Wednesday, December 2, 2015

शॅाक


              शॅाक
मला कळंतच नाही तुम्हा शिनेमावाल्याचं काही
तू काय म्हणत होता ते काही समजलंच नाही मला
हा कळलं एवढ्यं तुला बसला होता, शॅाक तुझ्या बायकोच्या बोलण्याचा
शॅाक बसून सुध्दा तू होतास हसत
मला हेच कळंत नाही तुम्हा शिनेमावाल्याचं
मी पण कित्येकदा म्हणालो माझ्या बायकोला
जाऊया आपण पण सोडून सारं
जाऊया आपण पण सोडून सारं
हं … तुझ्यासारखा देश नाही सोडता येत मला
सोडता येतो देह पण देश नाही सोडता येत
तुझ म्हणणं बरोबर आहे का चूक, हे मला कळतं पण नाही
पण तुझ्या बोलण्यानं देश पेटतो, माझ्या कृतीने चिता पेटते, उदारीवर
माझी बायको, नसलं शिकली फारशी, म्हणाली
धनी आपणच असं म्हणल्यावर बाकीच्यानी काय करायचं
धनी आपणच असं म्हणल्यावर बाकीच्यानी काय करायचं
नाही. नाही मी आपल्या पोराबाळांबद्द्ल नाही बोलत
आपणच मोडलो तर समाज मोडायला कितीसा वेळ लागल!
हे पण दिस, जातील
येईल नवा सूर्य, अन्नधान्याचा आशीर्वाद घेऊन
अजून सुद्धा आपल्याला बळीराजाच म्हणतात
होऊ आपण पण ख- या अर्थाने राजा
मी पण झालो शॅाक बायकोचं बोलणं ऐकून, तुझ्यासारखा
मी पण झालो शॅाक बायकोचं बोलणं ऐकून, तुझ्यासारखा
ठरवलं नाही सोडायाचा देह, नाही करायची आत्महत्या
नाही मिळत प्रत्येकालाच बायको माझ्या बायकोसारखी, शॅाक देणारी