Sunday, August 4, 2013

सांग सांग मनपा

सांग सांग मनपा
(चालः सांग सांग भोलानाथ... कवी मंगेश पाडगावकरांची माफी मागून)

सांग सांग मनपा | खड़े पडतील काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

मनपाखड्यातून जाताना गाड्या पडतील का?
एक दोघांचे तरी डोके फुटेल का?
मनपा ! मनपा !! सांग सांग मनपा
खड़े पडतील काय ॥१॥

मनपा ! मनपा !! खरं सांग एकदा
रस्त्यावर खड़े आहेत किती आता
मनपा ! मनपा !! सांग सांग मनपा
खड़े पडतील काय ॥२॥

मनपा ! उद्या आहे गणिताचा पेपर
खड्यातून जातान फुटेल कारे ढोपर 
मनपा ! मनपा !! सांग सांग मनपा
खड़े पडतील काय ॥३॥

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

सांग सांग मनपा। खड़े पडतील काय