Saturday, April 24, 2021

पं राजन मिश्रा

 पं राजन  मिश्राजी भावपूर्ण श्रद्धांजली



Thursday, April 22, 2021

चित्रपट हुगो (Hugo) आणि करोना

 हुगो (Hugo) आणि करोना



आता तुम्ही म्हणाल हे हुगो, हुगो  काय आहे? हुगो, हुगो.

       हा आहे २०११ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. मग त्यांचा आणि करोनाचा काय संबंध? संबंध आहे, थोडा 'इंतजार'.

         चित्रपट सुरू होतो पॅरिसमधील एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवरून. सुरुवातीच्याच दृश्यात प्रेक्षकांना कळत दिग्दर्शक (मार्टिन चार्ल्स स्कॉर्सेसी) आणि छायाचित्रकार (रॉबर्ट रिचर्डसन) ही नाव फक्त नामावलीसाठी नसून ते या चित्रपटात  जादू दाखवण्यासाठी आहेत.

          हुगो हा दहा बारा वर्षाचा मुलगा रेल्वेस्टेशनवर राहणारा. त्याचे वडील हे घड्याळ बनवणे/दुरुस्त करत व त्याच बरोबर एका वस्तू संग्रहालयातील यंत्रांची देखभाल करत. पण अकस्मित झालेल्या एका अपघातात त्यांना प्राण गमवावा लागतो.  हुगोला आपल्या दारुड्या काकांकडे (रेल्वेचे घड्याळ चालू ठेवण्याचे काम करणारे) यावे लागते. 

           त्याकाळातील (साधारण १९३०-३५) मध्ये अनाथ मुलांना अनाथाश्रमात टाकले जायचे. अशी मुले सापडण्याचे हमखास ठिकाण म्हणजे रेल्वेस्टेशन. हेच आपले परमकर्तव्य मानून काम करणार इंस्पेक्टर गुस्तावे. हा लहान अनाथ मुलांच्या शोधात असतो. हुगोला गुस्ताव बरोबर करावा लागणारा उंदरा मांजरांचा खेळ मस्त चित्रित केला आहे.

            हुगोला वडिलांकडून यंत्र दुरुस्त करण्याचे कसब लहानपणापासूनच येत होते. अपघातापूर्वी एका स्वयंचलित यंत्राला (ऑटोमॅटॉन) दुरुस्त करत होते. पण त्याचे ते काम अपूर्णच राहीले. हुगो या यंत्राला घेऊन रेल्वेस्टेशनवर रहायला आला व ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत होता. त्यासाठी लागणारे साहित्य तो स्टेशनवरच असणार्‍या पापा जाॅर्ज्सच्या खेळण्याच्या दुकानातून चोरत असे. पण एक दिवस पापा जाॅर्ज्सनी त्याची चोरी पकडली आणि त्याच्या खिशातील सर्व वस्तू काढून घेतल्या. पापा जाॅर्ज्सला एक वही सापडते ज्यामध्ये ऑटोमॅटॉनची चित्रे व दुरुस्त करण्याच्या आकृत्या दिसतात. त्या बघून पापा जाॅर्ज्सचा चेहरा (आणि त्यांचा त्या वेळेसचा अभिनय) अगदी बघण्यासारखा आहे.

           बर्‍याच उद्योगातून हे ऑटोमॅटॉन सुरू होत. अर्थात हे सर्व चित्रपटात बघणे फारच मजेशीर आहे. ऑटोमॅटॉन एक चित्र काढते व सही म्हणून जाॅर्ज मेलाइस अशी केली जाते.

         ऑटोमॅटॉन  सुरू होत त्यावेळेस अर्था चित्रपट संपतो. मला प्रश्न पडला पुढे काय दाखवणार? पुढील चित्रपट तर याहून अधिक उत्कंठावर्धक होत जातो. 

         शंभरहून अधिक चित्रपट काढणारा, लेखक, दिग्दर्शक व नट म्हणजे जाॅर्ज मेलाइस. जाॅर्ज मेलाइस हा दुसरा तिरसा कुणी नसून पापा जाॅर्ज्स. महायुद्धानंतर लोकांना अनेक चटके बसले. त्याचा परिणाम म्हणून त्यांचा चित्रपट, नट, कलाकार अशा गोष्टीतील रसच कमी होतो. त्यामुळे जाॅर्ज मेलाइस हा एक हडाचा कलाकार पूर्णपणे खचून जातो.

      एका अर्थाने 'जाॅर्ज मेलाइस' हे यंत्र तुटून पडलं होत, आणि ते दुरुस्त करण्यात हुगोला यश मिळत का हे मात्र चित्रपटातच पाहणे गरजेचे आहे.

 हा असा 'हुगो' चित्रपट.

करोना व या चित्रपटाचा काय संबंध?

करोना आज ना उद्या जाईलच, पण त्यानंतर समाजाला अनेक कलाकारांची गरज भासेल. त्यावेळेपर्यंत आजचे किती कलाकार उन्मळून पडले असतील? या सर्वांच्या जीवनात हूगो येईल का? 

याच चित्रपटातील एक फार छान वाक्य आहे. "हे जग म्हणजे एक यंत्र आहे. यंत्रात कुठलाही भाग बिनकामाचा नसतो. प्रत्येकाला काही ना काही काम असते."

मला वाटतं आपल्यासारख्या सामान्य माणसांना कुठल्या तरी कलाकाराचा हुगो बनण्याचे काम तर दिले नसेल ना?

Saturday, April 10, 2021