वाटलं) ती कोणती ते चित्रपटातच पाहावी.
१९७० च्या आसपासचा चित्रपटाचा विषय आज सुद्धा कालबाह्य होत नाही हे त्याचं वैशिष्ट्य. सत्यजित रे यांचे चित्रपट नुसते चित्रपट म्हणून बघता येत नाहीत.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. Youtube वर उपलब्ध आहे.
भाषा: बंगाली
एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट.
रंगमंचावरील व घरातील कलाकार यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. तसेच संयमाच्या अभावाने कलाकाराचे काय होऊ शकते, हेच सांगणारा मकरंद अनासपुरे दिग्दर्शित चित्रपट म्हणजे काळोखाच्या पारंब्या.
अलिफ एक छोटा खेड्यात राहणारा व सर्वांची मदत करून आपले पोट भरणारा तरुण पोरगा. त्याच गावात रहिमचाचा हा झाडपाल्याचे औषध देणारा व डफ वाजवणारा कलाकार.
तावून सुलाखून रहिमचाचा अलिफला डफ शिकण्यासाठी आपला शिष्य बनवतात.
त्याच वेळेस रहिमचाचाची भौतिक सुखाची आवड असणारी तिसरी बायको गावात येते.
भौतिक सुख की कलेची सेवा यामध्ये अलिफला निवड करण्याची वेळ येते. त्या वेळेस तो कशाची निवड करतो हे चित्रपटात पाहणे उचित होईल.
(माझे वैयक्तिक मत कलाकारांनी दोन्ही मिळवावे)
डफ ऐकून फरिश्ते (देवदूत) येतात त्या वेळेचे दृश्य परिणाम (VFX) जरा चांगले हवे होते. डफ शिकण्याची सुरुवात व पारंगतता यामध्ये फारच कमी वेळ दाखवला आहे.
सिद्धहस्त कलाकार मकरंद अनासपुरे एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आहेत. वैभव काळे अलिफची भूमिका जगले आहेत. या दोन्ही कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: मराठी
एकदा पाहण्यासारखा चित्रपट.
जून/June
निल औरंगाबादवरून पुण्याला शिकायला आलेला मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. काही कारणामुळे (हे चित्रपटातच पहावे) तो नापास होऊन उद्विग्न अवस्थेत औरंगाबादला परत येतो. त्याच वेळेस नेहा (निलच्या शेजारी राहणार्या अभिदादाची बायको) उद्विग्न अवस्थेत त्यांच्याच शेजारी राहायला येते. निल पुण्यातील घटना ज्या आई-वडीलांशी बोलू शकत नसतो त्या तो मनमोकळेपणाने नेहाशी बोलू शकतो.
ते एकमेकांच्या जखमेवर फुंकर मारून घाव भरण्याचा (heal) प्रयत्न करतात. यामध्ये त्यांना यश येत की अपयश हे चित्रपटातच पहावे.
सर्वांचे अभिनय सुरेख आहेत. विषयाची खोली व चित्रपटांची लांबी (९४ मिनिटे) ही तारेवरची कसरत फारच छान जमली आहे.
OTT platform मुळे कारण नसताना अश्लील दृश्य घालण्याचा मोह टाळता आला असता तर फार बरं झाल असत. काही दृश्य नक्कीच कथा पुढे घेऊन जातात पण काही दृश्य नक्कीच टाळता आली असती.
चित्रपटाचे नाव खरच गुढ आहे. मला वाटत, उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाण्यासाठी एका रात्रीचा पाऊस पुरेसा असतो तो जून मध्ये येतो! यापेक्षा वेगळा व जास्त संयुक्तिक नावाचा अर्थ असू शकतो.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. Planet Marathi वर उपलब्ध आहे.
भाषा: मराठी
एकदा पाहण्यासारखा चित्रपट.
Another Round/Druk
त्यातील एक मित्र सांगतो की विशिष्ट प्रमाणात दारूचे (मद्य) सेवन केले तर आपल्या सर्जनशीलतेत लक्षणीय वाढ होते.
सर्वजण हा प्रयोग करायला तयार होतात. मद्याचे सेवन ०.०५% ठेवून प्रयोग सुरू होतो. मार्टिन हा इतिहासाचा शिक्षक चर्चिल, रुझवेल्ट व हिटलर यांच्यातील फरक इतका छान सांगतो तो चित्रपटातच बघणे गरजेचे आहे. घराच्या बाजूवरही सकारात्मक परिणाम दिसायला लागतात.
हळू हळू मद्याचे प्रमाण वाढवले जाते. थोडेच दिवसात ते प्रमाण फारच वाढते त्यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम दिसायला लागतात. पुढे काय होत हे चित्रपटातच बघावे.
संवाद ऐकण्यासारखे (मी वाचले) आहेत. अभिनय व पार्श्वसंगीत छान आहे. शेवटच्या दृश्यात मार्टिन यांनी केलेला डान्स अप्रतिम आहे. तो डान्स करण्याची फरमाइश चित्रपटात सुरुवातीपासून होत असते. चांगला दिग्दर्शक असे हुकमाचे एक्के एकदाच वापरतो. दिग्दर्शक थॉमस (Thomas Vinterberg) यांची छाप प्रत्येक दृश्यात बघायला मिळते.
नक्की पाहण्यासारखा चित्रपट.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.
भाषा: दानिश
गोदाकाठ /Godakaath
सध्या मराठीत कार्यरत असणाऱ्या गुणी दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे.
प्रीती (मृण्मयी गोडबोले, Mrinmayee Godbole) ही एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्यावर असते, सतत वरच्या हुद्यावर जाण्याच्या मोहात ती अनेक बरे वाईट निर्णय घेते. वेगवेगळी व्यसने व जीवनाबद्दल बेफाम असणारी गर्भवती (प्रेंगनंट) राहते. तिला होणाऱ्या बाळाच्या वडिलांबद्दल तिला खात्रीने सांगता येत नसत. त्यातच कामावर तिने घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले असतात. या सर्वाला वैतागून ती धकाधकीचे जीवन सोडून गोदा काठी येते. ती जगायला कंटाळलेली असते. तिथे तिला सदानंद (किशोर कदम, Kishor Kadam) ही व्यक्ती आपपरभाव न ठेवता मदत करते. सदानंदचे जीवन उद्ध्वस्त झालेले असते ते कसे? हे चित्रपटात बघणे उचित होईल.
सदानंदाची गाठ पडल्यावर प्रीतीमध्ये काही बदल होतो का? जीवनाला वैतागलेली प्रीती पुढे काय करते हे चित्रपटातच पाहावे.
चित्रपटाचे संवाद उत्तम, अभिनय अप्रतिम व या सर्वात कळस म्हणजे दिग्दर्शन. फक्त काही दृश्य (अश्लील, बीभत्स) जी कथानक पुढे घेऊन जात नाहीत ती टाळता आली असती. कदाचित OTT platform चे दुष्परिणाम.
एकंदरीत एकदा पाहण्यासारखा चित्रपट.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: मराठी
ब्रिज/Bridge
ब्रह्मपुत्रेला आसामचे अश्रू म्हणतात यांची भौगोलिक कारणे लहानपणी सर्वांनी दिली असतील, पण हा चित्रपट पाहिला की त्यांची भीषणता चांगलीच समजते.
ब्रह्मपुत्रेच्या एका उपनदीवर असलेला पूल वाहून गेला त्या वेळी ते पार करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष वाहून जातो. जोनाकी (वाहून गेलेल्यांची मुलगी), बापूकान (मुलगा) व बायको (तिला अपस्माराचा आजार जडतो) असे तीन व्यक्ती राहतात. जोनाकीला एका पुरुषाप्रमाणे शेतात काम करणे भाग पडते.
नदी पलीकडे असलेल्या शाळेत नदीतून कपडे काढून चालत दाखवलेली मुलं काळजाला पीळ पाडून जातात. नेमके त्याच वेळेस केळीचे खांबांपासून बनवलेल्या नावेतून कुणी येत असेल तर ती मुले तशीच पाण्यात थांबतात त्या वेळेस हसावे का रडावे हेच कळत नाही.
जोनाकीचे शेतात काम करणारे फोटो बघून एक वार्ताहर ती बातमी टीव्ही वर दाखवतो. तो तिच्या प्रेमात पडतो. त्यांच्या आई वडिलांना ही गोष्ट कळते. ते जातपात न मानता मुलीला बघण्यासाठी येण्याचे ठरवतात. पण नदीला पूल नसल्यामुळे ते परत जातात. ह्या मुळे लहानगा बापूकान नदीवर चिडून तिच्यात माती टाकून तिला बुजवण्याचा बालिश प्रयत्न करतो. जोनाकी आपल्या लहान भावाला समजावते की ही नदी म्हणजेच आपले जीवन आहे. जोनाकीला आपले बैल विकावे लागतात (फिल्मी घटना). आशा रितीने या कुटुंबावर सर्व बाजूने अडचणीचा मारा होतो.
यात आणखीन भर म्हणजे, रात्री जोरदार पाऊस सुरू होतो. हाताला लागतील त्या वस्तू घेऊन हे कुटुंब नदीपासून दुर जाण्याचे प्रयत्न करते. पाण्यातच आईला आकडी येऊन मरण पावते.
जोनाकी व बापूकान कसेबसे वाचतात. तोच वार्ताहर पुराचे चित्राकांन करण्यासाठी आलेला असतो. त्यांची व जोनाकीची भेट होते.
तो तिचा स्वीकार करतो का? का जोनाकीच परिस्थितीचा स्वीकार करते हे चित्रपटातच पाहणे गरजेच आहे.
सर्वाचे अभिनय अप्रतिम आहेत. जोनाकीच काम केलेली शिवा राणी (Shiva Rani Kalita) ही भूमिका जगली आहे. बैलाच्या मदतीने शेत नांगरताना शिवा राणी ही जोनाकीच वाटते. दिग्दर्शक क्रिपाल (Kripal kalita) यांनी घेतलेली मेहनत चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात दिसते.
आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: आसामी
ताठ कणा/Standing Tall
डॉ. पी.एस. रामाणी(P. S. Ramani) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट. सदर चित्रपटात रामाणी सरांचे बालपणापासून ते PLIF चा शोध लागण्यापर्यंतचा प्रवास चित्रित केलेला आहे.
एका छोट्याशा घटनेतून डॉक्टर साहेबांना PLIF शस्त्रक्रियेचा शोध लागतो. ती घटना पडद्यावरच छान दिसते.
उमेश कामत यांनी तरुणपणापासून जवळपास साठीपर्यंतचे डॉ. रामाणी सुंदर रंगवलेले आहेत. शरीरात होणारे बदल, बोलण्यातले बदल हे अतिशय छान दाखवले आहे. उमेश कामत यांनी घेतलेले कष्ट सहज दिसतात.
डॉ. रामाणी इंग्लंडमध्ये असतानाच्या दृश्यात (जे भारतातच चित्रित केलेले आहेत) तांत्रिक परिणाम फारसे चांगले जमले नाहीत.
एकंदरीत एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट.
सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.
भाषा: मराठी
टक-टक/Tak-Tak
जर तुम्हाला एखाद्या खोलीत दोन-तीन दिवस कोंडून ठेवले तर? हीच आहे टक-टक या चित्रपटाची कथा.
विशाल सहावी-सातवीतला मुलगा चुकून शाळेच्या वर्गात अडकून पडतो ते पण तीन दिवस! हे तीन दिवस तो कसे काढतो? कुठल्या गोष्टी त्याला शिकाव्या लागतात. हे सर्व चित्रपटातच पाहणे गरजेचे आहे.
दिग्दर्शक व लेखकांनी घेतले सिनेस्वातंत्र्य सोडता हा खरोखर उत्कृष्ट चित्रपट आहे. सिनेमातील मधला भाग काहीसा संथ वाटतो पण तो शेवटच्या तीस मिनिटांत कसर भरून काढतो. शेवटचा भाग पहिल्यात काही भागात मिसळला (मिक्स) असता तर हा चित्रपट अजून ही चांगला झाला असता.
या चित्रपटाच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विशाल या एकाच पात्रावर संपूर्ण सिनेमा उभा आहे. एकच पात्रावर चित्रपट बनवणे, व त्या पात्राचा अभिनय करणे हे दिग्दर्शक विशाल कुदळे व अभिनेता अनिश गोसावी यांच्या साठी शिवधनुष्यच होते. ते त्या दोघांनी लीलया पेललेले आहे.
एकदा पाहण्यासारखा चित्रपट.