Tuesday, February 23, 2010

हडळीचा जन्म

हडळीचा जन्म


(द. मा.ची माफी मागुन)

मे महिना म्हटला म्हणजे आमच्या घरात गोकुळ. माझे आते, मामे, मावस, चुलत मामे भावंड अशी १०,१२ मुल असायचीच. असाच एका मे महिन्यातली गोष्ट.

आमच्या समोरच्या घरात बाधंकाम चालू होत. आमच अंगण मोठ असल्यामुळे बाधंकामासाठी लागणार्या सळया आमच्याच दारात (अंगणात होत्या). त्याकाळी फलटणमध्ये मंगळवारीच लाईट जायची (आज काल रोजच मंगळवार असतो).

संध्याकाळची ७,८ ची वेळ. घरामध्ये आम्ही फक्त भांवडेच (मी, माझी ताई आणि दोन लहान भाऊ) होतो. अचानक लाईट गेली. कोणीतरी मेणबत्ती आणायला आत गेल back-up (????) ची सोय नव्हतीच. कोणीतरी दार बंद केल. ५,१० मिनीट अशीच गेली. घरात तशी शांतता नव्हतीच पण फार गोधंळपण नव्हता. अचानक माझ्या ताईला कसलातरी आवाज आला....

तिन आम्हाला सर्वाना सांगितल. पण आशी चेष्टा तर कायमच चालायची, त्यामुळ फारच कुणीच लक्ष दिल नाही. दोन मिनीटानी परत आवाज आला. यावेळी माझा लहान भाऊ पण म्हणाला हो मला पण आवाज आला. छुम छुम..

आता मात्र घरात निरव शांतता पसरली. २ मिनीट गेली, ३ मिनीट गेली आणि अचानक परत एकदा आवाज. छुम छुम...

आता मात्र आम्हा भांवडाची अवस्था वाईट झाली. काय कराव आणि काय नको. प्रत्येकाच्या मनात भीती होतीच पण कोणी बोलुन दाखवत नव्हत. दोन चार मिनट अशीच गेली. परत एकदा आवाज आला. माझा लहान भाऊ ओरडला 'हडळ'. मग मात्र सर्वजण घाबरलेच.

दार उघडून बघाव की नको?

माझी ताई दारापाशी गेली, सर्वजण आम्ही घाबरलेलो होतोच. दार उघड म्हणाव की नको?

परत आवाज. ताईन दार उघडल आणि बघतीत तर काय?

एक चिचुंद्री लोखंडी सळई वरुन जात होती त्यामुळे आवाज येत होता. मग मात्र आमच्यात हशा पसरला.

त्यागोष्टीतुन एकच शिकलो. प्रत्येकाच्या मनात 'हडळ' असतेच आपण फक्त दार उघडुन बघाच, ती खरी आहे का? दार उघडण्यासाठी मात्र खुप मनाची तयारी असवी लागते. आज सुध्दा अनेक ठिकाणी दार उघडायची भिती वाटते.

Tuesday, February 16, 2010

परवा काही कामनिमित्त निगडीला गेलो. जातानी चिंचवड मार्गे गेलो. या भागाबद्दल काही आठवणी आहेत. त्या परत एकदा ताज्या झाल्या.


तारीख २० जुलै २००८, रविवारचा दिवस. त्याकाळी रविवारी मी बायकोला भेटायला सासुरवाडीला जायचो. (सुज्ञ वाचकासाठीः बायको मला सोडुन गेली नव्हती, जायची खुप शक्याता आहे.). २० जुलै २००८ ला पण रविवार मी सासुरवाडीला गेलो. नेहमी प्रमाणे त्यांनी राहण्याचा आग्रह केला, नेहमी प्रमाणे मी नाही म्हणणार अस त्यांना वाटल असणार. पण मी हो म्हणालो. Sixth sense (????????) म्हणतात तो काय?

रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. बायकोच्या पोटात दुखायला लागल. थोडावेळ वाट बघितली पण ते हळू हळू वाढू लागल्याने दवाखान्यात नेण्याच ठरवल.चिंचवड मधील कामताचा दवाखाना. पहाटे ४,५ पर्यत आम्ही तिथ पोचलो. नेहमी प्रमाणे Check-up (??????) झाल्यावर त्यांनी Admit(???? करुन घेतल. चढणार्या सुर्याबरोबर बायकोला होणारा त्रास पण वाढत गेला. तोपर्यत माझ्या घरी फोन करुन माझ्या घरच्याना बोलावुन घेतले. संकष्टी असल्याने आम्हा सर्वाचे उपवास होते. बायकोला होणारा त्रास बघुन मी डॉक्टराना काही करता येईल म्हणुन विचारले. डॉक्टर म्हणाले "मी डॉक्टर आहे. तुमच्या बायकोचा पण जन्म माझ्याच दवाखान्यात झाला आहे. मला काय आणि केव्हा करायच ते कळत". काहिहि असो तो त्रास मला बघवत नव्हता. दुपारचे तीन वाजले बायकोला Operation theater (??????) मध्ये नेल. पावणे चार, चार च्या आसपास मला काही पेपर सही करण्यासाठी देण्यात आले. पेपर वाचण्याच्या तर मनस्थितीत मी नव्हतो पण साधारण पणे Operation च्या वेळेस काही झाल तर डॉक्टराची जवाबदारी नाही वगरै,वगरै. मी सही करुन दिले. पण मनात मात्र आताच का पेपरवर सही घेतली. म्हणतातना 'वैरी न चिंती ते मन चिंती'.

चार सव्वाचारच्या आसपास, डॉक्टर बाहेर आले "तुम्हाला मुलगा झाला, बाळ आणि बाळणतिण सुखरुप आहे" बस्स. त्यानंतर म्हणे एकतास मी पुढ रडत होतो. जवळच्याना फोन वर पण सर्वजण तेच सांगत होते "बाळ आणि बाळणतिण सुखरुप आहे फक्त बाळाचे बाबा रडत आहेत"

आमच्या घरात सर्वाची गणपतीवर फार भक्ती, आईच्या तर कडक संकष्टी असते. आणि त्या दिवशी हि संकष्टीच होती. हा दुग्धशर्करा योगच म्हणाला पाहिजे.

खरच ते लहान बाळ पाहिल्यावर माझ्या आई वडीलानी मला कस मोठ केल असेल यांचे आश्चर्यच वाटत राहीले.

Thursday, February 11, 2010

Break के बाद

बरेच दिवसानंतर आज परत काही तरी लिहावस वाटल.


काही मित्रानी सांगितल "तुझ लिखाण अगदी सकाळ मध्ये देण्यासारख आहे"  ऐवढ्याच वाक्यावर तो थांबला असता तर बस झाल असत. "अरे किती शुध्दलेखनाच्या चुका!".

काहिजण म्हणाले "गोष्ट/प्रंसग अजुन निट लिहता आली/आला असती/असता?"

काहिजण म्हणाले "थापा".

म्हणुन म्हटल नकोच लिहायला. पण नंतर वाटल आपण कुणासाठी लिहतो? कुणी वाचाव म्हणुन की आपल्यासाठी? खरच उत्तर द्यायच झाल तर स्वःतासाठी ५०% दुसर्यासाठी ५०%.
आज ठरवल दुसर्या ५०% सोडुन देऊ.

अनेकानी विचारल का रे बाबा थांबवलस लिखाण?

परत एकदा लिखाण सुरु करतो आहे. शुध्दलेखनाच्या चुका टाळुन, आकर्षक पण थापा वाटु नये.(कस शक्य आहे?) अस करण्याचा प्रयत्न करीन.

Wednesday, February 3, 2010

Mother regiment

आर्मीमध्ये ज्या रेजिमेंटला तुम्ही पहिल्यादा join करता तिला mother regiment म्हणतात (बहुदा). पुढे तो माणुस कुठे हि जावो पण mother regiment एकच असते. प्रत्येकाची नाळ त्याच रेजिंमेटशी जुळलेली असते.

कार्यालयात (मराठीत office) येण्यासाठी मी पुर्वी शिवाजी नगर रुटची बस पकडायचो (का घ्यायचो? का बसायचो?) हि बस मला खरोखर mother regiment च वाटती. बसमध्ये आम्ही पत्ते खेळायचो. पत्त्यामध्ये आम्ही अनेक खेळ (म. game) शोधुन काढले. ब्रिजमेंट (ब्रिज + जजमेंट) किंवा अशे अनेक. office जाण सुध्दा आनंददायी होत.

बसच सरासरी वय (म. avarage age) कमी असल्यामुळे म्हणा कि सर्वाच्यात काही एक सारखे पणा होता म्हणून म्हणा, पण आम्हीच्यातली मैत्री घट्ट झाली. सगळ्याचे सगळे विचार पटलेच अस नाही. पण त्यामुळे काही problem हि आला नाही.

बसमधले काही लोक कंपनी सोडून गेले. पण बसशी असणारा संबध संपला नाही. आशा लोकाना भेटायला/पत्ते खेळायला म्हणून एके रविवारी भेटलो. इतके आमचे संबध घट्ट झाले होते (आहेत).

सुरवातीला एका बसमधुन office ला जाणारी माणस एवढची ओळख. पण आज नक्कीच यापेक्षा जास्त.

बसमधे चालणारी चेष्टा मस्करी किंवा कुणाच लग्न ठरली कि त्याला/तिला त्रास होई पर्यत चिडवणे या गोष्टी खुपच comman होत्या. बस मधुन उतरल्यावर कुठल्यातरी हॉटेलात बसणे हे ही तितकच comman होत. पण आजकाल मी हे सगळ miss (miss ला इंग्रजीत काय म्हणतात?) करतो?

काही दिवसापुर्वी मी ती बस बदलली. नविन बस आणि त्या मधील मंडळी तितकीच चांगली आहे.
 पण Mother regiment is Mother regiment.