Sunday, December 19, 2021

चित्रपट जून/June

 जून/June


निल औरंगाबादवरून पुण्याला शिकायला आलेला मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. काही कारणामुळे (हे चित्रपटातच पहावे) तो नापास होऊन उद्विग्न अवस्थेत औरंगाबादला परत येतो. त्याच वेळेस नेहा (निलच्या शेजारी राहणार्‍या अभिदादाची बायको) उद्विग्न  अवस्थेत त्यांच्याच शेजारी राहायला येते. निल पुण्यातील घटना ज्या आई-वडीलांशी बोलू शकत नसतो त्या तो मनमोकळेपणाने नेहाशी बोलू शकतो.

ते एकमेकांच्या जखमेवर फुंकर मारून घाव भरण्याचा (heal) प्रयत्न करतात. यामध्ये त्यांना यश येत की अपयश हे चित्रपटातच पहावे.

सर्वांचे अभिनय सुरेख आहेत. विषयाची खोली व चित्रपटांची लांबी (९४ मिनिटे) ही तारेवरची कसरत फारच छान जमली आहे.

OTT platform मुळे कारण नसताना अश्लील दृश्य घालण्याचा मोह टाळता आला असता तर फार बरं झाल असत. काही दृश्य नक्कीच कथा पुढे घेऊन जातात पण काही दृश्य  नक्कीच टाळता आली असती.

चित्रपटाचे नाव खरच गुढ आहे. मला वाटत, उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाण्यासाठी एका रात्रीचा पाऊस पुरेसा असतो तो जून मध्ये येतो! यापेक्षा वेगळा व जास्त संयुक्तिक नावाचा अर्थ असू शकतो.

सदर चित्रपट मी १९व्या पुणे चित्रपट महोत्सवात पाहिलेला आहे.  Planet Marathi वर उपलब्ध आहे.

भाषा: मराठी

एकदा पाहण्यासारखा चित्रपट.

No comments:

Post a Comment