Wednesday, October 15, 2014

लहानपण व आता



माझ्या लहानपणी किती गहन प्रश्न पडयाचे मला
किल्ला केव्हा करायचा
कुठून माती आणायची
आणि तो कुठे करायचा
आता
जाणवत ते प्रश्न खुपच होते सोपे
घर कुठे घ्यायच
कुठून पैसा आणायचा
स्क्वेअर फुटचा रेट किती

लहानपणी वाटायचं
कधी संपेल ही परीक्षा
करुन ठेवायचो हिशोब
किती दिवस, तास इतकचं काय किती मिनटं उरलीत
या परीक्षेतून सुटायला
आता
ना परीक्षेचे दुख ना सुटल्याचा आनंद
आयुष्यला देतो रोजचं परीक्षा

लहानपणी झोपायचो आगंणात चटई टाकुन
टोचणारा दगड काढून टाकण्यात सुध्दा मजा यायची
आकाशातले तारे मोजत किंवा
जाणार्‍या येणार्‍या गाड्याचा प्रकाश बघत
ओरडायचो 'सिनेमा सिनेमा' म्हणून
आता
अंगणात आता फरशी आहे
आणि दगड शोधण्याच पण सुख हारवलं
लक्षात पण नाही आकाशात तारे असतात
खरा बघतो सिनामा मस्त पैकी गादीवर लोळत
पण आनंदाचं काय?

लहानपणीही वाटायचं केव्हा मोठे होऊ
आज
वाटंत.
पण होणार काहिचं नाही
सगळेच ऋतू चांगले असतात आपण दुसर्‍या ऋतूत असताना


Tuesday, March 25, 2014

तू

     

असतेस तू नसतेस तू, असूनी इथे नसतेस तू 

त्या साजंवेळी नदीच्या किनारी, असूनी तिथे नसतेस तू 

पेल्यात तू मद्यात तू, पिऊनी तुला उरतेस तू 

विसरतो तुला विसरतो मला, विसरण्यात ही असतेस तू

सर्वस्व तू संदिग्ध तू, हरुनी पुन्हा जिंकतेस तू

तू प्रिये, ना प्रियकर मी, असूनीया प्रीत नसतेस तू 

जीवन तू, आयुष्य तू, सोडुनीया परी जातेस तू

असतेस तू नसतेस तू, असूनी इथे नसतेस तू