Sunday, December 12, 2021

चित्रपट पलंग/KATTIL

 पलंग/KATTIL



भाषा तमिळ

चित्रपटाची सुरुवात तामिळनाडूमधील एका छोट्या शहरातील भल्यामोठ्या घरापासून होते. या घरात एका कुटुंबाच्या तीन पिढ्या राहिलेल्या असतात. त्या तीन पिढ्यांची साथ दिली असते एका भल्यामोठ्या पलंगाने. पलंगाने तिन्ही पिढीतील सुख दुःख पाहिलेली असतात.

 तिसऱ्या पिढीतील दोन भाऊ व एक बहीण (जे परगावी राहत असतात) ते हे घर विकायचे ठरवतात. त्याच घरात राहणारा भाऊ व त्यांची आई या निर्णयाशी फारसे सहमत नसतात. पण इतर भावा/बहिणीमुळे त्यांना घर विकावे लागत.

घरात असणाऱ्या पलंगाचे काय करायचे हा मोठा प्रश्न घरात राहणाऱ्यांच्या मनात असतो तर तो विकावा अशी इच्छा इतरांची असते. पलंगाला ठेवण्यासाठी योग्य जागा मिळत नाही त्यातून होणारी कुतरओढ या चित्रपटात सुंदररित्या चित्रित केली आहे. 

तिसऱ्या पिढीतून पंगल चौथ्या पिढीत पोहचतो का? हे चित्रपटातच पाहणे संयुक्तिक होईल.

ज्याला आपल्या घराण्यातील पारंपरिक वस्तू जपण्याची आवड आहे अश्या व्यक्तींची मांडणी फार छान प्रकारे केली आहे.

सर्वांचा अभिनय उत्तम, चित्रीकरण फारच छान आहे. चित्रपटासाठी लागण्याऱ्या दोनचार भावनिक दृश्यांची भेळमिसळ मस्त जमली आहे. 

 गणेशबाबू (EN Ganeshbabu)  दिग्दर्शकाने या चित्रपटात आजोबा, मुलगा व नातू असे तीन रोल केले आहेत. तिन्ही भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. श्रृती डांगे (Srushti Dange) यांनी ही छान काम केले आहे.

एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट.

No comments:

Post a Comment