Monday, December 20, 2021

चित्रपट काळोखाच्या पारंब्या /Prop Shoots of Darkness



 काळोखाच्या पारंब्या /Prop Shoots of Darkness

रंगमंचावरील व घरातील कलाकार यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. तसेच संयमाच्या अभावाने कलाकाराचे काय होऊ शकते, हेच सांगणारा  मकरंद अनासपुरे दिग्दर्शित चित्रपट म्हणजे काळोखाच्या पारंब्या.

अलिफ एक छोटा खेड्यात राहणारा व सर्वांची मदत करून आपले पोट भरणारा तरुण पोरगा. त्याच गावात रहिमचाचा हा झाडपाल्याचे औषध देणारा व डफ वाजवणारा कलाकार. 

तावून सुलाखून रहिमचाचा अलिफला डफ शिकण्यासाठी आपला शिष्य बनवतात.

त्याच वेळेस रहिमचाचाची भौतिक सुखाची आवड असणारी तिसरी बायको गावात येते. 

भौतिक सुख की कलेची सेवा यामध्ये अलिफला निवड करण्याची वेळ येते. त्या वेळेस तो कशाची निवड करतो हे चित्रपटात पाहणे उचित होईल.

(माझे वैयक्तिक मत कलाकारांनी दोन्ही मिळवावे)

 डफ ऐकून फरिश्ते (देवदूत) येतात त्या वेळेचे दृश्य परिणाम (VFX) जरा चांगले हवे होते. डफ शिकण्याची सुरुवात व पारंगतता यामध्ये फारच कमी वेळ दाखवला आहे.

सिद्धहस्त कलाकार मकरंद अनासपुरे एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आहेत. वैभव काळे अलिफची भूमिका जगले आहेत. या दोन्ही कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे. 

भाषा: मराठी

एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

No comments:

Post a Comment