Friday, March 19, 2010

रुम ५२

पदवीत्तर (Post graduate) शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. पुण्या घर असल्यामुळे वसतीगृहात (Hostel) राहण्याचा प्रश्र्नच आला नाही. पण २००२-२००४ यावेळेत पुणे विद्यापिठातील वसतीगृह निरीक्षक (Rector) पण मला Hostel वरचा विद्यार्थी समजत असावेत.

रुम ५२ हि विशेष आवडीची रुम. या रुमवरचे अनेक किस्से आहेत (चला ४,५ Blog तरी भरतील).

एप्रिल, मे महिन्यातील दिवस. परीक्षा चालू झाल्या होत्या. "तु रुम वर आलास म्हणजे सगळी मुल आभ्यास करतात. परीक्षाच्या काळात तु रुम वरच रहा" रुमवरचा मित्र. "बंर". उद्या पासुन पेपर सुरु होणार होत्ते. पहिला पेपर "Regression analysis". मी आदल्या दिवशीच रुमवर गेलो. दुपार पासुन सर्वानी अभ्यास पण सुरु केला. ७,८ वाजले असतील. जेवणाचे डब्बे येण्याची वेळ झाली. एका मित्राने पत्ते काढले व डाव लावत बसला. यथावकाश डब्बे पण आले. जेवण झाल्यावर परत अभ्यास सुरु करणार होतोच. पण मगाशी डाव लावणारा तो डाव पुर्ण करत होता. त्याला मदतीला दुसरा मित्र आला. मग डाव लावण्यापेक्षा रम्मी खेळलेली बरी. म्हणुन रम्मीचा डाव सुरु झाला. एकाला दोन, दोनाला तीन आशे सर्वजण बसले (मी सुध्दा). दुसरे दिवशी चहा नाष्टा कोण देणार हे ठरवण्यासाठी. रात्रीचे १२:३० वाजले असतील तेव्हा कुठे डाव संपला. मग सर्वानी लवकर उठुन अभ्यास करयच ठरवंल.

रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. एका मित्राच्या पोटात दुखाला लागल. त्यान शेजारच्याला उठवल. आणि हळुहळू रुम जागी झाली. त्याच्या पोटात पण भंयकर दुखत असणार. "नाही रे, उद्यापर्यत मी जिवंत राहत नाही" वगरै,वगरै आशी त्याची वाक्य चालू होतीच. सर्व उपाय जे आम्ही करु शकतो ते सर्व करुनही झाले. मित्राचा त्रास वाढतच चालला होता. मग कुणीतरी रिक्षा आणली. रात्री रिक्षा मिळण फार मुश्किल होत. त्याला रिक्षात घातल. कुण्याच्यातरी मागुन आणलेल्या दोन गाड्यावर चौघ. जवळच असण्यार्या रत्ना हॉस्पिटला आम्ही गेलो. डॉक्टरानी तपासल व दाखल करुन घेतल (admit). डॉक्टराना विचारल "काही सिरियस?" "काही नाही उद्या ठीक होईल". तो पर्यत सकाळचे ६ वाजले होते. त्या मित्राच्या आई वडिलाना बोलावल. ते पण घाबरुन ११,१२ पर्यत आले. तो पर्यत आम्ही तिथेच. अभ्यासाचाच उजेड. पण पेपर देयचा ठरवल होतच.

पेपर दिला पण. देवाच्या दयेने आम्हचे टमके बरोबर लागले व आम्ही पास पण झालो. दुसर्या दिवशी त्याला हॉस्पिटल मधुन सोडल पण.

Thursday, March 11, 2010

आणि आम्ही परत फिरलो

आणि आम्ही परत फिरलो


मी त्यावेळी खुपच लहान होतो. माझे आते भाऊ आणि बहिण आमच्याकडे राहला आले होते. ते आले कि दिवस मजेत जायचे. पण ते जायचे त्या दिवशी भंयकर त्रास व्हायचा. आशेच एका दिवशी ते जायला निघाले.

आम्हच्याकडे येण्यार्या पाहुण्याना जाताना बस स्थानकावर (मराठीत stand वर)पोहचवण्याची पध्दत होती आणि आहे. त्यामुळे पाहुणे मंडळीबरोबर घरच्या मंडळीचा पण टांगा ( इतिहास जमा झालेल वाहन) जायचा.

एका टांग्यात माझी आजी, आत्या, भाऊ वगरै जात होते. काय झाल माहित नाही बहुदा दगडावरुन टांगा गेला असणार आणि टांगा पलटला.

सर्वानाच थोडफार लागल. पण आजीला जरा जास्तच लागल. एक दोन टाके पण पडले. आशा अवस्थेत जाण आत्याला बरं वाटना. म्हणुन आत्यानी ठरल दोन चार दिवसानी जाऊ. आणि आम्ही परत फिरलो.

आजीला लागल होत डॉक्टर तपासत होते आणि आम्ही मुल नाचत होत कारण जाण दोन दिवसानी लांबल.

त्याकाळात आजीला लागल असताना असा आंनद व्यक्त करण बंर नाही हे कळतच नव्हत.

आज?????????????????????

Monday, March 8, 2010

रंगपंचमी

परवा रंगपंचमी झाली. सोसायटीतील लोकांनी साजरी पण केली. ४००,५०० रुपयाचा रंग हि असेल. पण ती मज्जा नाही आली जी पुर्वी येत असे. ४,५ रुपायाचा रंग असे पण मज्जा ४,५ लाखाची असायची?

माझी आजी नेहमी म्हणायची "माझी मुल हिच माझी दैवत" आणि खंरच आजीनं मुलाची (माझ्या वडीलाची, आत्याची) खुप काळजी घेतली आणि केली पण. तसच त्याच्यावर चांगले संस्कार होतील याच्यावर पण लक्ष्य ठेवले.

रंगपंचमी वरून आठवल. माझ्या वडीलाच्या लहानपणी आजी रंगपंचमीसाठी गरम पाणी करुन द्यायची. आज रंग खेळण्यासाठी "गरम पाणी" वाचुन थोडस हासू पण येईल पण आजीचा दृष्टीकोन फारच सरळ होता. "गार पाण्यामुळे मुलाना काही त्रास होऊ नये.  मुल आजारी पडू नये"

यापुढे जाऊन हि आणखी एक गंमत म्हणजे, हे गरम पाणी माझे वडील किंवा आत्या इतर मुलाच्या आंगावर उडवत आणि ती मुल मात्र यांच्या आंगावर गार पाणी उडवत. आजी म्हणायची माझी मुल काय आणि इतराची काय त्रास कोणालाही होऊ नये.

हेच संस्कार आजही जपायचे प्रयत्न करतो आहे. दुसरा आपल्यावर गारपाणी उडवत असला तरी आपण गरमपाणी उडवायच.

Tuesday, March 2, 2010

बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय

मी त्यावेळी साधारण आठवीत होतो. रसायनशास्त्राच्या सुरवातीच्या धड्यात किमयागार नाईल नदी वैगरे माहिती होती. किमयागाराना परीस, अस द्रव्य ज्या मध्ये सर्व पदार्थ वितळतील अश्या काहिश्या वस्तू तयार करायच्या होत्या म्हणे. त्यावरुन आम्ही ४,५ मित्र फारच प्रेरित (Inspire) झालो. आम्ही आठवीत असल्यामुळे आम्हाला प्रयोगशाळेत जाता येत नसे. परंतू एका दुसर्या शाळेच्या प्रयोगशाळेत आम्ही जाऊ शकत होतो. एक दिवस आम्ही त्या शाळेच्या प्रयोगशाळेत गेलो. ज्या पदार्थाची नावे माहित होती ते पदार्थ आम्ही थोडे थोडे वेगवेगळ्या पिशवीत घेतले ( का चोरले?????). एका मित्राने एक bag (मराठीत काय?????) आणलीच होती त्यामध्ये या सर्व गोष्टी त्यामध्ये ठेवल्या. दुसर्या दिवसा पासुन प्रयोगाला सुरवात पण केली. आमच्या घराच मागचं अंगण हिच आमची प्रयोगशाळा. आम्हाला नक्की वाटत होत की आम्ही दोन चार दिवसात आम्ही नक्कीच कशाचा तरी शोध लावू.


असाच किस्सा कॉलेजचा. संख्याशात्रात Distribution (मराठीत काय??????) असतात. थोडे दिवस संख्याशात्राचा अभ्यास केल्यावर लक्षात आल आपण पण आपल्या नावान एक Distribution काढू शकतो. Kalyan's distribution.

आज जाणवत दोन्ही गोष्टीत मनाचा बालिशपणा होता.

आपला पगार किती टक्क्यानी वाढला? कोणत रेटींग मिळाल? पदोनत्ती(Promotion) झाली का नाही? हे जरी आज यक्षप्रश्न वाटत असले तरी काही दिवसानी हा पण बालिशपणाच वाटेल?

बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय मला वाटत यामध्ये फारच अंधुक रेषा आहे?