Wednesday, December 22, 2021

चित्रपट मध/Tēṉ/Thaen



 मध/Tēṉ/Thaen

निलगिरी (कुरिंजिपाड़ी) पर्वतावर राहणारा वेलू हा मध गोळा करण्याच काम करणारा, त्यांची गाठ शेजारील खेड्यात राहणारी पुनगुडीशी (Poongodi) होते व ते लग्न करण्याचे ठरवतात. निसर्ग देवता या लग्नाला मान्यता देत नाही (निसर्ग देवतेला लावलेला कौल चित्रपटातच पहावा). तरी ही ते लग्न करतात. यथावकाश त्यांना एक मुकी मुलगी होते.

काही वर्षानंतर पुनगुडीच्या पोटात दुखायला लागते. डोंगराखाली असणार्‍या शहरात नेल्यावर त्यांना कळत तिला असाध्य रोग झाला आहे.

वेलूकडे भारतीय असण्याचा कोणताच पुरावा नसतो. तिच्या उपचारासाठी वेलूला आधारकार्ड, रेशन कार्ड काढावे लागते. त्यासाठी होणारा त्रास चित्रपटात फारच चांगला रंगवला आहे. तथाकथित समाजसेवक, सरकारी अधिकारी, डॉक्टर यांचे छान चित्रण चित्रपटात पहावयास मिळते.

हा आजार तिला का होतो? या सर्वानंतर ती बरी होती का? हे चित्रपटातच पहावे.

संवाद व अभिनय छान आहे. चित्रीकरण अतिशय सुरेख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट पहाताना तुम्ही त्या जंगलात गेल्याचा भास होतो.

वेलूच्या डोंगरावरील घरात लाईट व लाईटच मीटर तांत्रिकदृष्ट्या चुकीचे वाटतात.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. sonyliv वर बहुधा आहे.

भाषा: तामिळ

नक्कीच पहाण्यासारखा चित्रपट

No comments:

Post a Comment