Tuesday, February 23, 2010

हडळीचा जन्म

हडळीचा जन्म


(द. मा.ची माफी मागुन)

मे महिना म्हटला म्हणजे आमच्या घरात गोकुळ. माझे आते, मामे, मावस, चुलत मामे भावंड अशी १०,१२ मुल असायचीच. असाच एका मे महिन्यातली गोष्ट.

आमच्या समोरच्या घरात बाधंकाम चालू होत. आमच अंगण मोठ असल्यामुळे बाधंकामासाठी लागणार्या सळया आमच्याच दारात (अंगणात होत्या). त्याकाळी फलटणमध्ये मंगळवारीच लाईट जायची (आज काल रोजच मंगळवार असतो).

संध्याकाळची ७,८ ची वेळ. घरामध्ये आम्ही फक्त भांवडेच (मी, माझी ताई आणि दोन लहान भाऊ) होतो. अचानक लाईट गेली. कोणीतरी मेणबत्ती आणायला आत गेल back-up (????) ची सोय नव्हतीच. कोणीतरी दार बंद केल. ५,१० मिनीट अशीच गेली. घरात तशी शांतता नव्हतीच पण फार गोधंळपण नव्हता. अचानक माझ्या ताईला कसलातरी आवाज आला....

तिन आम्हाला सर्वाना सांगितल. पण आशी चेष्टा तर कायमच चालायची, त्यामुळ फारच कुणीच लक्ष दिल नाही. दोन मिनीटानी परत आवाज आला. यावेळी माझा लहान भाऊ पण म्हणाला हो मला पण आवाज आला. छुम छुम..

आता मात्र घरात निरव शांतता पसरली. २ मिनीट गेली, ३ मिनीट गेली आणि अचानक परत एकदा आवाज. छुम छुम...

आता मात्र आम्हा भांवडाची अवस्था वाईट झाली. काय कराव आणि काय नको. प्रत्येकाच्या मनात भीती होतीच पण कोणी बोलुन दाखवत नव्हत. दोन चार मिनट अशीच गेली. परत एकदा आवाज आला. माझा लहान भाऊ ओरडला 'हडळ'. मग मात्र सर्वजण घाबरलेच.

दार उघडून बघाव की नको?

माझी ताई दारापाशी गेली, सर्वजण आम्ही घाबरलेलो होतोच. दार उघड म्हणाव की नको?

परत आवाज. ताईन दार उघडल आणि बघतीत तर काय?

एक चिचुंद्री लोखंडी सळई वरुन जात होती त्यामुळे आवाज येत होता. मग मात्र आमच्यात हशा पसरला.

त्यागोष्टीतुन एकच शिकलो. प्रत्येकाच्या मनात 'हडळ' असतेच आपण फक्त दार उघडुन बघाच, ती खरी आहे का? दार उघडण्यासाठी मात्र खुप मनाची तयारी असवी लागते. आज सुध्दा अनेक ठिकाणी दार उघडायची भिती वाटते.

No comments:

Post a Comment