Monday, August 20, 2012

गज़ल



आती नही मौत तो जीये जा रहा हू
नही शराब, तो गम पीये जा रहा हू
सगदिल सनम तुम्हे है दिल कि जरुरत
इस लिए मेरा दिल दिये जा रहा हू
रफ़्तार से डर न लगता था कभी 
कोनसा मोड है ह जो मै धीरे जा रहा हू
न दोस्त बना सका जिंदगी में चार
मेरी ही लाश मै ही लिये जा रहा हू
बहोत हो चुके जाम साकी अब बस्स
अपने ही नजरोसे गिरे जा रहा हू
अब वह नही है 'राजंदा' के जिंदगी में
न जाने कैसे मै जीये जा रहा हू

Sunday, July 22, 2012

नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या शुभेच्छा Bigger Image at

Tuesday, May 1, 2012

महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
मानाचा मुजरा माझ्या महाराष्ट्र देशा
मानाचा मुजरा माझ्या महाराष्ट्र देशा ||घृ||
संत ना येथले वैष्णव नुसते
मानवतेचे ते बीज रुजवते 
ज्ञान वैराग्याचे दाते
संत जन्मती कैक येथे, संताच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||१||
कृष्णदेव ते देवगिरीचे
शिवबा तर अवतार शिवाचे
पेशव्यांचे अटकेवर झेंडे
शूर जन्मती कैक येथे, शूरांच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||२||
वासुदेव, उमाजी, तात्या टोपे
टिळक, राजगुरु, सावरकर ते
भारतास दिधले वीर खडे ते
वीर जन्मती कैक येथे, वीरांच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||३||
मेहता, रानडे, गोखले इथले
शाहू, फुले अन् आंबेडकर जे
समतेसाठी अखंड लढले
सुधारकांच्या देशा माझ्या महाराष्ट्रदेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||४||
दूरदृष्टीचे इथले नेते
हिमालयाचे आधार खरे ते
बहुजनाचे तेच दाते
अनेक नेते इथे जन्मती, पुढा-यांच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||५||
चित्रमहर्षी अन् गानकोकीळा
पुल असो वा असोत वि.वा.
कित्येक जन्मती नवीन कला
कलाकारांच्या देशा माझ्या महाराष्ट्रदेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||६||
नारळीकर वा विजय भाटकर
सचिन तर मास्टर ब्लास्टर
अण्णा आमचे समाजोध्दारक
नवरत्नाच्या खाणी येथे रत्नाकरदेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||७||
असतील वा होतील कैक देश
एकमेव पण तू असा प्रदेश
मी तुझाच अन् तु माझा
ज्ञानी, दानी, शूर, वीराच्या महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||८||

Sunday, March 18, 2012

पुस्तक


परवाच काही पुस्तकं खरेदी केली, पुस्तक खरेदी करण्याचं एक कारण तर पुस्तक प्रदर्शन पण दुसरं फार महत्वाच कारण म्हणजे भावानं ही कविता वाचून दाखवली होती........
एक तर गुलजार म्हणजे माझे आवडते कवी/गजलकार, आणि विषय पुस्तक

पुस्तके वाकून पाहतात
बंद आलमारीच्या काचांआडून
पाहतात मोठय़ा आशेने
आजकाल महिना महिना भेट होत नाही त्यांची
ज्या सायंकालीन वेळा
खात्रीने यांच्या सोबतीत व्यतीत व्हायच्या
त्या आता कॉम्प्युटरच्या पडद्यावरून
सरकून जातात
पुस्तके असतात बेचैन
पाहतात मोठय़ा आशेने
आता तर त्यांना झोपेत चालण्याचीही
सवय झाली आहे
ज्या मूल्यांचा पुस्तके उच्चार करीत होती,
ज्यांची ऊर्जा कधीच संपणार नव्हती
ती मूल्ये आता अदृश्य झालीत घरातून
ज्या नात्यांच्या कहाण्या पुस्तके सांगत होती
ती नातीही विस्कटून गेली आहेत
एखादे पान उलटले तर आता हुंदका ऐकू येतो
शब्दांचे अर्थ पडले आहेत गळून
शब्द बनले आहेत
पर्णहीन सुकलेल्या फांद्यांप्रमाणे
त्यांच्यावर आता कधीच अर्थ उगवणार नाही
अनेक परंपरा मातीच्या भांडय़ांसारख्या
विखरून पडल्या आहेत
ज्यांना काचेच्या ग्लासांनी
निरुपयोगी ठरविले आहे
प्रत्येक पान उलटताना
ओठावर एक नवी चव येत होती
आता बोटांनी क्लिक केल्यावर
एकामागोमाग एक प्रतिमाच फक्त
उलगडत जातात पडद्यावर
पुस्तकांशी जे रक्ताचं नातं आहे
ते तुटलं आहे
कधी पुस्तके छातीवर ठेवून आपण निजत होतो
कधी त्यांना कडेवर घेत होतो
कधी त्यांना गुडघ्यावर ठेवून
प्रार्थना केल्याप्रमाणे वाचत होतो
हवे ते सारे ज्ञान तर पुढेही मिळत जाईल
पण पुस्तकात कधी कधी सापडत होती
सुकलेली फुले
सुवासिक पाने
आणि पुस्तके मागताना, हातून पडताना,
उचलताना
जी नाती जुळत होती, त्यांचे काय?
ती आता कदाचित कधीच जुळणार नाहीत.
                                                                गुलजार

Sunday, January 1, 2012

सिंहावलोकन २०११ : मी, जग आणि हरवलेले मोती


बरेच दिवसापासून काहीतरी लिहावं अस वाटत होत. बघू आज योग्य येतो का? २०११ संपत आलं किंवा संपल पण.
संख्याशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं एक वर्ष दुस-या वर्षापेक्षा चांगल असतं या मताच्या मी पुर्णपणे विरोधात आहे. एखाद्या व्यक्तीला/संस्थेला एखाद वर्ष चागंल जाऊ शकत. पण जगाच्या दृष्टीन सगळ सारखचं ,संख्याशास्त्राच्या  भाषेत  सांगायच तर Normal वर्ष.
पण का कुणास ठाऊक मला मात्र वाटत राहील हे वर्ष फार काही चांगल नव्हत. कित्येक मोठी माणंस आपल्याला सोडून गेली.
मागील वर्ष सुरू झालं ते वसंतोत्सवानी, आजही हरीहरनजीनी गायलेली 'दायम पडा' गझल डोक्यात आहे. मुकुलजींच न गाणं मनाला बोच लावूनच गेलं. पण एकंदरीत  वसंतोत्सव संस्मरणिय झाला यात वादचं नाही. पण याचं महिन्याच्या शेवटी स्वरभास्कराचा अस्त झाला त्यांच गाण मैफिलीतुन ऐकण्याच फारस भाग्य मला मिळालं नव्हत पण ध्वनीमुद्रीत गाणं अफाट ऐकलं. यशवंत सोनवणे नाव पण आपण विसलो असू. या माणंसाचा अंत पण याच महिन्यात झाला. या नावाबद्दल थोड Google करयला काही हरकत नाही.
स्वरभास्कराचा अस्त

फेब्रुवारी व्यक्तिगत दृष्ट्या फारच चांगला होता. माझा संशोधन निबंध आंतरराष्टीय नियतकालीकत प्रकाशित  होणार होता (म्हणजे मराठीत Research paper accepted by international journal).
लहानपणी वाचायच्या अमरचित्र कथा मी मोठा झाल्यावर वाचल्या होत्या. त्या कथाचे जन्मदाते अनंत पै हे याचं महिन्यात आपल्याला  सोडून गेले.
मार्च महिन्यात मला पेपर वाचण्यासाठी पतियाळाला जाव लागल. त्याचबरोबर सिमला हि बघुन आलो. पतियाळात झालेल्या ओळखीच मैत्रीत रुपातंर झाल, आणि अजुनही त्या व्यक्तींशीं चागंले संबध आहेत, आणि राहतीलही.
शिमलामध्ये अनेक प्रेक्षणिय स्थळे आहेत, पण मला मात्र कलका-सिमला रेल्वे फारच आवडली.

पंजाबी विश्वविद्यालयाचा परीसर
१०० वर्षापेक्षा जुनी रेल्वे



एप्रिल महिना माझ्या दृष्टीन नविन वर्ष. जगातल्या बहुतेक दिनदर्शिकेत तोच महिना नविन वर्षाचा महिना असतो. निसर्ग सुध्दा तेच सागंत असतो. या महिन्यात विश्वमोहन भट्टाची मोहनवीणा ऐकण्याचा योग आला. अप्रतिम हा एकच शब्द.
या महिन्यात नारिओ ओगा (Norio Ohga) ज्यांनी जगाला सी.डी.ची भेट दिली ते सोडुन गेले तसेच वीणावादक कल्पकम हि आपल्याला सोडुन गेले.
मेः
नेहमी प्रमाणे या महिन्यात आम्ही कौटुंबिक सहलीला जाऊ शकलो नाही. पण फलटणकरांबरोबर काशीला जायला मिळाल. सहल छानच झाली. याच महिन्यात 'ओसामा' प्रकरणाचा शेवट झाला. याबाबतीत अमेरीकेचं कर्त्वृत्व वाखाणण्याजोग आहेच. देव करो आणि या पध्दतीने काम करण्याची इच्छा शक्ती आमच्यापण सरकारला येवोओसामाला जग अतिरेकी मानत असलं तरी या माणसाकडं बघुन मला कधीच रागं आला नाही, त्याच्या बरोबर उलट म्हणजे कसाब त्याला बघितल की रागच येतो. पण हे माझं अगदी वैयक्तिक मतं आहे.

जून
जगाच्या दृष्टीने फारच काही महत्वाचं या महिन्यात झालं नसेल, पण मी नोकरी करत असलेली कंपनी बदलणार हे निश्चित झालं त्यामुळे माझ्या नजरेतून हा महिना अतिशय महत्वाचा होता. या धामधुमीमुळे मला यावेळेस वारीबरोबर जाता आले नाही. याची रुखरुख मनाला लागुन राहीलं बघू आता पुढल्या वर्षी.
जुलै
जुन अथवा जुलै हे माझे आजारी पडण्याचे महिने. त्यामुळे या महिन्यात मला आजारी पडाव लागलं. याचं महिन्यात, ध्रुपद गायिकेतलं नाव, उस्ताद रहिम फहिमद्दिन डागर, जे डागर घरण्यातील १९व्या पिढिचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच निधन झालं. एकाच प्रकारची गायकी २०,२१ पिढ्या गायची हि फारच आवघड गोष्ट आहे. आजही डागर घरण हे कामं करत आहे त्याबद्दल त्यांना सलाम.
ओगस्ट
हा महिना म्हणजे क्रांतीचा महिना. खरोखर या महिन्यात आपण क्रांतीच बघितली अण्णाच्या आंदोलनाला मिळालेला अभुतपुर्व पाठिबा. तरुणांवर आणि  मध्यमवर्गावर कायमच उदासीन राहतो असा ओरडा करण-यांना यावेळीस शातं बसाव लागलं. याचं महिन्यात शम्मी कपुर आणि उस्ताद झयिवुद्दिन खान पण स्वर्गवासी झाले.
अण्णा


घरगुती पातळीवर अनेक नविन संबध निर्माण होतात आणि ते होण ही तितकचं महत्वाच असतं. मेव्हणीचं (सालीचं नाही, चांगला मराठीत शब्द असताना हिंदी कशाला?) लग्न ठरलं. नविन साडूंच गाव खेडी. खेडी गावाचं नाव. आजरा -कोल्हापुर रस्तावरील एक अप्रतिम गाव. दोन दिवस राहण्याचा योग आला. तिथलं निसर्ग सौंदर्य बघुन मन अगदी प्रसन्न झालं.



सप्टेंबर
महिन्याची सुरवातचं वाईट बातमीनं झाली. श्रीनिवास खळेच्यां निधनानी. अप्रतिम आणि सोपी वाटणारी चाल. हेच खळेकाकाच्या संगीताचे वैशिष्ठ्य  म्हणता येईल. एका तळ्यात होती, श्रावणात घननिळा, किलबिल किलबिल पक्षी बोलती, उगवला चंद्र पुनवेचा, गोरी गोरी पान आशी कित्येक गाणी चटकन ओठावर येतात.


  तसेच कित्येक  लोकांच्या चांगल्या चेह-याला आणखीन चांगल करणारे गौतम राजाध्यक्ष.
नोकरी बदलण्याचा निर्णय या महिन्यांत आमलात आला.
पुर्वी ज्या कंपनीत होतो तिथच परत गेल्यामुळे नविन कंपनी कशी असेल वगैरे ताणतणाव फारसा नव्हता. कार्यालयाच्या दारापाशी  असलेल्या निरिक्षकाने (security guard)  हसुन केलेल्या स्वागतामुळे असलेला थोडासा तणाव पण कमी झाला.
आक्टोबर
२०११ मधला सर्वात काळा महिना जर असेल तर तो हाच महिना.
डेनिस(Dennis MacAlistair Ritchie) ज्या वक्तीला “C”,  “Unix operating system”  याचा कर्ता(वडील) म्हणतात तो वक्ती. अप्पल (Apple) हे फक्त फळाचे नाव ठेवता ते एका कंपनीचे पण नाव असू शकते. आणि Apple नावाची कंपनी ही फळाच्या नावापेक्षा प्रसिध्दी देणारे स्टिव्ह जॉब्स(Steven Paul Jobs). उर्दू शब्दातला जडपणा टाळत हिंदी शब्दाची रचना असण्या-या गझल गाऊन प्रसिध्द करणारे जगजिंतसिंग.
या तिन्ही लोकामध्ये एक साम्य नक्कीच होते. प्रवाहा विरुध्द जाण्याचे. एक नाही दोन साम्य होती, दुसरे म्हणजे यांचा मृत्यू हि एकाच वर्षी एकाच महिन्यात झाला.



नोव्हेंबर
आक्टोबर महिन्याशी जर कोणी चुरस देऊ शकत असेल तर तो महिना म्हणजे नोव्हेंबर.
भुपेनदा संगीतसम्राट, सारंगीसम्राट उस्ताद सुलतान खान, जीवरसायनशास्त्रसम्राट हर गोविंद खुराना  हे याचं महिन्यात कालावश झाले.

व्यक्तिगत पातळीवर झालेली काशिदची सहल किंवा राजगडाची मोहिम चिरकाल स्मंरणिय राहिल यात वादचं नाही.

राजगड 
भीमराव पांचाळे यांच्या गझला अनेक ऐकल्या होत्या. पण मैफिल ऐकण्याची संधी यामहिन्यान मला दिली.
डाऊनलोड करण्याची लिंक
डिसेंबरः
महिन्याची सुरवातचं मुकूलजींच्या गाण्यांन झाली. 'यमन कल्याण' अप्रतिम होताच यात वादच नाही. पण त्यारागाने पुर्ण कार्यक्रमाचे पैसे वसुल केले ऐवढे मात्र नक्की. पुढील कार्यक्रमाचे पैसे अजुन देण बाकी आहे (कलाकारनं श्रोत्यांवर कर्ज चढवलं)
मुकुलजी (शिशिर साठे यांनी काढलेला फोटो)
डिसेबंर महिना सवाईशी संबधित महिना. यावेळी सकाळेचे सत्र रद्द केल्यामुळे सकाळचे राग ऐकायला मिळणार नाही हे नक्की झाल होत. दोन चार कलाकार वगळता बाकीच्यानी भ्रमनिरासच केला. ज्या कलाकराकडुन अपेक्षा होत्या त्यांना वेळच दिला गेला नाही. असो. एकदंर सवाई ठिकठाक झालं

शंकर महादेवन् सवाई २०११
यामध्ये एखादी महत्वाची घटना/व्यक्ती राहिलेली असेल तर नक्की comments मध्ये टाका.
हरवलेले मोती बघता या नविन वर्षीत एकाही मोती हरवू नये हिच इच्छा, अपेक्षा.