Thursday, December 16, 2021

चित्रपट ब्रिज/Bridge


 ब्रिज/Bridge

ब्रह्मपुत्रेला आसामचे अश्रू म्हणतात यांची भौगोलिक कारणे लहानपणी सर्वांनी दिली असतील, पण हा चित्रपट पाहिला की त्यांची भीषणता चांगलीच समजते.

ब्रह्मपुत्रेच्या एका उपनदीवर असलेला पूल वाहून गेला त्या वेळी ते पार करणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुष वाहून जातो. जोनाकी (वाहून गेलेल्यांची मुलगी), बापूकान (मुलगा) व बायको (तिला अपस्माराचा आजार जडतो) असे तीन व्यक्ती राहतात. जोनाकीला एका पुरुषाप्रमाणे शेतात काम करणे भाग पडते. 

नदी पलीकडे असलेल्या शाळेत नदीतून कपडे काढून चालत दाखवलेली मुलं काळजाला पीळ पाडून जातात. नेमके त्याच वेळेस केळीचे खांबांपासून बनवलेल्या नावेतून कुणी येत असेल तर ती मुले तशीच पाण्यात थांबतात त्या वेळेस हसावे का रडावे हेच कळत नाही.

जोनाकीचे शेतात काम करणारे फोटो बघून एक वार्ताहर ती बातमी टीव्ही वर दाखवतो. तो तिच्या प्रेमात पडतो. त्यांच्या आई वडिलांना ही गोष्ट कळते. ते जातपात न मानता मुलीला बघण्यासाठी येण्याचे ठरवतात. पण नदीला पूल नसल्यामुळे ते परत जातात. ह्या मुळे लहानगा बापूकान नदीवर चिडून तिच्यात माती टाकून तिला बुजवण्याचा बालिश प्रयत्न करतो. जोनाकी आपल्या लहान भावाला समजावते की ही नदी म्हणजेच आपले जीवन आहे. जोनाकीला आपले बैल विकावे लागतात (फिल्मी घटना). आशा रितीने या कुटुंबावर सर्व बाजूने अडचणीचा मारा होतो.

यात आणखीन भर म्हणजे, रात्री जोरदार पाऊस सुरू होतो. हाताला लागतील त्या वस्तू घेऊन हे कुटुंब नदीपासून दुर जाण्याचे प्रयत्न करते. पाण्यातच आईला आकडी येऊन मरण पावते.

जोनाकी व बापूकान कसेबसे वाचतात. तोच वार्ताहर पुराचे चित्राकांन करण्यासाठी आलेला असतो. त्यांची व जोनाकीची भेट होते.

तो तिचा स्वीकार करतो का? का जोनाकीच परिस्थितीचा स्वीकार करते हे चित्रपटातच पाहणे गरजेच आहे.

सर्वाचे अभिनय अप्रतिम आहेत. जोनाकीच काम केलेली शिवा राणी (Shiva Rani Kalita) ही भूमिका जगली आहे. बैलाच्या मदतीने शेत नांगरताना शिवा राणी ही जोनाकीच वाटते. दिग्दर्शक क्रिपाल (Kripal kalita) यांनी घेतलेली मेहनत चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात दिसते.

आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.

भाषा: आसामी

No comments:

Post a Comment