Saturday, December 25, 2021

चित्रपट ईलीरालारे अलगिरे होगालारे (illiralaare allige hOgalaare)/Neither Can I Stay Here nor Journey Beyond.

 ईलीरालारे अलगिरे होगालारे (illiralaare allige hOgalaare)/Neither Can I Stay Here nor Journey Beyond.

चित्रपटात दोन कथा आहेत. 



कथा-१ (१९६०च्या दशकातील) किरवंताच्या घरी काम करणारी एक स्त्री, तिचा नावाडी नवरा व नागा नावाचा त्यांचा मुलगा. अतिशय शांत असे हे खेडे, पण शिक्षण व पैसे कमवण्यासाठी नागा खेड्यातून पळण्याचा प्रयत्न करतो. तो त्यात यशस्वी होतो का? तो शिक्षण घेऊ शकतो का? हे चित्रपटातच पहावे.

कथा-२ (२०१० च्या दशकातील) बंगलोरमध्ये उच्चशिक्षित परिवारात राहणारा पुंडलिक (पुंडा) नावाचा मुलगा. घरातील मालकाने आपल्या लहान मुलीला संभाळायला ठेवलेला. तो त्याच घराचा एक अविभाज्य भाग बनून गेलेला असतो. त्यांचा परिवार खेडेगावात राहणारा. पुंडाला खेडेगावात परत जायचे असते.

दोन भिन्न कथा, पण एक सामायिक धागा असलेल्या.

या दोन कथा एकमेकांत कशा गुंफल्या आहेत हे चित्रपटातच पहावे.

सर्वाचे अभिनय उत्तम, छान दिग्दर्शन व सुरेख चित्रीकरण असणारा हा चित्रपट. चित्रपटात काही घागे अधांतरी सोडले आहेत असे वाटते. 

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. 

भाषा: कन्नड

खरं तर कथानक नसलेला पण तुम्हाला दोन तास खेळवून ठेवणारा व नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट

No comments:

Post a Comment