Sunday, December 26, 2021

चित्रपट आर्.के./RKay

 आर्.के./RKay

२०१४ मधील चार्ली (Charlie McDowell) दिग्द



र्शित The One I Love हा खूप छान चित्रपट आहे (त्या चित्रपटाबद्दल परत कधी), त्याच चित्रपटाच्या विषयावरून प्रेरणा घेऊन एक अस्सल भारतीय कलाकृती म्हणजे आर्.के. (RK).

         लेखक, दिग्दर्शक व अभिनेता आर्.के. एक चित्रपट बनवत असतो. आर्.के. स्वतःच्याच चित्रपटात मेहबूब (Mahboob) ही नटाची भूमिका साकारत असतो. चित्रीकरण पूर्ण होत, पण चित्रपटाचा शेवट (हिरो मरण्याचा) बर्‍याच जणांना आवडत नाही. चित्रपटाच संकलन (editing) चालू असताना चित्रफितीतून मेहबूब गायब होतो.

गायब झालेला मेहबूब खर्‍या जगात येतो. त्याला समजावून चित्रपटात परत पाठवण्याच्या तयारीत असतानाच चित्रपटाचा खलनायकसुध्दा खर्‍या जगात येतो.

आर्.के. मेहबूबला चित्रपटात पाठवू शकतो का नाही हे चित्रपटातच पहावे.

अतिशय सुंदर अभिनय, संवाद व दिग्दर्शन. चित्रपटाची सुरुवात चुकवू नका.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. 

भाषा: हिंदी

नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट


गेले तीन आठवडे मी #PIFF2021 मध्ये जे मी चित्रपट पाहिले त्याबद्दल लिहले. हे चित्रपट म्हणजे वेगवेगळी फुले. त्यांना एकत्र गुंफण्याचा हा प्रयत्न. त्यामध्ये कुणाला गुलाब आवडेल तर कुणाला चाफा.

परत एकदा धन्यवाद PIFF अशी फुली वेचून रसिकांसमोर ठेवल्याबद्दल. विशाल शिंदे (Vishal Shinde) तुझेसुध्दा मनःपूर्वक आभार.  

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. 

इति PIFF2021 लेखनसीमा

No comments:

Post a Comment