Sunday, December 26, 2021

चित्रपट आर्.के./RKay

 आर्.के./RKay

२०१४ मधील चार्ली (Charlie McDowell) दिग्द



र्शित The One I Love हा खूप छान चित्रपट आहे (त्या चित्रपटाबद्दल परत कधी), त्याच चित्रपटाच्या विषयावरून प्रेरणा घेऊन एक अस्सल भारतीय कलाकृती म्हणजे आर्.के. (RK).

         लेखक, दिग्दर्शक व अभिनेता आर्.के. एक चित्रपट बनवत असतो. आर्.के. स्वतःच्याच चित्रपटात मेहबूब (Mahboob) ही नटाची भूमिका साकारत असतो. चित्रीकरण पूर्ण होत, पण चित्रपटाचा शेवट (हिरो मरण्याचा) बर्‍याच जणांना आवडत नाही. चित्रपटाच संकलन (editing) चालू असताना चित्रफितीतून मेहबूब गायब होतो.

गायब झालेला मेहबूब खर्‍या जगात येतो. त्याला समजावून चित्रपटात परत पाठवण्याच्या तयारीत असतानाच चित्रपटाचा खलनायकसुध्दा खर्‍या जगात येतो.

आर्.के. मेहबूबला चित्रपटात पाठवू शकतो का नाही हे चित्रपटातच पहावे.

अतिशय सुंदर अभिनय, संवाद व दिग्दर्शन. चित्रपटाची सुरुवात चुकवू नका.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. 

भाषा: हिंदी

नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट


गेले तीन आठवडे मी #PIFF2021 मध्ये जे मी चित्रपट पाहिले त्याबद्दल लिहले. हे चित्रपट म्हणजे वेगवेगळी फुले. त्यांना एकत्र गुंफण्याचा हा प्रयत्न. त्यामध्ये कुणाला गुलाब आवडेल तर कुणाला चाफा.

परत एकदा धन्यवाद PIFF अशी फुली वेचून रसिकांसमोर ठेवल्याबद्दल. विशाल शिंदे (Vishal Shinde) तुझेसुध्दा मनःपूर्वक आभार.  

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. 

इति PIFF2021 लेखनसीमा

Saturday, December 25, 2021

चित्रपट ईलीरालारे अलगिरे होगालारे (illiralaare allige hOgalaare)/Neither Can I Stay Here nor Journey Beyond.

 ईलीरालारे अलगिरे होगालारे (illiralaare allige hOgalaare)/Neither Can I Stay Here nor Journey Beyond.

चित्रपटात दोन कथा आहेत. 



कथा-१ (१९६०च्या दशकातील) किरवंताच्या घरी काम करणारी एक स्त्री, तिचा नावाडी नवरा व नागा नावाचा त्यांचा मुलगा. अतिशय शांत असे हे खेडे, पण शिक्षण व पैसे कमवण्यासाठी नागा खेड्यातून पळण्याचा प्रयत्न करतो. तो त्यात यशस्वी होतो का? तो शिक्षण घेऊ शकतो का? हे चित्रपटातच पहावे.

कथा-२ (२०१० च्या दशकातील) बंगलोरमध्ये उच्चशिक्षित परिवारात राहणारा पुंडलिक (पुंडा) नावाचा मुलगा. घरातील मालकाने आपल्या लहान मुलीला संभाळायला ठेवलेला. तो त्याच घराचा एक अविभाज्य भाग बनून गेलेला असतो. त्यांचा परिवार खेडेगावात राहणारा. पुंडाला खेडेगावात परत जायचे असते.

दोन भिन्न कथा, पण एक सामायिक धागा असलेल्या.

या दोन कथा एकमेकांत कशा गुंफल्या आहेत हे चित्रपटातच पहावे.

सर्वाचे अभिनय उत्तम, छान दिग्दर्शन व सुरेख चित्रीकरण असणारा हा चित्रपट. चित्रपटात काही घागे अधांतरी सोडले आहेत असे वाटते. 

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. 

भाषा: कन्नड

खरं तर कथानक नसलेला पण तुम्हाला दोन तास खेळवून ठेवणारा व नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट

Friday, December 24, 2021

चित्रपट पिंकी इली (Pinki Elli?) /Where is Pinki?

 पिंकी इली (Pinki Elli?) /Where is Pinki?



बिंदू व गिरीश हे एक जोडपे व बिंदूनी बाळाला(पिंकी) सांभाळायला ठेवलेली सन्नम्मा (Sannamma) आया. सन्नम्मा बाळ संभाळण्याच्या नावाखाली पिंकीचा वापर भीक मागण्यासाठी करत असते. बिंदू एके दिवशी लवकर घरी येते त्या वेळेस पिंकी व सन्नम्मा घरी नसतात. त्याच दिवशी सन्नम्माकडून पिंकी हरवली जाते.

पोलिसात तक्रार करण्याच्या वेळी प्रेक्षकांना समजत की गिरीश हा बिंदूचा मित्र असतो तर खरे वडील मंजूनाथ हे आहेत. पिंकीचा हरवल्यापासूनचा प्रवास हा चित्रपटातच पहाण्यासारखा आहे.

पिंकी सापडते का? ती सापडली तरी ती कोणाकडे सोपवण्यात येते? बिंदू ही निष्काळजीपणाने वागते असे मंजूनाथला वाटते तर मंजूनाथ पिंकीला भेटायला एकदा ही आलेला नसतो. त्यामुळे तिला कोणाकडे सोपवण्यात येते या प्रश्नाचे उत्तर चित्रपटच देईल.

वेगळा विषय व त्या विषयाला दिलेली अनपेक्षित कलाटणी हे लेखक व दिग्दर्शक पृथ्वी(Prithvi Konanur) यांना छान जमले आहे. जवळपास सर्वच कलाकारांचे अभिनय छान आहेत.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.

भाषा: कन्नड

नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट

Thursday, December 23, 2021

चित्रपट सिस्टर! दि समर वी फाउंड आवर सुपरपॉवर/Tottori! Sommeren vi var alene

 सिस्टर! दि समर वी फाउंड आवर सुपरपॉवर/Tottori! Sommeren vi var alene




वेगा (Vega) नऊ वर्षाची मुलगी व तिची पाच वर्षाची लहान बहीण बिल्ली (Billie) आपल्या वडिलांबरोबर नॉर्वेजियन वूड्स येथे सफरीसाठी जातात. सफरीसाठी निवडलेले ठिकाण खूपच निर्जन असते. या तिघांशिवाय कोणीच नसलेले हे ठिकाण.

दोघीजणी सराफीचा आनंद मस्त लुटत असतात. पण अचानक त्यांचे वडील डोंगराच्या कपारीत अडकून पडतात व त्याचा पाय दुखावतो.

वडिलांना कपारीतून काढणे दोघींना शक्य नसल्यामुळे त्यांना मदतीसाठी परत सफरीच्या सुरुवातीच्या ठिकाणी जावे लागणार असते. जंगलातून जाताना त्या रस्ता चुकतात.

त्या परत जातात का? वडिलांची सुटका करू शकतात का? हे चित्रपटातच पहावे.

लेखकाने घेतलेल्या चित्रपट स्वातंत्र्याकडे सहज दुर्लक्ष करत हा ७७ मिनिटांचा अतिशय हलकाफुलका चित्रपट नक्कीच बघू शकतो. दोन्ही लहान मुलीचा अभिनय फारच सुरेख आहे.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.

भाषा: नॉर्वेजियन

नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट

Wednesday, December 22, 2021

चित्रपट मध/Tēṉ/Thaen



 मध/Tēṉ/Thaen

निलगिरी (कुरिंजिपाड़ी) पर्वतावर राहणारा वेलू हा मध गोळा करण्याच काम करणारा, त्यांची गाठ शेजारील खेड्यात राहणारी पुनगुडीशी (Poongodi) होते व ते लग्न करण्याचे ठरवतात. निसर्ग देवता या लग्नाला मान्यता देत नाही (निसर्ग देवतेला लावलेला कौल चित्रपटातच पहावा). तरी ही ते लग्न करतात. यथावकाश त्यांना एक मुकी मुलगी होते.

काही वर्षानंतर पुनगुडीच्या पोटात दुखायला लागते. डोंगराखाली असणार्‍या शहरात नेल्यावर त्यांना कळत तिला असाध्य रोग झाला आहे.

वेलूकडे भारतीय असण्याचा कोणताच पुरावा नसतो. तिच्या उपचारासाठी वेलूला आधारकार्ड, रेशन कार्ड काढावे लागते. त्यासाठी होणारा त्रास चित्रपटात फारच चांगला रंगवला आहे. तथाकथित समाजसेवक, सरकारी अधिकारी, डॉक्टर यांचे छान चित्रण चित्रपटात पहावयास मिळते.

हा आजार तिला का होतो? या सर्वानंतर ती बरी होती का? हे चित्रपटातच पहावे.

संवाद व अभिनय छान आहे. चित्रीकरण अतिशय सुरेख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट पहाताना तुम्ही त्या जंगलात गेल्याचा भास होतो.

वेलूच्या डोंगरावरील घरात लाईट व लाईटच मीटर तांत्रिकदृष्ट्या चुकीचे वाटतात.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. sonyliv वर बहुधा आहे.

भाषा: तामिळ

नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट

Tuesday, December 21, 2021

चित्रपट अरण्येर दिन रात्री /Days and Nights in the Forest

 अरण्येर दिन रात्री /Days and Nights in the Forest



चार वेगवेगळे विचार, वेगवेगळे सामाजिक स्तर असूनसुद्धा घट्ट मैत्री असणारे मित्र.

आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून जंगलात चार दिवस फिरायला येतात.

सर्वमान्य नियमांना झुगारुन त्यांना हे चार दिवस घालवायचे असतात. त्यांची सुरुवात फॉरेस्ट हाऊस मध्ये विनापरवानगी राहण्यापासून होते.

त्याच वेळेस तेथेच अपर्णा व जया (अपर्णाची विधवा भावजय) ह्यासुध्दा जंगलात राहायला आलेल्या असतात.

सहा समवयस्क व्यक्तीमध्ये परस्पर संवाद व वेगवेगळ्या घटना ह्या चित्रपटातच पाहणे गरजेचे आहे. गावातील जत्रेच्या वेळेस ज्याच्या त्याच्या आवडीनावडीनुसार जत्रेचा आनंद घेतात.

या काळात चार पैकी तीन मित्र एकएक गोष्ट हरवतात (अस मला वाटलं) ती कोणती ते चित्रपटातच पाहावी.

१९७० च्या आसपासचा चित्रपटाचा विषय आज सुद्धा कालबाह्य होत नाही हे त्याचं वैशिष्ट्य. सत्यजित रे यांचे चित्रपट नुसते चित्रपट म्हणून बघता येत नाहीत.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. Youtube वर उपलब्ध आहे.

भाषा: बंगाली

एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट.

Monday, December 20, 2021

चित्रपट काळोखाच्या पारंब्या /Prop Shoots of Darkness



 काळोखाच्या पारंब्या /Prop Shoots of Darkness

रंगमंचावरील व घरातील कलाकार यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. तसेच संयमाच्या अभावाने कलाकाराचे काय होऊ शकते, हेच सांगणारा  मकरंद अनासपुरे दिग्दर्शित चित्रपट म्हणजे काळोखाच्या पारंब्या.

अलिफ एक छोटा खेड्यात राहणारा व सर्वांची मदत करून आपले पोट भरणारा तरुण पोरगा. त्याच गावात रहिमचाचा हा झाडपाल्याचे औषध देणारा व डफ वाजवणारा कलाकार. 

तावून सुलाखून रहिमचाचा अलिफला डफ शिकण्यासाठी आपला शिष्य बनवतात.

त्याच वेळेस रहिमचाचाची भौतिक सुखाची आवड असणारी तिसरी बायको गावात येते. 

भौतिक सुख की कलेची सेवा यामध्ये अलिफला निवड करण्याची वेळ येते. त्या वेळेस तो कशाची निवड करतो हे चित्रपटात पाहणे उचित होईल.

(माझे वैयक्तिक मत कलाकारांनी दोन्ही मिळवावे)

 डफ ऐकून फरिश्ते (देवदूत) येतात त्या वेळेचे दृश्य परिणाम (VFX) जरा चांगले हवे होते. डफ शिकण्याची सुरुवात व पारंगतता यामध्ये फारच कमी वेळ दाखवला आहे.

सिद्धहस्त कलाकार मकरंद अनासपुरे एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आहेत. वैभव काळे अलिफची भूमिका जगले आहेत. या दोन्ही कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. 

भाषा: मराठी

एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

Sunday, December 19, 2021

चित्रपट जून/June

 जून/June


निल औरंगाबादवरून पुण्याला शिकायला आलेला मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. काही कारणामुळे (हे चित्रपटातच पहावे) तो नापास होऊन उद्विग्न अवस्थेत औरंगाबादला परत येतो. त्याच वेळेस नेहा (निलच्या शेजारी राहणार्‍या अभिदादाची बायको) उद्विग्न  अवस्थेत त्यांच्याच शेजारी राहायला येते. निल पुण्यातील घटना ज्या आई-वडीलांशी बोलू शकत नसतो त्या तो मनमोकळेपणाने नेहाशी बोलू शकतो.

ते एकमेकांच्या जखमेवर फुंकर मारून घाव भरण्याचा (heal) प्रयत्न करतात. यामध्ये त्यांना यश येत की अपयश हे चित्रपटातच पहावे.

सर्वांचे अभिनय सुरेख आहेत. विषयाची खोली व चित्रपटांची लांबी (९४ मिनिटे) ही तारेवरची कसरत फारच छान जमली आहे.

OTT platform मुळे कारण नसताना अश्लील दृश्य घालण्याचा मोह टाळता आला असता तर फार बरं झाल असत. काही दृश्य नक्कीच कथा पुढे घेऊन जातात पण काही दृश्य  नक्कीच टाळता आली असती.

चित्रपटाचे नाव खरच गुढ आहे. मला वाटत, उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाण्यासाठी एका रात्रीचा पाऊस पुरेसा असतो तो जून मध्ये येतो! यापेक्षा वेगळा व जास्त संयुक्तिक नावाचा अर्थ असू शकतो.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.  Planet Marathi वर उपलब्ध आहे.

भाषा: मराठी

एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

Saturday, December 18, 2021

चित्रपट Another Round/Druk

 Another Round/Druk


मार्टिन, टॉमी, निकोलाज व पिटर हे एका उच्च माध्यमिक शाळेत वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक व एकमेकांचे मित्र आहेत सर्वाच्या शिकवण्यात एकसुरीपणा आल्यामुळे त्यांच्याकडे विद्यार्थी लक्ष देत नसतात. जवळपास हीच परीस्थिती प्रत्येकांच्या घरात असते.

त्यातील एक मित्र सांगतो की विशिष्ट प्रमाणात दारूचे (मद्य) सेवन केले तर आपल्या सर्जनशीलतेत लक्षणीय वाढ होते.

सर्वजण हा प्रयोग करायला तयार होतात. मद्याचे सेवन ०.०५% ठेवून प्रयोग सुरू होतो. मार्टिन हा इतिहासाचा शिक्षक चर्चिल,  रुझवेल्ट व  हिटलर यांच्यातील फरक इतका छान सांगतो तो चित्रपटातच बघणे गरजेचे आहे. घराच्या बाजूवरही सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. 

हळू हळू मद्याचे प्रमाण वाढवले जाते. थोडेच दिवसात ते प्रमाण फारच वाढते त्यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम दिसायला लागतात. पुढे काय होत हे चित्रपटातच बघावे.

संवाद ऐकण्यासारखे (मी वाचले) आहेत. अभिनय व पार्श्‍वसंगीत छान आहे. शेवटच्या दृश्यात मार्टिन यांनी केलेला डान्स अप्रतिम आहे. तो डान्स करण्याची फरमाइश चित्रपटात सुरुवातीपासून होत असते. चांगला दिग्दर्शक असे हुकमाचे एक्के एकदाच वापरतो. दिग्दर्शक थॉमस (Thomas Vinterberg) यांची छाप प्रत्येक दृश्यात बघायला मिळते. 

नक्की पाहण्यासारखा चित्रपट.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

भाषा: दानिश

Friday, December 17, 2021

चित्रपट गोदाकाठ /Godakaath

 गोदाकाठ /Godakaath



सध्या मराठीत कार्यरत असणाऱ्या गुणी दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे.

प्रीती (मृण्मयी गोडबोले, Mrinmayee Godbole) ही एका  आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्यावर असते, सतत वरच्या हुद्यावर जाण्याच्या मोहात ती अनेक बरे वाईट निर्णय घेते. वेगवेगळी व्यसने व जीवनाबद्दल बेफाम असणारी गर्भवती (प्रेंगनंट) राहते. तिला होणाऱ्या बाळाच्या वडिलांबद्दल तिला खात्रीने सांगता येत नसत. त्यातच कामावर तिने घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले असतात. या सर्वाला वैतागून ती धकाधकीचे जीवन सोडून गोदा काठी येते. ती जगायला कंटाळलेली असते.  तिथे तिला सदानंद (किशोर कदम, Kishor Kadam) ही व्यक्ती आपपरभाव न ठेवता मदत करते. सदानंदचे जीवन उद्ध्वस्त झालेले असते ते कसे? हे चित्रपटात बघणे उचित होईल.

सदानंदाची गाठ पडल्यावर प्रीतीमध्ये काही बदल होतो का? जीवनाला वैतागलेली प्रीती पुढे काय करते हे चित्रपटातच पाहावे.

चित्रपटाचे संवाद उत्तम, अभिनय अप्रतिम व या सर्वात कळस म्हणजे दिग्दर्शन. फक्त काही दृश्य (अश्लील, बीभत्स) जी कथानक पुढे घेऊन जात नाहीत ती टाळता आली असती. कदाचित OTT platform चे दुष्परिणाम.

एकंदरीत एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.

भाषा: मराठी

Thursday, December 16, 2021

चित्रपट ब्रिज/Bridge


 ब्रिज/Bridge

ब्रह्मपुत्रेला आसामचे अश्रू म्हणतात यांची भौगोलिक कारणे लहानपणी सर्वांनी दिली असतील, पण हा चित्रपट पाहिला की त्यांची भीषणता चांगलीच समजते.

ब्रह्मपुत्रेच्या एका उपनदीवर असलेला पूल वाहून गेला त्या वेळी ते पार करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष वाहून जातो. जोनाकी (वाहून गेलेल्यांची मुलगी), बापूकान (मुलगा) व बायको (तिला अपस्माराचा आजार जडतो) असे तीन व्यक्ती राहतात. जोनाकीला एका पुरुषाप्रमाणे शेतात काम करणे भाग पडते. 

नदी पलीकडे असलेल्या शाळेत नदीतून कपडे काढून चालत दाखवलेली मुलं काळजाला पीळ पाडून जातात. नेमके त्याच वेळेस केळीचे खांबांपासून बनवलेल्या नावेतून कुणी येत असेल तर ती मुले तशीच पाण्यात थांबतात त्या वेळेस हसावे का रडावे हेच कळत नाही.

जोनाकीचे शेतात काम करणारे फोटो बघून एक वार्ताहर ती बातमी टीव्ही वर दाखवतो. तो तिच्या प्रेमात पडतो. त्यांच्या आई वडिलांना ही गोष्ट कळते. ते जातपात न मानता मुलीला बघण्यासाठी येण्याचे ठरवतात. पण नदीला पूल नसल्यामुळे ते परत जातात. ह्या मुळे लहानगा बापूकान नदीवर चिडून तिच्यात माती टाकून तिला बुजवण्याचा बालिश प्रयत्न करतो. जोनाकी आपल्या लहान भावाला समजावते की ही नदी म्हणजेच आपले जीवन आहे. जोनाकीला आपले बैल विकावे लागतात (फिल्मी घटना). आशा रितीने या कुटुंबावर सर्व बाजूने अडचणीचा मारा होतो.

यात आणखीन भर म्हणजे, रात्री जोरदार पाऊस सुरू होतो. हाताला लागतील त्या वस्तू घेऊन हे कुटुंब नदीपासून दुर जाण्याचे प्रयत्न करते. पाण्यातच आईला आकडी येऊन मरण पावते.

जोनाकी व बापूकान कसेबसे वाचतात. तोच वार्ताहर पुराचे चित्राकांन करण्यासाठी आलेला असतो. त्यांची व जोनाकीची भेट होते.

तो तिचा स्वीकार करतो का? का जोनाकीच परिस्थितीचा स्वीकार करते हे चित्रपटातच पाहणे गरजेच आहे.

सर्वाचे अभिनय अप्रतिम आहेत. जोनाकीच काम केलेली शिवा राणी (Shiva Rani Kalita) ही भूमिका जगली आहे. बैलाच्या मदतीने शेत नांगरताना शिवा राणी ही जोनाकीच वाटते. दिग्दर्शक क्रिपाल (Kripal kalita) यांनी घेतलेली मेहनत चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात दिसते.

आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.

भाषा: आसामी

Wednesday, December 15, 2021

चित्रपट ताठ कणा/Standing Tall

 ताठ कणा/Standing Tall




डॉ. पी.एस. रामाणी(P. S. Ramani) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट.  सदर चित्रपटात रामाणी सरांचे बालपणापासून ते PLIF चा शोध लागण्यापर्यंतचा प्रवास चित्रित केलेला आहे.

एका छोट्याशा घटनेतून डॉक्टर साहेबांना PLIF शस्त्रक्रियेचा शोध लागतो. ती घटना पडद्यावरच छान दिसते.

उमेश कामत यांनी तरुणपणापासून जवळपास साठीपर्यंतचे  डॉ. रामाणी सुंदर रंगवलेले आहेत. शरीरात होणारे बदल, बोलण्यातले बदल हे अतिशय छान दाखवले आहे. उमेश कामत यांनी घेतलेले कष्ट सहज दिसतात.

डॉ. रामाणी इंग्लंडमध्ये असतानाच्या दृश्यात (जे भारतातच चित्रित केलेले आहेत) तांत्रिक परिणाम फारसे चांगले जमले नाहीत.

एकंदरीत एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.

भाषा: मराठी

Tuesday, December 14, 2021

चित्रपट टक-टक/Tak-Tak

 टक-टक/Tak-Tak



जर तुम्हाला एखाद्या खोलीत दोन-तीन दिवस कोंडून ठेवले तर? हीच आहे टक-टक या चित्रपटाची कथा.

विशाल सहावी-सातवीतला मुलगा चुकून शाळेच्या वर्गात अडकून पडतो ते पण तीन दिवस! हे तीन दिवस तो कसे काढतो? कुठल्या गोष्टी त्याला शिकाव्या लागतात. हे सर्व चित्रपटातच पाहणे गरजेचे आहे.

दिग्दर्शक व लेखकांनी घेतले सिनेस्वातंत्र्य सोडता हा खरोखर उत्कृष्ट चित्रपट आहे. सिनेमातील मधला भाग काहीसा संथ वाटतो पण तो शेवटच्या तीस मिनिटांत कसर भरून काढतो. शेवटचा भाग पहिल्यात काही भागात मिसळला (मिक्स) असता तर हा चित्रपट अजून ही चांगला झाला असता.

या चित्रपटाच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विशाल या एकाच पात्रावर संपूर्ण सिनेमा उभा आहे. एकच पात्रावर चित्रपट बनवणे, व त्या पात्राचा अभिनय करणे हे दिग्दर्शक विशाल कुदळे व अभिनेता अनिश गोसावी यांच्या साठी शिवधनुष्यच होते. ते त्या दोघांनी लीलया पेललेले आहे.

एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

Monday, December 13, 2021

चित्रपट हनिमुड/Honeymood

 हनिमुड/Honeymood




भाषा हिब्रू
तालया (Talya Lavie) लिखित व दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे नाट्य, प्रणय व विनोदाचे सुंदर मिश्रण.
एक नव दांपत्य लग्नानंतर पहिल्या रात्री भव्य व महागड्या हाॅटेलात येतात. दोघांनी एका नविन जीवनाची सुरुवात करण अपेक्षित असताना. नवऱ्या मुलाच्या आधीच्या प्रेयसीने भेट म्हणून लग्नात दिलेली अंगठी सापडते. नवरीला हा अपशकुन वाटून ती अंगठी परत देण्याचे ठरवतात. ती परत देताना दोघांना एकमेकांच्या पूर्व आयुष्यातील काही घटना कळतात. संपूर्ण रात्र हाॅटेलात घालवण्याच्या ऐवजी त्यांची रात्र जेरुसलेमच्या रस्त्यावर जाते. यातून येणारी धम्माल चित्रपटात पाहणे गरजेचे आहे.
पूर्व आयुष्यातील घटना कळल्यावर ते एकमेकांना माफ करतात का? यांचे उत्तर चित्रपटच देईल.
अविगली (Avigail Harari) व रान (Ran Danker) यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहेच त्याच बरोबर सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे.
एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

Sunday, December 12, 2021

चित्रपट पलंग/KATTIL

 पलंग/KATTIL



भाषा तमिळ

चित्रपटाची सुरुवात तामिळनाडूमधील एका छोट्या शहरातील भल्यामोठ्या घरापासून होते. या घरात एका कुटुंबाच्या तीन पिढ्या राहिलेल्या असतात. त्या तीन पिढ्यांची साथ दिली असते एका भल्यामोठ्या पलंगाने. पलंगाने तिन्ही पिढीतील सुख दुःख पाहिलेली असतात.

 तिसऱ्या पिढीतील दोन भाऊ व एक बहीण (जे परगावी राहत असतात) ते हे घर विकायचे ठरवतात. त्याच घरात राहणारा भाऊ व त्यांची आई या निर्णयाशी फारसे सहमत नसतात. पण इतर भावा/बहिणीमुळे त्यांना घर विकावे लागत.

घरात असणाऱ्या पलंगाचे काय करायचे हा मोठा प्रश्न घरात राहणाऱ्यांच्या मनात असतो तर तो विकावा अशी इच्छा इतरांची असते. पलंगाला ठेवण्यासाठी योग्य जागा मिळत नाही त्यातून होणारी कुतरओढ या चित्रपटात सुंदररित्या चित्रित केली आहे. 

तिसऱ्या पिढीतून पंगल चौथ्या पिढीत पोहचतो का? हे चित्रपटातच पाहणे संयुक्तिक होईल.

ज्याला आपल्या घराण्यातील पारंपरिक वस्तू जपण्याची आवड आहे अश्या व्यक्तींची मांडणी फार छान प्रकारे केली आहे.

सर्वांचा अभिनय उत्तम, चित्रीकरण फारच छान आहे. चित्रपटासाठी लागण्याऱ्या दोनचार भावनिक दृश्यांची भेळमिसळ मस्त जमली आहे. 

 गणेशबाबू (EN Ganeshbabu)  दिग्दर्शकाने या चित्रपटात आजोबा, मुलगा व नातू असे तीन रोल केले आहेत. तिन्ही भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. श्रृती डांगे (Srushti Dange) यांनी ही छान काम केले आहे.

एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट.

Saturday, December 11, 2021

चित्रपट गोत /The Clan

 गोत /The Clan



हरबी व कचरू हे निःसंतान आदिवासी जोडपे. हरबी भावाच्या वेडसर मुलाला (मारतू) वाढवते पण त्यांच्या गैरवर्तनामुळे त्याला भावाकडे सोडून यावे लागते.
कचरूचा सावत्र भाऊ मरण पावतो व त्यांची पुतणी रिलू (लग्नानंतर लगेच विधवा झालेली) अनाथ होते. रिलूला पांढर्या पायाची ठरवून दगडाने मारण्याची शिक्षा दिली जाते, त्यातून हरबी व कचरू तिला वाचवून आपल्या घरी घेऊन येतात.
कचरूच्या टोळीत एकाच गोत्रात प्रेम करण्यार्या जोडप्याला मारण्याची शिक्षा असते.
कचरू व रिलू यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतात. रिलूला दिवस गेल्यामुळे कचरूला शिक्षा होईल या भीतीने हरबी तिचे लग्न मारुतू बरोबर लावते.
रिलूला एकमेकांना चिटकलेले मूल होत. त्यामुळे टोळीत तिच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होते. रिलूला शिक्षा होते का? कचरू काय करतो हे चित्रपटात बघणे गरजेचे आहे.
हरबी व रिलू यांच्यातील संबंध छान चित्रित केले आहेत. एक दोन अपवाद वगळता सर्वांनी अभिनय छान केला आहे. आदिवासी चित्रपटात जसे जंगल दाखवणे गरजेचे होते तसे दिसले नाही. आदिवासींचा रंग व गाण्यात नृत्य करताना दिसणार्या तरुणी यांचा मेळ लागत नाही.
एकदंरीत एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

Friday, December 10, 2021

PIFF-2021

 मागील आठ दिवसात मी जवळ जवळ २१ चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघितले.    वर्षभराचा कोटा पूर्ण . . . . . . 

मी यातील काही चित्रपटांबद्दल लिहणार आहे. 

धन्यवाद PIFF, असे विविध विषयाचे चित्रपट दाखवल्याबद्दल,  #CelebratingCinema 

व्हॅलेंटिना /Valentina

गोत/The Clan

कॉट/Cot

हनिमुड/Honeymood

ताठ कणा/Standing Tall 

ब्रिज/Bridge

गोदाकाठ/Godakaath 

अनादर राऊड/Another Round

कंदील /Kandil

जून /June

काळोखाच्या पारंब्या /Prop Shoots of Darkness

इन टू द वल्ड/Into The World

टू ऑफ  अस/Two of Us

अरण्येर दिन रात्री /Days and Nights in the Forest

मध /Thaen

लैला और सत गीत /The Shepherdess and the Seven Songs

सिसटरः दि समर वी फाउंड आवर सुपरपॉवर/Sisters: The Summer We Found Our Superpowers

पिंकी ईली /Where is Pinki?

इलाराले अलगिरे होगालारे /Neither Can I Stay Here nor Journey Beyond

बाल्कनीतला भगवान /God on the Balcony

आर के /RK

व्हॅलेंटिना /Valentina

व्हॅलेंटिना उभयलिंगी व्यक्ती आपल्याला होत असलेल्या कुचेष्टेतून वाचण्यासाठी,  आपल्या आईबरोबर एक छोट्या गावात स्थलांतरित होते. व्हॅलेंटिनाला नवीन नावासहित शाळेत प्रवेश पाहिजे असतो. त्यासाठी दोन्ही पालकांच्या सह्या लागतात. व्हॅलेंटिनाचे आई व वडील विभक्त असल्यामुळे वडीलाची सही मिळणे कठीण असत. व्हॅलेंटिनाला नवीन गावात मित्र/मैत्रीण मिळतात, पण सर्वांपासून तिने आपली खरी ओळख लपवून ठेवलेली असते. ही गोष्ट गावातील लोकांपासून फार काळ लपून राहत नाही.  गावातील काही लोक तिला शाळेत न येण्यासाठी प्रयत्न करतात.

 व्हॅलेंटिनाचे वडील अर्जावर सही करतात का? व्हॅलेंटिनाच्या मित्रांची प्रतिक्रिया काय असते? व्हॅलेंटिनाला आपल्या 'व्हॅलेंटिना' या नावानेच शिक्षण घ्यायचे असते, ते शक्य झालं का? हे चित्रपटातच पाहणे उत्तम होईल.

व्हॅलेंटिनाचे काम करणारी थिसियाच्या (Thiessa Woinbackk) जीवनावर बेतलेला हा चित्रपट. सर्वच कलाकाराचे काम अप्रतिम आहे. 

Saturday, November 27, 2021

चित्रपट K.D. (2019)

 सहसा दाक्षिणात्य चित्रपट बघण्याचं मी टाळतो याचं मुख्य कारण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट नसून, दाक्षिणात्य चित्रपट जे हिंदीमध्ये डब केले जातात ते आहे. असो.

K.D. (2019)


 चित्रपटाची सुरुवात एक मुलगी हातात वह्या, पुस्तके घेऊन शाळेकडे जाताना दिसते.  मागील आवाजात व्यक्ती सांगत असते की 'शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि त्यातल्या त्यात स्त्रियांचे शिक्षण. दुसर्‍या गावात चालत जाऊन शिक्षण घेणारी ही मुलगी आमच्या भागातील इंदिरा गांधीच होणार.' तेवढ्यात ती मुलगी एका शेताकडे वळते, तिथे एक मुलगा हातात चिंचा, गोळ्या घेऊन बसलेला असतो. ती मुलगी त्यांच्याकडे बघून हसते. मागील आवाज सांगू लागतो. 'हा देश आणखीन एका इंदिरा गांधींना मुकला'. चित्रपटाची एवढी खमंग सुरुवात करून दिग्दर्शक व लेखक मधूमिता या चित्रपटात काय दाखवणार आहे यांची चुणूक प्रेक्षकांना येते.

वर्णन सांगणारा आवाज हा ८० वर्षाच्या म्हातार्‍यांचा (कुरुपुदाई ऊर्फ केडी) याचा असून तो गेले तीन महिने कोमात आहे. त्यांची मुलं 'आता काय करायचं?' या विचारात आहेत 'किती दिवस अजून हा त्रास सहन करायचा.' त्यातूनच तलाईकोतलचा (दयामरण हा थोडासा अयोग्य मराठी शब्द) वापर करावा का? अस सर्वांना वाटत. तलाईकोतल मध्ये व्यक्तीला तेलाने मालीश करून शहाळ्याचे पाणी पाजले जाते. सदर व्यक्ती एक, दोन दिवसात मरण पावते. 

अचानक केडीला जाग येते, आपल्याबद्दल चाललेली चर्चा ऐकून तो फारच अस्वस्थ होतो. आपलीच मुलं आपल्याला मारायला टपली आहेत या विचारांनी घाबरून हा घरातून धूम टोकतो. केडी घरातून निघून गेल्यावर त्याला शोधण्यासाठी घरातील लोक धावाधाव करत असतात. त्याला शोधण्याचे काम एका गुप्तहेराला दिल जात.

  बाहेरच्या जग फारसे पाहिलेलं नसलेला हा केडी, दिसेल त्या मार्गाने घर सोडून पळतो. एका मंदिराजवळ गाडी बंद पडते म्हणून सर्वजण उतरतात तिथे केडीची गाठ नियतीने एका आठ वर्षाच्या अनाथ मुलांबरोबर (कुट्टी) बांधलेली असते. अनाथ असलेल्या कुट्टीला जीवनाने हुशार व चुणचुणीत बनवलेले आहे. 

   या दोघांच्या वयातील अंतर व दोघांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात जमीन अस्मानाचा फरक पण या दोघांची मैत्री होते. या मैत्रीतही अनेक कंगोरे आहेत कधी एकमेकांशी असलेली घट्ट मैत्री तर कधी एकमेकांत झालेली भांडणं ही चित्रपटात अतिशय सुंदररित्या दर्शवली आहे. केडीच्या कुठल्या कुठल्या इच्छा राहिल्या आहेत त्याची यादी (बकेट लिस्ट) हे दोघे करतात. पुढचे काही दिवस दोघे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. 

अतिशय साधी वाटणारी ही यादीः

बिर्याणी खाणे, MGR, रजनीकांत सारखी भूमिका/अभिनय करणे, विदेशी दारू पिणे, कोट घालणे, मित्राबरोबर गाडी चालवणे, चित्रपटात काम करणे, जुन्या मैत्रिणीला भेटणे.

पुढील काही काळ केडीच्या वरील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुट्टी व केडी किती धम्माल करतात हे चित्रपटातच पाहणे गरजेच आहे. या सर्व इच्छा पूर्ण होत असताना त्या वास्तविक दाखवण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शिकेने सहज पेलले आहे.

 या इच्छा पूर्ण करताना केडी व कुट्टी हे एकमेकाचे अविभाज्य भाग होऊन जातात. पण फोनवरून केडीला कळत कुट्टीची चेन्नईच्या एका शाळेत शिक्षणाची व राहण्याची सोय झालेली असते. घरातील सर्व व्यक्तींनी ज्याच्या मरणाची अपेक्षा केली होती अशा 80 वर्षाच्या म्हातार्‍याच्या जीवनात फक्त आणि फक्त एकच आनंद असतो तो म्हणजे तो कुट्टी. त्यालाच आपल्यापासून दुर ठेवायचे?

केडी त्याला चेन्नईला पाठवतो का? कुट्टी केडीपासून दुर जातो का? केडीचे स्वागत घरी कसे होते हे सर्व चित्रपटातच पहावे.

केडीचे काम करणारे मु रामास्वामी (हे तामिळ चित्रपट व नाट्यकलेतील नावाजलेले नाव) व कुट्टीचे काम करणारा नागाविशाल यांचे अभिनय अप्रतिम आहेत. 

दिग्दर्शिका व लेखिका मधूमिता यांनी या चित्रपटातून नेहमी प्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. चित्रपटातील संवाद अतिशय उत्तम आहेत. मला तामिळ भाषा येत नसल्याचा इथे खूप त्रास झाला. इंग्रजी उपशीर्षकावरून (सबटायटल) संवादाची खोली सहज लक्षात येते. 

जीवनात काही कारणाने मनावर मळभ आले असेल तर हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहवा.

हा चित्रपट मी १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये चित्रपटगृहात बघितला होता. सदर चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Friday, October 1, 2021

द.मा.

 द.मा. तुमच्यामुळे वाचनाची लागलेली आवड जोपासली गेली.

व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी 

आजसुध्दा त्यातील नावीन्य कमी होत नाही.

या सर्वांची किती पारायणे झालीत हे देवालाच माहीत.

मागील वर्षी ई-कट्टावर सादर केलेले हे बालनाट्य.



Tuesday, September 14, 2021

चित्रपट मिराज-२०१८ (Mirage -2018)

 मिराज-२०१८  (Mirage -2018)



मुळात नावापासूनच या चित्रपटाचा वेगळेपणा दिसायला लागतो. मिराज म्हणजे मृगजळ.

ओरील(Oriol Paulo) दिग्दर्शित हा खरेतर स्पॅनिश चित्रपट.

 निको (Nico)त्यांची आई मारीया (María) हे जर्मनीमध्ये राहणार दोनच माणसांच कुटुंब. निको १०-१२ वर्षाचा मुलगा, गिटार वाजवत स्वतःचं चित्रीकरण करत टीव्ही बघणे हा याचा छंद. त्यासाठी लागणारा कॅमेरा, टीव्ही व कॅसेट हे जवळ बाळगणारा निको.

चित्रपटाची सुरुवात ९ नोव्हेंबर १९८९ (बर्लिनची भिंत पडलेला दिवस, जर्मन भाषेत याला 'माउरफॉल' असे म्हणतात) या दिवसापासून होते. या दिवशी निको स्व:चित्रीकरण करत असतो, त्याच दिवशी ७२ तासाच वादळ जर्मनीला धडकत.

चित्रीकरण करत असताना शेजारील घरातील संशयात्मक हालचालीमुळे निको तिकडे जातो. शेजारच्या घरात एंजेल (Angel) मृतावस्थेत तर तिचा नवरा प्रीतो (Prieto) हातात सूरा घेऊन उभा असतो. हे दृश बघून पळत असताना निकोचा  अपघाती मृत्यू होतो. प्रीतोला पत्नीच्या खुनासाठी शिक्षा होते. 

२०१४ मध्ये त्याच घरात वेरा (Vera Roy) व डेव्हिड (David Ortiz) आपल्या मुलीसह (ग्लोरिया Gloria) राहण्यासाठी येतात.  त्यांना जुना कॅमेरा, टीव्ही व निकोचे चित्रमुद्रण सापडते. या विषयी ते आयटोर(Aitor) व त्यांची आई क्लारा (Clara) (वेराचे शेजारी) यांच्याशी बोलतात. त्या वेळेस त्यांना पूर्वी झालेला प्रसंग आयटोर सांगतो. जसं वादळ १९८९ आलं होत तसच वादळ आता पण आलेले असतं.

जेवणानंतर झोपेच्या वेळेस वेराला तो टीव्ही सुरू झालेला दिसतो. ती टीव्ही समोर जाते तेव्हा निको गिटार वाजवत असतो. 

निको व वेरा एकमेकांना टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकत असतात. एकमेकांशी संवाद साधू शकतात. पहिल्यांदा घाबरलेली वेरा निकोला घराबाहेर जाण्यापासून थांबवते. तिला माहीत असलेल्या माहितीवरून निको बाहेर गेला तर त्याचा मृत्यु होणार असतो.  जे नियतीने लिहून ठेवले आहे ते बदलण्याचा प्रयत्न करते. त्याचे प्राण वाचतात.

आपण केलेल्या या बदलामुळे आपले संपूर्ण जीवनच बदलून जाईल यांची वेराला सुतराम कल्पना नसते. दुसर्‍या दिवशी वेराला कळत, डेव्हिडच लग्न दुसर्‍या मुली बरोबर झालं असत. ग्लोरिया ही त्यांची मुलगीच नसते. तीच जीवन पूर्णपणे बदलून जात. ती एकटीच असते, जिला आधी व नंतरच आयुष्य आठवत असत. प्रीतो व क्लारा हे नवरा बायको म्हणून राहत असतात. या सार्‍यांच्या जीवनात वेराला स्थान नसत. 

निकोचे वाचवलेले प्राण वेराच पूर्ण आयुष्यच बदलून टाकत. आता आलेले वादळ ७२ तास राहणार असल्याच तिला कळत. याच वेळेत तिला आपले जुनं आयुष्य मिळवण्याची संधी असते.

ती ते आयुष्य परत मिळवते का? व त्यासाठी निकोचा बळी देते का? हे चित्रपटातच पाहणे योग होईल. चित्रपटाच्या नावावरून 'चित्रपटाच्या भविष्याचा' वेध घ्या.

कथानक उत्तम असल्यामुळे इतर तांत्रिक बाबीकडे लक्ष जात नाही. चित्रपट स्पॅनिश असल्यामुळे हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटाशी तुलना करणे योग्य होणार नाही.

टीव्हीतून एकमेकाशी कसं बोलता आले? असले प्रश्न मनाने विचारले नाही तर एकदा नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट.

ज्या वेळेस आपली योग्यता(साधना) नसते त्या वेळेस नियतीने लिहून ठेवलेल्या गोष्टीत बदल करणे धोक्याचे असते, अस मला वाटतं. 

आपल्याला भविष्यात काय होणार याची उत्सुकता असली तरी त्याकडे कानाडोळा करणेच जास्त श्रेयस्कर असावे.

Thursday, September 9, 2021

मोदक आणि संख्याशास्त्र

 



फोटोत बघून मोदक चांगला आहे की नाही हे सांगायचे झाले तर काय होईल?

आपल्याकडे दोन मार्ग आहेत.

१) मोदक चांगला आहे.

२) मोदक चांगला नाही. 

फोटोत बघून काही लोक म्हणतील चांगला असेल काहींना वाटेल हा चांगला नाही.

I) मोदक चांगला असताना 'मोदक चांगला आहे' हा पर्याय निवडला.

  बरोबर निर्णय. तुम्ही एक मोदक जिंकला.

II) मोदक चांगला नसताना 'मोदक चांगला नाही' हा पर्याय निवडला.

  बरोबर निर्णय. तुम्ही वाईट मोदक खाण्यापासून वाचलात.

III) मोदक चांगला असताना 'मोदक चांगला नाही' हा पर्याय निवडला.

 चुकीचा निर्णय, तुम्ही मोदकाला मुकलात.

IV)  मोदक चांगला नसताना 'मोदक चांगला आहे' हा पर्याय निवडला.

 चुकीचा निर्णय. भोगा आता कर्माची फळ.

I) व II) हे तर बरोबर निर्णय आहेत, त्यामुळे त्याबद्दल काहीच न बोललेले बरं

III) व IV) हे चुकीचे निर्णय आहेत. संख्याशास्त्रात III) ला Type-I error व IV) ला Type-II error म्हणतात.

संख्याशास्त्राचा डोलारा याच दोन चुकांवर अवलंबून असतो. 😃😃

ह्या पैकी कुठल्या चुकीला महत्त्व द्यायचे व ती चूक कमी करण्याचा प्रयत्न करायचा हे त्या केलेल्या प्रयोगावर अवलंबून असत अस माझे मत आहे.

मोदकाचा आस्वाद घेण्यासाठी घरी या आणि तुम्हीच ठरवा तुम्ही कोणती चूक केली आहे ती?

तुम्ही जीवनात घेतलेल्या सर्व निर्णयातील दोन्ही चुका गणपती बाप्पाने कमी कराव्यात हीच बाप्पाला प्रार्थना. 🙏🙏🙏

Tuesday, August 17, 2021

गुलज़ार

 बीड़ी जलइले जिगर से पिया

गोली मार भेजे में 

दो दिवाने एक शहर में

मेरा कुछ सामान 

जंगल जंगल बात चली है चड्डी पहन के फूल खिला है

ही सर्व गाणी लिहणा-या एकाच माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अफ़साने

खुशबू जैसे लोग मिले अफ़साने में

एक पुराना खत खोला अनजाने में

जाना किसका ज़िक्र है इस अफ़साने में

दर्द मज़े लेता है जो दुहराने में

शाम के साये बालिस्तों से नापे हैं

चाँद ने कितनी देर लगा दी आने में

रात गुज़रते शायद थोड़ा वक्त लगे

ज़रा सी धूप दे उन्हें मेरे पैमाने में

दिल पर दस्तक देने ये कौन आया है

किसकी आहट सुनता है वीराने मे ।

                         गुलज़ार


Tuesday, July 20, 2021

Monday, July 19, 2021

अभंग दिंडी - दिवस १८

 वाखरी मानस प्रस्थान- मानस मुक्काम पंढरपुर



Sunday, July 18, 2021

अभंग दिंडी - दिवस १७

 भंडीशेगाव मानस प्रस्थान- मानस मुक्काम वाखरी



Saturday, July 17, 2021

अभंग दिंडी - दिवस १६

 वेळापुर मानस प्रस्थान- मानस मुक्काम भंडीशेगाव



Friday, July 16, 2021

अभंग दिंडी - दिवस १५

 माळशिरस मानस प्रस्थान- मानस मुक्काम वेळापूर



Thursday, July 15, 2021

अभंग दिंडी - दिवस १४

 नातेपुते मानस प्रस्थान- मानस मुक्काम माळशिरस



Wednesday, July 14, 2021

अभंग दिंडी - दिवस १३

 बरड मानस प्रस्थान- मानस मुक्काम नातेपुते



Tuesday, July 13, 2021

अभंग दिंडी - दिवस १२

 फलटण मानस प्रस्थान- मानस मुक्काम बरड



Monday, July 12, 2021

अभंग दिंडी - दिवस ११

 तरडगाव मानस प्रस्थान- मानस मुक्काम फलटण



Sunday, July 11, 2021

अभंग दिंडी - दिवस १०

 लोणंद मानस प्रस्थान- मानस मुक्काम तरडगाव



Saturday, July 10, 2021

अभंग दिंडी - दिवस ९

 मानस मुक्काम लोणंद



Friday, July 9, 2021

अभंग दिंडी - दिवस ८

 वाल्हे मानस प्रस्थान- मानस मुक्काम लोणंद



Thursday, July 8, 2021

अभंग दिंडी - दिवस ७

 जेजुरी मानस प्रस्थान- मानस मुक्काम वाल्हे



Wednesday, July 7, 2021

अभंग दिंडी - दिवस ६

 सासवड मानस प्रस्थान- मानस मुक्काम जेजुरी



Tuesday, July 6, 2021

अभंग दिंडी - दिवस ५

 मुक्काम मानस सासवड