Thursday, February 25, 2021

ग्रेस

 "माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे." -ग्रेस

असा मेल्यावरही जगणारा कवी म्हणजे ग्रेस. दुर्बोध व गेयता यांचा संगम असणार्या कविता. त्याच एक पुस्तक समजून वाचायला साधारण दोन-तीन वर्ष लागतात.
ऊर्मिला
कविता संग्रह : संध्याकाळच्या कविता
कवी ग्रेस
त्या दाट लांब केसांचा
वार्यावर उडतो साज
दुःखात अंबरे झुलती
की अंग झाकते लाज . . .
तरि हळू हळू येते ही
संध्येची चाहूल देवा
लांबती उदासीन क्षितिजे
पाण्यात थांबल्या नावा . . .
देहास आठवे स्पर्श
तू दिला कोणत्या प्रहरी ?
की धुके दाटले होते
या दग्ध पुरातन शहरी . . .
सुख असे कळीतून फुलते
व्यापतो वृक्ष आभाळ ;
छायाच कशा दिसती मग
आपुल्यापरी खडकाळ ?
आटले सरोवर जेथे
का मोर लागतो नाचू ?
तू सोड उर्मिले आतां
डोळ्यांत बांधिला राघू . . .

Wednesday, February 17, 2021

मजकूर-मंथन

मराठी विश्वकोश मंडळाने माझ्याकडून Text Mining वर मराठीत लेख मागितला होता.  Text Mining ला 'मराठीत काय म्हणतात?' इथपासून माझी सुरुवात.

'मजकूर-मंथन' असा नवीन शब्द तयार करून हा लेख लिहायला सुरुवात केली. या लेखामध्ये असे अनेक नवीन शब्द तयार करण्याचा प्रयत्न केला.  कमीतकमी तांत्रिक शब्दांचा वापर करून लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आज तो लेख प्रसिद्ध झाला. 

मजकूर-मंथन (Text Mining) https://marathivishwakosh.org/48314/

हा लेख वाचा. आपल्याला कसा वाटतो? ते नक्की सांगा.

सदर लेखासाठी अनेकांनी समीक्षक म्हणून काम केले त्यांचे मनापासून आभार.

लेखातील काही शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी सांगितलेल्या आहेत.