Tuesday, March 2, 2010

बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय

मी त्यावेळी साधारण आठवीत होतो. रसायनशास्त्राच्या सुरवातीच्या धड्यात किमयागार नाईल नदी वैगरे माहिती होती. किमयागाराना परीस, अस द्रव्य ज्या मध्ये सर्व पदार्थ वितळतील अश्या काहिश्या वस्तू तयार करायच्या होत्या म्हणे. त्यावरुन आम्ही ४,५ मित्र फारच प्रेरित (Inspire) झालो. आम्ही आठवीत असल्यामुळे आम्हाला प्रयोगशाळेत जाता येत नसे. परंतू एका दुसर्या शाळेच्या प्रयोगशाळेत आम्ही जाऊ शकत होतो. एक दिवस आम्ही त्या शाळेच्या प्रयोगशाळेत गेलो. ज्या पदार्थाची नावे माहित होती ते पदार्थ आम्ही थोडे थोडे वेगवेगळ्या पिशवीत घेतले ( का चोरले?????). एका मित्राने एक bag (मराठीत काय?????) आणलीच होती त्यामध्ये या सर्व गोष्टी त्यामध्ये ठेवल्या. दुसर्या दिवसा पासुन प्रयोगाला सुरवात पण केली. आमच्या घराच मागचं अंगण हिच आमची प्रयोगशाळा. आम्हाला नक्की वाटत होत की आम्ही दोन चार दिवसात आम्ही नक्कीच कशाचा तरी शोध लावू.


असाच किस्सा कॉलेजचा. संख्याशात्रात Distribution (मराठीत काय??????) असतात. थोडे दिवस संख्याशात्राचा अभ्यास केल्यावर लक्षात आल आपण पण आपल्या नावान एक Distribution काढू शकतो. Kalyan's distribution.

आज जाणवत दोन्ही गोष्टीत मनाचा बालिशपणा होता.

आपला पगार किती टक्क्यानी वाढला? कोणत रेटींग मिळाल? पदोनत्ती(Promotion) झाली का नाही? हे जरी आज यक्षप्रश्न वाटत असले तरी काही दिवसानी हा पण बालिशपणाच वाटेल?

बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय मला वाटत यामध्ये फारच अंधुक रेषा आहे?

3 comments:

  1. माझा भाऊ आणि कल्याण हे दोघे शोध लावण्यासाठी प्रयत्ण करत असतील पण मी मात्र काही तरी गम्मत म्हणून यांचा भगीदार..आणी खर सांगयच झाल तर गंधक वगैरे चोरलेच म्हणावे कारण हे मला व मित्राला बाहेर पहणीवर ठेवयचे.
    कल्याणच्या घरीच दुपारी personal lab मध्ये प्रयोग चालयचे. रसायने एक-मेकात मिसळून घाबरून पळत सुटायचो...अता या गोष्टींना फार काळ गेला..जो तो नविन शोधासाठी (बहूतेक पैसाच्याच) घरा बाहेर पडला.
    अता नवीन शोध लावायला जमत नाही कारण परत सवॉना एकत्र यायला वेळ नाही..बहूतेक चोरी करायलाही जमणार नाही...जमलेच तर फटके पडण्याची भिती आहे...अता काळ इतका बदलला आहे की मित्राचा शोध घ्यायला आँरकूट-चिरकूट ची मदत लागते...
    शेवटी फक्त एकच प्रश्न उरतो...ज्या शोधासाठी आपण सगळे विलग झालो ते आपणाला मिळालका??? मिळाल तर त्याचा आनंद लहाणपणीच्या आनंदा एवढा वाटतो का???

    ReplyDelete
  2. bag म्हणजे पिशवी
    Distribution म्हणजे वर्गीकरण

    ReplyDelete