Tuesday, May 17, 2011

लहानपण देगा देवा


बरेच दिवसात फलटणला जाण्याचा योग आला नव्हता. तो शनिवारी आला. दुपारच जेवण झाल्यावर थोड झोपावं म्हटलं. ऑफीसमध्ये (office) सुध्दा दुपारी झोपतो, पण officially नाही.
पुतणीला झोप येत नसल्यामूळे तिचे काहीतरी खेळ चालले होते. त्यामुळे होणारे आवाज... थोडासा मी वैतागलोच.  पण नंतर मात्र लहानपणात गेलो.

मला चांगलच आठवत उन्हाळ्यात आमच्याकडं बरेच पाहुणे यायचे. आते,मामे, मावस भाऊ, बहिण. जळवपास ७,८ मुलं तरी असायची. त्यावेळेस काय धम्माल करायचो. दुपारी
घरातले झोपले असले तरी आमचा कालवा चालू असायचा. उन्हाळ्याच्या काळात घरासमोरील आगंण व रस्ता असा मिळून किक्रेटचा डाव चालायचा. पायात चप्पल आहे का नाही याचं सुध्दा भान नसायच. पण त्याकाळात कधी पाय भाजले ही नाहीत किंवा इतर काही त्रास पण झाला नाही. दोन दिवसापुर्वी ऑफीसमध्ये आगीपासुन वाचवण्यासाठी पुनरूक्तीद्वारा दिलेल्या शिक्षणाच्यावेळेस (fire drill) असण्या-या उन्हामुळे संध्याकाळी मला किती त्रास झाला. (हे वाक्य लिहुन आणि वाचकांना वाचुन सुध्दा त्रास झाला.) बहुदा लहानपणीचा सुर्यपण जास्त तापत नसेल.

आमच्या घरासमोरील वाड्यातपण खुप पाहुणे यायचे. कधीकधी पत्त्याचा डाव पण रंगत असे. दुपारच जेवण झाल की हात धुतला की लगेच वाड्यात जायचो. पत्ते, कॅरम, व्यापार किती खेळ
खेळायचो.
किक्रेट खेळतानाचा कायमचा प्रश्न म्हणजे बॉल(चेंडू). त्याकाळी ३.५० रुपायला एक लाल रबरी बॉल मिळायचा. टेनिसचा बॉल म्हणजे श्रीमंतीचं लक्षण. लाल बॉल थोड्या दिवसातच फुटायचा. तो चिटवण्यासाठी किती प्रयत्न केले देवालाच माहित. कधी कधी सायकलच्या टुबचा बॉल तर कधी झाडाच्या शेंगाचा (lawn tree) बॉल. पण त्यात सुध्दा एक गंमत होती. ज्याचा बॉल त्याला दोन वेळा आऊट काराव लागायच.
रात्री अंगणात चटई टाकून घालवलेल्या कित्येक संध्याकाळ. चटईवर झोपल की पाठीला दगड टोचायचे पण ते शोधुन काटुन टाकयचो. सापडलेला दगड काढुन टाकल्यावर कित्ती बंर वाटायच. आज दारात फरशी आहे त्यामुळे दगड टोचत नाहीत, पण असं झोपायला आज कोणाला वेळ आहे?
त्यावेळी वाटायच “मोठं होण्यात मजा आहे”. परीक्षा नाही ना अभ्यास नाही. पण आज कळतं तेच जिवन खरंतर फारच सुरेख होतं. आज रोजचं परीक्षा आहे. सगळाच पेपर अर्निवाय (compulsory) आहे विक्लप(options) नाहितच.
भले आज आसणा-या सुखसुविधा त्यावेळी  नव्हत्या पण सुख होतं. याचा अर्थ असा नक्कीच नाही की आज फार दुख आहे. पण नक्कीच लहानपण हरवल्याचं दुख आहे. म्हणतातचना सगळेच ऋतू चांगले असतात आपण दुस-या ऋतूत असताना.
त्याकाळी २५ पैशे कधीतरी खाऊसाठी मिळायचे त्या पैशात येणारी चिंच. त्यातुन येणारी मज्जा काही औरच होती. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे खर्च होऊन सुध्दा आनंद!

"कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा" या गझल मध्ये शायर म्हटतो
बेशक उसी का दोश है कहता नहीं ख़ामोश है
तू आप कर ऐसी दवा बीमार हो अच्छा तेरा
उर्दू गजल कायमच दोन पध्दीतीने वाचतात. एक म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी दुसर म्हणजे देव व भक्त. मला मात्र वरचा शेर जीवनाला उद्देशुन म्हटल्यासारखा वाटतो.
बेशक उसी का दोश है कहता नहीं ख़ामोश है
तू आप कर ऐसी दवा बीमार हो अच्छा तेरा