Saturday, December 18, 2021

चित्रपट Another Round/Druk

 Another Round/Druk


मार्टिन, टॉमी, निकोलाज व पिटर हे एका उच्च माध्यमिक शाळेत वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक व एकमेकांचे मित्र आहेत सर्वाच्या शिकवण्यात एकसुरीपणा आल्यामुळे त्यांच्याकडे विद्यार्थी लक्ष देत नसतात. जवळपास हीच परीस्थिती प्रत्येकांच्या घरात असते.

त्यातील एक मित्र सांगतो की विशिष्ट प्रमाणात दारूचे (मद्य) सेवन केले तर आपल्या सर्जनशीलतेत लक्षणीय वाढ होते.

सर्वजण हा प्रयोग करायला तयार होतात. मद्याचे सेवन ०.०५% ठेवून प्रयोग सुरू होतो. मार्टिन हा इतिहासाचा शिक्षक चर्चिल,  रुझवेल्ट व  हिटलर यांच्यातील फरक इतका छान सांगतो तो चित्रपटातच बघणे गरजेचे आहे. घराच्या बाजूवरही सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. 

हळू हळू मद्याचे प्रमाण वाढवले जाते. थोडेच दिवसात ते प्रमाण फारच वाढते त्यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम दिसायला लागतात. पुढे काय होत हे चित्रपटातच बघावे.

संवाद ऐकण्यासारखे (मी वाचले) आहेत. अभिनय व पार्श्‍वसंगीत छान आहे. शेवटच्या दृश्यात मार्टिन यांनी केलेला डान्स अप्रतिम आहे. तो डान्स करण्याची फरमाइश चित्रपटात सुरुवातीपासून होत असते. चांगला दिग्दर्शक असे हुकमाचे एक्के एकदाच वापरतो. दिग्दर्शक थॉमस (Thomas Vinterberg) यांची छाप प्रत्येक दृश्यात बघायला मिळते. 

नक्की पाहण्यासारखा चित्रपट.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

भाषा: दानिश

No comments:

Post a Comment