Tuesday, September 14, 2021

चित्रपट मिराज-२०१८ (Mirage -2018)

 मिराज-२०१८  (Mirage -2018)



मुळात नावापासूनच या चित्रपटाचा वेगळेपणा दिसायला लागतो. मिराज म्हणजे मृगजळ.

ओरील(Oriol Paulo) दिग्दर्शित हा खरेतर स्पॅनिश चित्रपट.

 निको (Nico)त्यांची आई मारीया (María) हे जर्मनीमध्ये राहणार दोनच माणसांच कुटुंब. निको १०-१२ वर्षाचा मुलगा, गिटार वाजवत स्वतःचं चित्रीकरण करत टीव्ही बघणे हा याचा छंद. त्यासाठी लागणारा कॅमेरा, टीव्ही व कॅसेट हे जवळ बाळगणारा निको.

चित्रपटाची सुरुवात ९ नोव्हेंबर १९८९ (बर्लिनची भिंत पडलेला दिवस, जर्मन भाषेत याला 'माउरफॉल' असे म्हणतात) या दिवसापासून होते. या दिवशी निको स्व:चित्रीकरण करत असतो, त्याच दिवशी ७२ तासाच वादळ जर्मनीला धडकत.

चित्रीकरण करत असताना शेजारील घरातील संशयात्मक हालचालीमुळे निको तिकडे जातो. शेजारच्या घरात एंजेल (Angel) मृतावस्थेत तर तिचा नवरा प्रीतो (Prieto) हातात सूरा घेऊन उभा असतो. हे दृश बघून पळत असताना निकोचा  अपघाती मृत्यू होतो. प्रीतोला पत्नीच्या खुनासाठी शिक्षा होते. 

२०१४ मध्ये त्याच घरात वेरा (Vera Roy) व डेव्हिड (David Ortiz) आपल्या मुलीसह (ग्लोरिया Gloria) राहण्यासाठी येतात.  त्यांना जुना कॅमेरा, टीव्ही व निकोचे चित्रमुद्रण सापडते. या विषयी ते आयटोर(Aitor) व त्यांची आई क्लारा (Clara) (वेराचे शेजारी) यांच्याशी बोलतात. त्या वेळेस त्यांना पूर्वी झालेला प्रसंग आयटोर सांगतो. जसं वादळ १९८९ आलं होत तसच वादळ आता पण आलेले असतं.

जेवणानंतर झोपेच्या वेळेस वेराला तो टीव्ही सुरू झालेला दिसतो. ती टीव्ही समोर जाते तेव्हा निको गिटार वाजवत असतो. 

निको व वेरा एकमेकांना टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकत असतात. एकमेकांशी संवाद साधू शकतात. पहिल्यांदा घाबरलेली वेरा निकोला घराबाहेर जाण्यापासून थांबवते. तिला माहीत असलेल्या माहितीवरून निको बाहेर गेला तर त्याचा मृत्यु होणार असतो.  जे नियतीने लिहून ठेवले आहे ते बदलण्याचा प्रयत्न करते. त्याचे प्राण वाचतात.

आपण केलेल्या या बदलामुळे आपले संपूर्ण जीवनच बदलून जाईल यांची वेराला सुतराम कल्पना नसते. दुसर्‍या दिवशी वेराला कळत, डेव्हिडच लग्न दुसर्‍या मुली बरोबर झालं असत. ग्लोरिया ही त्यांची मुलगीच नसते. तीच जीवन पूर्णपणे बदलून जात. ती एकटीच असते, जिला आधी व नंतरच आयुष्य आठवत असत. प्रीतो व क्लारा हे नवरा बायको म्हणून राहत असतात. या सार्‍यांच्या जीवनात वेराला स्थान नसत. 

निकोचे वाचवलेले प्राण वेराच पूर्ण आयुष्यच बदलून टाकत. आता आलेले वादळ ७२ तास राहणार असल्याच तिला कळत. याच वेळेत तिला आपले जुनं आयुष्य मिळवण्याची संधी असते.

ती ते आयुष्य परत मिळवते का? व त्यासाठी निकोचा बळी देते का? हे चित्रपटातच पाहणे योग होईल. चित्रपटाच्या नावावरून 'चित्रपटाच्या भविष्याचा' वेध घ्या.

कथानक उत्तम असल्यामुळे इतर तांत्रिक बाबीकडे लक्ष जात नाही. चित्रपट स्पॅनिश असल्यामुळे हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटाशी तुलना करणे योग्य होणार नाही.

टीव्हीतून एकमेकाशी कसं बोलता आले? असले प्रश्न मनाने विचारले नाही तर एकदा नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट.

ज्या वेळेस आपली योग्यता(साधना) नसते त्या वेळेस नियतीने लिहून ठेवलेल्या गोष्टीत बदल करणे धोक्याचे असते, अस मला वाटतं. 

आपल्याला भविष्यात काय होणार याची उत्सुकता असली तरी त्याकडे कानाडोळा करणेच जास्त श्रेयस्कर असावे.

Thursday, September 9, 2021

मोदक आणि संख्याशास्त्र

 



फोटोत बघून मोदक चांगला आहे की नाही हे सांगायचे झाले तर काय होईल?

आपल्याकडे दोन मार्ग आहेत.

१) मोदक चांगला आहे.

२) मोदक चांगला नाही. 

फोटोत बघून काही लोक म्हणतील चांगला असेल काहींना वाटेल हा चांगला नाही.

I) मोदक चांगला असताना 'मोदक चांगला आहे' हा पर्याय निवडला.

  बरोबर निर्णय. तुम्ही एक मोदक जिंकला.

II) मोदक चांगला नसताना 'मोदक चांगला नाही' हा पर्याय निवडला.

  बरोबर निर्णय. तुम्ही वाईट मोदक खाण्यापासून वाचलात.

III) मोदक चांगला असताना 'मोदक चांगला नाही' हा पर्याय निवडला.

 चुकीचा निर्णय, तुम्ही मोदकाला मुकलात.

IV)  मोदक चांगला नसताना 'मोदक चांगला आहे' हा पर्याय निवडला.

 चुकीचा निर्णय. भोगा आता कर्माची फळ.

I) व II) हे तर बरोबर निर्णय आहेत, त्यामुळे त्याबद्दल काहीच न बोललेले बरं

III) व IV) हे चुकीचे निर्णय आहेत. संख्याशास्त्रात III) ला Type-I error व IV) ला Type-II error म्हणतात.

संख्याशास्त्राचा डोलारा याच दोन चुकांवर अवलंबून असतो. 😃😃

ह्या पैकी कुठल्या चुकीला महत्त्व द्यायचे व ती चूक कमी करण्याचा प्रयत्न करायचा हे त्या केलेल्या प्रयोगावर अवलंबून असत अस माझे मत आहे.

मोदकाचा आस्वाद घेण्यासाठी घरी या आणि तुम्हीच ठरवा तुम्ही कोणती चूक केली आहे ती?

तुम्ही जीवनात घेतलेल्या सर्व निर्णयातील दोन्ही चुका गणपती बाप्पाने कमी कराव्यात हीच बाप्पाला प्रार्थना. 🙏🙏🙏