Thursday, May 31, 2018

पुरक?

सहसा अमूर्त (मराठीत abstract) कविता करायला मला आवडत नाही. पण बोरा गुहा (मराठीत Borra Caves) बघितल्यावर केलेली  कविता.

पुरक?
एक काटेरी झाड माझ्या उरात उरात
एक सोनचाफा माझ्या मनात मनात
कधी ताटातील भाकरी देऊन टाकतो
कधी टाळूचं लोणी  चाटत बसतो
कधी शून्याहून छोटा कधी अनंताहून मोठा
कधी काळोख काळोख कधी लख्ख सूर्याचा प्रकाश
कधी धीरगंभीर कधी उच्छल चटोर
कधी ओलावा नात्यात तर कधी शुष्क अरस
कधी मी सुर कधी असुरा संग
भावनांचा गुंता माझ्या खोल मनात
विरोधी का पूरक प्रश्न हा अनुत्तरित