Thursday, February 25, 2021

ग्रेस

 "माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे." -ग्रेस

असा मेल्यावरही जगणारा कवी म्हणजे ग्रेस. दुर्बोध व गेयता यांचा संगम असणार्या कविता. त्याच एक पुस्तक समजून वाचायला साधारण दोन-तीन वर्ष लागतात.
ऊर्मिला
कविता संग्रह : संध्याकाळच्या कविता
कवी ग्रेस
त्या दाट लांब केसांचा
वार्यावर उडतो साज
दुःखात अंबरे झुलती
की अंग झाकते लाज . . .
तरि हळू हळू येते ही
संध्येची चाहूल देवा
लांबती उदासीन क्षितिजे
पाण्यात थांबल्या नावा . . .
देहास आठवे स्पर्श
तू दिला कोणत्या प्रहरी ?
की धुके दाटले होते
या दग्ध पुरातन शहरी . . .
सुख असे कळीतून फुलते
व्यापतो वृक्ष आभाळ ;
छायाच कशा दिसती मग
आपुल्यापरी खडकाळ ?
आटले सरोवर जेथे
का मोर लागतो नाचू ?
तू सोड उर्मिले आतां
डोळ्यांत बांधिला राघू . . .

No comments:

Post a Comment