Sunday, January 31, 2010

चटका लावणारी खंमग संध्याकाळ

चटका लावणारी खंमग संध्याकाळ


रविवारचा दिवस, रात्री कुठ तरी बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. जवळ असण्यार्या सवाई ची निवड केली. या पुर्वी २,३ वेळा मी तिथ जाऊन आलो होतो. तिथल जेवण मला आवडल होत म्हणून परत जायच ठरवल.

जेवण सुरुवात झाली आम्ही दोन भाज्याची मागणी(order) केली. दहा मिनीटानी वेटर भाज्या पानात वाढुन गेला. भाज्या वाढुन गेल्यावर लक्षात आल आपण ऑर्डर केलेल्या या भाज्याच नाहीत. रोटी आणताना पण उशीर झाला. मग मात्र माझ डोक सरकल. मी मालकाना भेटायला कॉर्टरवर गेलो. झालेली परीस्थिती सांगितली. "पानात वाढलेली भाजी

टाकणे किंवा परत देणे आमच्या संस्कृती/संस्कारात बसत नाही म्हणुन भाजी खाल्ली"
त्याना त्याबद्द्ल खरच वाईट वाटल. मला sorry म्हणुन अस परत होणार नाही याची हमी दिली.
मी परत टेबलावर गेल्यावर वेटर टेबल जवळ येऊन "आईसक्रिम घ्याच" बराच वेळा नाही म्हणल्या नंतर आईसक्रिमची पण मागणी(order) दिली. आईसक्रिम complimentary असणार अस वाटल.

आईसक्रिम झाल्यावर बिल मागवल. तर वेटरनी सांगितल "आमच्या कडुन चुक झाली आज तुमच्या कडून बिल घेणार नाही". अरे बापरे. मी परत एकदा मालकाकडे गेलो."बिल घ्या. तुम्ही बिल घेतल नाही तर मला फार विचित्र वाटत(odd feel)"."ग्राहक जो पर्यत संतुष्ट होत नाही तोपर्यत त्याच्याकडून बिल घेणे आमच्या संस्कृती/संस्कारात बसत नाही" बरेच वेळा सांगुन सुध्दा त्यांनी बिल घेतल नाही. त्यांनी बिल न घेतल्यामुळ आम्ही परत त्याच्याकड जेवायला जायच ठरवल.

खरच असा अनुभव आजकालच्या जगात येणे आवघड आहे. पुर्वी मी सवाई मधून चांगल्या अन्नपदार्थची चव अनुभवली होतीच आज चांगल्या अनुभवाची चव चाखल्ली.

Thursday, January 28, 2010

कवी तुझे

देवा, तुझे किती, सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!

- ग. ह. पाटील

कवी तुझे
(ग.ह.पाटीलाची माफी मागुन, माझ्या सारख्या अनेक नवोदित कवींवरील कविता)
कवी तुझे किती | भंकस हे काव्य |
भंकस हे शब्द |मांडतोसी  ||१||

भंकस हा छंद| कल्पना भंकस |
ना जुळे यमक | हि त्याचे ||२||

भंकस हे काव्य| भंकस पुस्तक|
कोणी ही यास | विकत ना घई ||३||

चिडक्या बापाची| वात्रट ही मुले |
तसे काव्य असे | कवी तुझे || ४||

इतुके भंकस |काव्य तुझे जर |
किती तू भंकस |असशील || ५||

Wednesday, January 27, 2010

चहा पोहे

शिक्षकीपेक्षाची आवड असली तरी फार काळ मी शिक्षक म्हणून काम केले नाही. डि.एड. ला असताना १० दिवसे एक शाळा चालवावी लागते. आम्हाला आशीच एक शाळा मिळाली. मुख्याधापका पासुन ते शिपाया पर्यत सर्व कामे आम्हालाच करावी लागत. अर्थात "जवाबदारी"चे कामा माझ्या कडे आले. १० दिवसाचा हिशोब ठेवणे.


मला ६चा वर्ग शिकवायला आला पण हिशोबाच्या कामामुळे वर्गात जाणे जमत नव्ह्ते. पण एक दिवस वेळ काढुन वर्गावर गेलो. एक कविता शिकवायला सुरवात केली. कविता शिकवायला मला बिलकुल आवडत नव्हते. पण त्यादिवशी ती कविता मी २ तास (शाळेचे ३ तास) शिकवत होतो. शिक्षणशास्त्रात न बसणारी गोष्ट. पण मुलाना माझी पध्दत बहुदा आवडली.

शेवट्याच्या दिवशी एका विद्यार्थ्याने(शंकर) व विद्यार्थीने (कविता) चहा व पोहे खाण्यासाठी बोलाबले. एकटे कसे जायचे म्हणून आणखी एका शिक्षकमित्राला बरोबर घेतले. कविताच घर म्हणजे झोपडीच होती. घराबाहेरील बाजेवर आम्ही बसलो. १०-१५ मिनीटानी पोहे घेऊन कविता आली. पोह्यात पोहे व शेंगदाणे याच प्रमाण अगदी सारख होत. मला वाटल पुर्ण महिन्याचे शेंगदाणे तिने पोह्यात टाकले की काय? पोहे संपवून चहा पिण्यासाठी शंकरकडे जाणार होतो. शंकरच घर याहुन खराब असणार म्हणून घरी नेण्याऐवजी आम्हाला आहे तिथेच बसवणे त्याने पसंत केल. चहा येथेच घेऊन येतो अस म्हणत शंकर घरी निघुन गेला. ५ मिनीटात दोन कपबश्या घेऊन शंकर आला. चहा कपात तर पुर्ण भरला होताच पण बशीपण भरली होती. चहाचा पहिला घोट घेताच यात साखर दुप्पट टाकली आहे हे लक्षात आल. कसातरी तो चहा संपवला. दोघाच्या चेहर्यावरील आनंद लपता लपत नव्हता.

परत येताना माझा मित्र मला म्हणाला "तुला माझ्या पेक्षा कमी गोड चहा लागतो, शंकरचा चहा तर मला गोड लागत होता." त्याला म्हटला "बाबारे, पोह्यात जेवढे शेंगदाणे तेवढे पोहे चांगलेः चहात जेवढी साखर तेवढा चहा चांगला आशी समजुत असते. त्यांनी टाकलेली साखर व शेंगदाणे हे त्याचे महिन्याचे असतील. चहा पोह्याबरोबर त्यांनी दिलेल प्रेम जास्त महत्वाच आहे."

खरच आशे चहा पोहे मी आयुष्यात परत कधीच खाल्ले नाहीत.

Tuesday, January 26, 2010

आम्ही नाही तर तुम्ही पण नाही

मी ८-१० वर्षाचा असेन, मावशीच्या नविन घेतलेल्या निगडीच्या घरात ४,५ दिवस राहयला गेलो होतो. संध्याकाळी बिल्डीग मधील मुलांबरोबर खेळायचो. एक दिवस आम्हाला (मला आणि माझ्या लहान भावाला) खेळायला जायला उशीर झाला. खेळ आधीपासुन सुरु होते. आम्हाला पण खेळायला घेतील म्हणून आम्ही गेलो. उशीरा येण्यार्याना खेळात घेत नाही अस एका मुलीन आम्हाला सुनावल. "आम्हाला खेळायला घेत नाही म्हणजे काय?" असा विचार आम्हच्या दोघाच्या मनात आला. आम्ही परत येत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना (idea) आली. मी फलटणहुन "म्हातारीच्या शेंगा" आणल्या होत्या. त्या शेंगामध्ये ५०,६० "म्हातार्या" असतात. मी घरात जाऊन एक शेंग आणली. मी आणि माझा भाऊ ती मुल खेळत होती त्याच्या आसपास "म्हातार्या" उडवू लागलो. अपेक्षित परीणाम ५ मिनीटातच झाला. सर्व मुल खेळ सोडून "म्हातार्या" पकडायला लागले.

"आम्हाला खेळायला घेतले नाही ना मग तुमचा पण खेळ होऊ देणार नाही" Typical Marathi mentality (मराठी शब्द?????).

आज मात्र जाणवत आपण तस करायला नको होत.

Monday, January 25, 2010

माझे सांस्कृतीक जिवन 2

धुपद आठवडाः


ह्या आठवड्यात दोन वेगवेगळे कार्यक्रम होते. राजाभाऊ देव (गान रम्मया) स्मृती समारोह आणि धरोहर

राजाभाऊ देव (गान रम्मया) स्मृती समारोह

कार्यक्रमाची सुरवात शिवानी मारुलकर( अलका देव-मारुलकर यांची कन्या व राजाभाऊ देव यांची नात)यांनी नंद-कल्याण या जोड रागाने केली. हा राग या पुर्वी मी कधीच ऐकला नव्हता. त्यानंतर त्यानी कलिगडातील टुमरी गायली. त्या नंतर गुदेच्या बधूनी शंकरा राग सादर केला. आडाण्यातील शिवा शिवा या बंदिशेने शेवट करणार होते. पण लोकागरास्तव त्यांनी आणखि एक रचना सादर केली. पण ती रचना 'शिवा शिवा' पुढे थोडी dull वाटली

धरोहर

मालकंस संस्थेने आयोजित या कार्यक्रमात उदय भवाळकर यांनी धुपद सादर केले त्यांना सुखविदंरसिंग नामदारी यांनी साथ केली. सुखविदंरसिंग नामदारी यांनी धामा वाजवला. धामा हा पखवाजच्या अगदी जवळचे वाद्य. धामा या पुर्वी मी कधीच ऐकला नव्हता.

एकुणच कार्यक्र्म energetic होता.

उदयजीनी यमन (आलाफ, जोड, झाला) रागाने सुरवात केली. त्यानंतर त्यांनी आडाण्यातील शिवा शिवा या बंदिश गायली. मध्यतंरानंतर त्यांनी जोग (आलाफ, जोड, झाला) राग सादर केला. कार्यक्रमाचा शेवट "ब्रिज में होली" (बहुतेक कॉफी)रचनेने केला.

सुखविदंरसिंग नामदारी यांनी केलेली साथ अप्रतिम होती. "और कर्जा चढ गया" अस म्हटल तर वावग होणार नाही. कारण कार्यक्रमाच तिकीट आणि मिळालेला आनंद यात फारच तफावत होती.

कार्यक्रम energetic असल्यामुळे शेवटी शेवटी उदयजीच्या आवाजात थकवा जाणवत होता.

एकंदर कार्यक्रम अप्रतिम होता.

Friday, January 22, 2010

आमच्या काळात

गोष्ट बारा-पंधरा वर्षापुर्वीची, त्याकाळी प्रत्येकाकड फोन (भ्रमणध्वनी (मराठीत mobile)) सोडाच, पण प्रत्येकाच्या घरी फोन असणे म्हणजे श्रीमंतीच लक्षण मानल जायच. तुमचा फोन आलाय अस शेजारी सांगत यायचा(यायचे). फोन आलाय याचा अर्थ कोणीतरी अत्यवस्थ (मराठीत Serious) अस समजल जायच. त्यामुळे असे फोन घ्यायला फक्त मोठी माणसच जायची. आम्हा लहान मुलाना कधी फोनवर बोलायला मिळायचच नाही. मग मी आणि माझ्या ताईने एक दिवस एक शक्कल लढ़वलीः


त्याकाळी STD ISD बुथ पण फार नव्हते. फलटण मधे २,४ बुथ असतील

एका बुथमधे मी सकाळीच गेलो, माझा १० वाजता फोन येणार आहे. फोन घेण्याचे म्हणून ३.५० रु देईन. बुथवाल्याचा फायदाच होता. १० वाजता माझी ताई, दुसर्या बुथवर गेली, आणि या बुथचा नंबर लावला. मी फोन घेऊन बोलायला पण सुरवात केली. सवयी प्रमाणे ४०,४५ सेकंदात बोलण संपल. दोघानी ३.५० रु दिले. त्यावेळी फोनवर बोललेलो ४०,४५ सेकंदाची जी मज्जा होती ती आज कशातच नाही. उलट फोनवर बोलता येण कस टाळू शकतो हेच आजकाल मी पाहत असतो.

दलाईलामा "Paradox of Our Age" मधे म्हणतात तसं काहिस झाल आहे.

……

We built more computers to hold more information to produce more copies than ever, but have less communication……

From aamhimarathi


http://www.aamhimarathi.in/wp-content/uploads/blogger/x/blogger/8117/2809/1600/169914/image0151.jpg

Wednesday, January 20, 2010

thank you

वेळ रात्री एकची,स्थळ मुबई विमानतळच्या बाहेर. साडेबाराच विमान साडेबारालच आल. चेक आऊट पण लवकर झाल. दिड वाजता विमानतळच्या बाहेर. पिकउप करणार्या गाडीचा चालक (मराठीत Driver) शोधत आणि हातात मोठी bag घेऊन मी तिन/ चार फेर्या पण झाल्या पण तो काहि सापडला नाही. Driver ला साडेबारालाच येयला सांगितल होत. हा अजुन का आला नाही? माझ्या जवळ Driver चा फोन नव्हता. फोन होता पण computer वर. आता laptop काढुन त्यातुन नंबर शोधा, माझ्याकडील मोबाईल चार्ज नाही म्हणजे टेलीफोन बुथ शोधा. फारच चिडचिड झाली. तेवढ्यात हातात बोर्ड घेतलेला दुसरा Driver "पुण्याला येणार का?" " नाही" "चला कमी दरात नेतो" "नको". दुसर्या Driver ने माझी मानसिकता चांगलीच ओळखली होती. मी बाजुला जाऊन lapto काढला फोन नंबर शोधत असताना "साहेब येणर का पुण्याला?" परत तोच Driver "नाही रे बाबा". शेवटी एकदाचा फोन नंबर मिळाला. चला फोन करून बोलाबुन घेऊ. खिशात हात घातला 'अरे पाकीट कुठे गेले?' ' ओ नो, पाकिट मारल गेल' जवळपास बघितल तर तोच Driver माझ्याकड बघत होता. "काय झाल?" "बहुतेक माझ पाकिट मारल. मला फोन करुन Driver ला बोलवायच होत" मी म्हणालो "सांगा नंबर" Driver. मी नंबर सांगितला, त्याने फोन केला. तो फोन दुसर्या Driver कडे होता. त्याने नविन नंबर दिला. या Driver ने त्या नंबर वर परत फोन करुन "कुठे आहेस?" आम्ही कुठे उभे आहोत ते सांगितल. "तुमचा Driver पाच मिनीटात येतो आहे." "thank you". पण मनात मात्र येत होत. यानेच माझ पाकिट मारल असणार. पाच मिनिटात माझा Driver आला. फोन केल्याबद्द्ल द्यायला सुध्दा माझ्याकडे पैशे नव्हते. मी माझ्या Driver ला सांगुन ५० रुपये देऊ केले. पण त्या Driver ने घेतले नाही. मी गाडीत बसुन पुण्यात येत असताना. डोक्यात हाच विचारः त्या Driver ने पाकिट मारले. मग मदत केल्याच नाटक केल. मला पाकिट गेलाच दुःख जास्त नव्हत, पण फसवला गेलो याच मात्र जास्त होत.


दोन चार दिवस हाच विचार माझ्या मनात येत होता. आपण त्या Driver ला काहिच का म्हटलो नाही? लहानपणापासुनचे संस्कार का पुरावा नसताना अस बोलण बरोबर नाही. आणि अचानके एअर लाईन चा फोन "तुमच पाकिट विमानात पडल होत. आतील कागद पत्रावरुन हे पाकिट तुमच आहे. लवकरच ते तुमच्या पत्त्यावर पाठविल जाईल.

' ओ. माझ्य पाकिट माझ्या चुकीमुळे पडल होत आणि मी मात्र संशय्य एका चांगल्या माणसावर घेत होतो. मी त्यावेळी त्या Driver ला काहि बोललो असतो तर मी मलाच आयुषभर माफ करु शकलो नसतो.

संस्कारामुळे मी परत एकदा वाचलो. त्याला म्हणलेले thank you हे पण मनापासुन नव्हते. आज thank you म्हणायच तर कस? कुणाला?

बाजारातील पत

माझ्या लहानपणी घरी सायकल असणे म्हणजे श्रीमंतीच लक्षण. एखाद्याकड रेंजर सायकल म्हणजे श्रींमंतीचा कळस. माझ्याकड सायकल होती पण मोठी २२ इंची. माझी उंची पण २२ इंचीच होती, म्हणून छोटी सायकल भाङयाने आणून खेळणे हा सुट्टीतल एक उघोग. तासाला २० पैसे वगरै भाड.


एका सुट्टीत असच सायकल भाङयाने आणून खेळत होतो. एक तास पुर्ण वापरायच आणि मग सायकल द्यायची हा आमचा नेहमीचा उघोग. सायकल परत द्यायला गेल्यावर त्यांनी २५ पैसे मागितले माझ्याकड तर २० च पैसे. काय करु? "५ पैसे आणून देतो" "बर". मी १०-१५ मिनीटानी ५पैसे द्यायला परत त्याच दुकानात गेलो. दुकानदाराने एक क्षणभर माझ्याकडे बघितले. "कुणाचा रे तू?" मी माझ पुर्ण नाव व पत्ता सांगितला. "तु पैशे आणून नसते दिले तरच विशेष होत" त्या वाक्याचा माझ्या बालमनावर जो परीणाम झाला, कि आज पर्यत कुणाचे पैशे बुडवण्याचा विचार सुध्दा मनात आला नाही.

आपण आपली किमंत बाजारात मिळू शकोतो की नाही हा महत्वाचा प्रश्न आहेच पण असलेली किमंत टिकुन तरी टेवली पाहिजे.

Monday, January 18, 2010

आग्रहाच म्हणून घेतो

माझे लहानपण माझ्या घरी कमी आणि समोरच्या वाड्यात जास्त गेल. घरासमोर भिडे वाडा म्हणुन वाडा. ७-८ कुटुंब या वाड्यात भाङ्याने राहत होती. सर्वात लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका. वाड्यात राहण्या-या कुणाच्याही घरी जाणे, त्यांनी दिलेल्या वस्तू खाणे हा माझा रोजचाच कार्यक्रम होता. पण एक दिवस माझ्या आजीने मला विचारले "काय रे, आज पोहे खाऊन आलास का?" आणि मी घाबरलो आजीला कस कळलं मी पोहेच खाऊन आलो होतो? आजीला खुप वेळा विचारल्यावर आजीने सांगितले "मला नळातून ऐकू आले"

दुस-या दिवशी वाड्यात येतानाच नळ बंद करुन आलो. पण तरी पण आजीला कळायचे ते कळलच. आजीन मला जवळ घेऊन सांगितले "अस रोज दुस-याकडे खाणे बर नाही. आपण नाही म्हणावं. खुप आग्रह केला तरच घ्यावे" दुस-या दिवशी नेहमी प्रमाणे मला समोरच्या वाड्यातील इनामदारमामीनी खायला दिल. "कल्याण आज उप्पीट केल आहे. घे बर का" इनामदारमामी "नको" मी, "कारे काय झाल?" "आजी म्हणाली खुप आग्रह केला तरच घे नाहीतर नको म्हण" अपेक्षित वाक्याचा योग्य परिणाम झाला. मामी  "आग्रह म्हणून घे". मी म्हणालो "नक्की. आग्रह केला म्हणून घेतो."

हा प्रश्न मला अनेक वर्ष पडला होता की माझ्या आजीला मी कोणता पदार्थ खाल्ला हे कसं कळायचं? खुप वर्ष माझी आशी समजुत होती की नळातून आवाज जातो. त्याकाळी फक्त सकाळी व संध्याकाळी नळाला पाणी यायचं. आणि वाड्यात जाताना, मी कायम नळ बंद ठेवायचो. पुढे अनेक वर्षांनी कळाले की तो नळ म्हणजे आमच्या व समोरच्या वाड्यात काम करणा-या चंद्राबाई.

पुढ़े बरेच वर्ष मला आग्रहच म्हणुन खायला घातले. त्याकाळी पोहे, उप्पीट हेच विशेष होत. आज अनेक पदार्थ मिळतात पण ते आग्रहाचे नसतात.

निरा उजवा कालवाच पाणी

निरा उजवा कालवाच पाणी
मोठे लोकानी कर्हेचे पाणी, कृष्णाकाठ अशी पुस्तके लिहिली जर मला आत्मचरित्र लिहावस वाटलच तर मी काय नाव देईनी "निरा उजवा कालवाच पाणी".

कारण माझ गाव फलटण. या गावाशेजारुन हाच कालवा जातो. माझ लहानपण खरच सुखात गेल ( आत्ता दुःखात आहे का?).

Sunday, January 17, 2010

माझे सांस्कृतीक जिवन

परवाच Spicmacay Heritage 2010 ची रात्रभर चालण्यार्या मैफिलीला गेलो होतो. खरतर रात्रभर चालण्यारी एक पण मैफिल ऐकण्याचा योग आला नव्हता म्हणुन जरा जास्तच उत्सुकता.


कार्यक्रमाची सुरवात बिरजू महाराज आणि शाश्वती सेन यांनी केली. महाराजानी ताल सर्वत्र कसा आहे यांची सुंदर उदाहरणे दिली. फोनची वाजणारी घंटा, मित्रामधील संभाषण, आणि आशी कितीतरी उदाहरणे दिली. "ताल नसतो तिथे प्रलय असतो" हे वाक्यतर कायमच मनात घर करुन गेल. महाराजानी केलेल मयुर नृत्य व शाश्वतीनी केलेला आहिल्या अभिनय तर वाखाण्यासारखच होता.
यानंतर उदय भावाळकर(Uday Bhawalkar मराठी माणसाच नाव मराठीत लिहताना त्रासच होतो.) चंद्रक़ंस सादर केला. धुपद गायनातील अनेक बारकावे त्यांनी उलघडुन सांगितले. त्यानंतर त्यांनी शंकरा रागात आणखी एक रचना सादर केली. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी सुरताल रचनेने केला.
माणिक मुंडेनी केलेली पखवाजाची साथ खंरच छान होती. कधीकधी धुपदमध्ये स्वंत्र पखवाज वादनाची काही पखवाजवादकाना सवय असते. thank god मणिकजी तसे नाहित.


रात्रीचा जवळपास १ वाजत आला होता. नयन घोष यांनी वाचस्पती या रागाने सुरवात केली. खरतर गाईये गणपती अनेक वेळा ऐकल्याने त्या गाण्यासारख ऐकायला मिळेल अस वाटल.पण तंस काही झाल नाही. त्यामुळे राग थोडा बोर वाटला. पण नंतर वाजवलेली धुन खरच खुप छान होती. त्यांना तबल्याची साथ मुकेश जाधव यांनी केली.

जवळपास ३ च्यासुमारास आश्विनीताई भिडे-देशपांडे यांनी गाण्याची सुरवात केली. त्यांनी राग मालकंस यांनी सुरवात केली. मालकंसमधली पहिली बंदिश मला थोडी बोर वाटली. पण ताई म्हणल्या तसं रात्री तीन वाजता गायला बसणे हेच खरतर आवघड आहे. त्यानंतर त्यांनी हिदोल हा राग गायला. रात्रभर चालण्यार्या मैफिलीची देणगी अस म्ह्टल तर फारस वावंग होणर नाही, कारण हा राग live ऐकणे आता दुर्मिळ होत चालल आहे. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी भजनानी केला. सुयोग कुडलकर आणि रामदा पळसुले यांनी त्यांना साथ केली


सरवर हुसैन

खरतर सांरगी वादक दुर्मिळ होत चालले आहेत. सरवर हुसैन हे अशेच एक सारंगी वादक. "चांगल्या गोष्टी माझ्या गुरुच्या आणि वाईट गोष्टी माझ्या" हे त्याच्या वाक्यानी वादनाला सुरवात केली. त्यांनीही बंसत मुखारी हा live कमी ऐकायला मिळणारा राग वाजवला. त्यानंतर त्यांनी खमाज मधील वैषव जन हे प्रसिध्द भजन वाजवल.

एकदंर सर्वच मैफिली सुंदर झाल्या. कार्यक्रमाचे नियोजन पण फारच सुरेख होते. तरुणवर्गाचा मिळणारा प्रतिसाद (मी म्हातारा झालो कि काय?) बघता शास्त्रीय संगिताला मरण नाही. Spicmacay च्या सर्वच कार्यकर्ताचे मनापासुन आभार

For more details of concerts:

http://spicmacay.com/events/tentative-schedule-heritage-2010

माझे सांस्कृतीक जिवन

नमस्कार


मी कल्याण. बरेच दिवस पासून दररोज काहीतरी लिहाव अस वाटत होत आज योग आला दररोज काही लिहता येईलच याची खात्री नाही पण प्रयत्न जरुर करणार आहे.

पुण्यात राहात असल्यामुळे संस्कृती/गायन/चित्रपट यावर अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार अगधी जन्मापासुन आहेच. त्याच अधिकाराचा वापर मी या blog वर करणार आहे.

वाचकानी(मिळालेतर) हि लेखकाची वैयक्तिक मते म्हणुन सोडुन देण्यायेवजी आपले मत मांडावे.
शुध्द्लेखणाच्या चुका वाचकाणी मणावर घेऊ णयेत.