Tuesday, February 16, 2010

परवा काही कामनिमित्त निगडीला गेलो. जातानी चिंचवड मार्गे गेलो. या भागाबद्दल काही आठवणी आहेत. त्या परत एकदा ताज्या झाल्या.


तारीख २० जुलै २००८, रविवारचा दिवस. त्याकाळी रविवारी मी बायकोला भेटायला सासुरवाडीला जायचो. (सुज्ञ वाचकासाठीः बायको मला सोडुन गेली नव्हती, जायची खुप शक्याता आहे.). २० जुलै २००८ ला पण रविवार मी सासुरवाडीला गेलो. नेहमी प्रमाणे त्यांनी राहण्याचा आग्रह केला, नेहमी प्रमाणे मी नाही म्हणणार अस त्यांना वाटल असणार. पण मी हो म्हणालो. Sixth sense (????????) म्हणतात तो काय?

रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. बायकोच्या पोटात दुखायला लागल. थोडावेळ वाट बघितली पण ते हळू हळू वाढू लागल्याने दवाखान्यात नेण्याच ठरवल.चिंचवड मधील कामताचा दवाखाना. पहाटे ४,५ पर्यत आम्ही तिथ पोचलो. नेहमी प्रमाणे Check-up (??????) झाल्यावर त्यांनी Admit(???? करुन घेतल. चढणार्या सुर्याबरोबर बायकोला होणारा त्रास पण वाढत गेला. तोपर्यत माझ्या घरी फोन करुन माझ्या घरच्याना बोलावुन घेतले. संकष्टी असल्याने आम्हा सर्वाचे उपवास होते. बायकोला होणारा त्रास बघुन मी डॉक्टराना काही करता येईल म्हणुन विचारले. डॉक्टर म्हणाले "मी डॉक्टर आहे. तुमच्या बायकोचा पण जन्म माझ्याच दवाखान्यात झाला आहे. मला काय आणि केव्हा करायच ते कळत". काहिहि असो तो त्रास मला बघवत नव्हता. दुपारचे तीन वाजले बायकोला Operation theater (??????) मध्ये नेल. पावणे चार, चार च्या आसपास मला काही पेपर सही करण्यासाठी देण्यात आले. पेपर वाचण्याच्या तर मनस्थितीत मी नव्हतो पण साधारण पणे Operation च्या वेळेस काही झाल तर डॉक्टराची जवाबदारी नाही वगरै,वगरै. मी सही करुन दिले. पण मनात मात्र आताच का पेपरवर सही घेतली. म्हणतातना 'वैरी न चिंती ते मन चिंती'.

चार सव्वाचारच्या आसपास, डॉक्टर बाहेर आले "तुम्हाला मुलगा झाला, बाळ आणि बाळणतिण सुखरुप आहे" बस्स. त्यानंतर म्हणे एकतास मी पुढ रडत होतो. जवळच्याना फोन वर पण सर्वजण तेच सांगत होते "बाळ आणि बाळणतिण सुखरुप आहे फक्त बाळाचे बाबा रडत आहेत"

आमच्या घरात सर्वाची गणपतीवर फार भक्ती, आईच्या तर कडक संकष्टी असते. आणि त्या दिवशी हि संकष्टीच होती. हा दुग्धशर्करा योगच म्हणाला पाहिजे.

खरच ते लहान बाळ पाहिल्यावर माझ्या आई वडीलानी मला कस मोठ केल असेल यांचे आश्चर्यच वाटत राहीले.

No comments:

Post a Comment