Thursday, March 14, 2013

दुष्काळ


काय करू शकतो मी दुष्काळासाठी? काहीही नाही.
मला माहिती आहे, आपल्या घरातील संडासातून एकावेळेस फ्लशमधुन जेवढं पाणी जात तितकं तरी एका दुष्काळग्रस्त कुटूंबाला मिळत असेल का?
एक माणुस म्हणुन मी काय करु शकतो? पण कवी म्हणुन करु शकते, एखादी कविता.

दुष्काळ

किती सोपं असत शेती करणं
जमीन विकत घ्यायची
बाजारातून   तास, तास, दिवसात येणार पिक घ्यायचं आणि लावायचं
, तासानं ते पिक विकायचं
आणि आलेल्या पैशातून पुन्हा जमीन घ्यायची
किती सोपं असत शेती करणं
असच्च वाटतं असेल माझ्या मुलाला
बघितयं त्यांन मला फार्म व्हिला खेळताना
कसं समाजावू त्याला इतक सोप नसत ते
आधी जमीनचं विकत घेता येत नाही सगळ्यांना
आणि घेतलीच तर गाळावा लागतो घाम
नसतं ते सोप क्लिक क्लिक करण्याइतकं
आलाचं जरी पिक तरी मिळेलचं मोबदला? असही काही नाही
कसं सागू त्यांला
शेती म्हणजे खुप आस्मानी आणि त्याहून जास्त सुलतानी
मीपण त्याला समजावू शकणार नाही कारण मला पण आता
सवय झालीय या कागदी झाडांची आणि कागदी फळाची
किती सुंदर दिसत आहे, हे कागदी लिंबू
पिवळ धम्मक किती सुंदर आकार
पण कापल की समजेल
ते आहे माझ्या मनासारखं किंवा या जमीनीसारखं
कोरडं लिबू, कोरडं मन आणि कोरडी जमीन