Monday, January 18, 2010

आग्रहाच म्हणून घेतो

माझे लहानपण माझ्या घरी कमी आणि समोरच्या वाड्यात जास्त गेल. घरासमोर भिडे वाडा म्हणुन वाडा. ७-८ कुटुंब या वाड्यात भाङ्याने राहत होती. सर्वात लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका. वाड्यात राहण्या-या कुणाच्याही घरी जाणे, त्यांनी दिलेल्या वस्तू खाणे हा माझा रोजचाच कार्यक्रम होता. पण एक दिवस माझ्या आजीने मला विचारले "काय रे, आज पोहे खाऊन आलास का?" आणि मी घाबरलो आजीला कस कळलं मी पोहेच खाऊन आलो होतो? आजीला खुप वेळा विचारल्यावर आजीने सांगितले "मला नळातून ऐकू आले"

दुस-या दिवशी वाड्यात येतानाच नळ बंद करुन आलो. पण तरी पण आजीला कळायचे ते कळलच. आजीन मला जवळ घेऊन सांगितले "अस रोज दुस-याकडे खाणे बर नाही. आपण नाही म्हणावं. खुप आग्रह केला तरच घ्यावे" दुस-या दिवशी नेहमी प्रमाणे मला समोरच्या वाड्यातील इनामदारमामीनी खायला दिल. "कल्याण आज उप्पीट केल आहे. घे बर का" इनामदारमामी "नको" मी, "कारे काय झाल?" "आजी म्हणाली खुप आग्रह केला तरच घे नाहीतर नको म्हण" अपेक्षित वाक्याचा योग्य परिणाम झाला. मामी  "आग्रह म्हणून घे". मी म्हणालो "नक्की. आग्रह केला म्हणून घेतो."

हा प्रश्न मला अनेक वर्ष पडला होता की माझ्या आजीला मी कोणता पदार्थ खाल्ला हे कसं कळायचं? खुप वर्ष माझी आशी समजुत होती की नळातून आवाज जातो. त्याकाळी फक्त सकाळी व संध्याकाळी नळाला पाणी यायचं. आणि वाड्यात जाताना, मी कायम नळ बंद ठेवायचो. पुढे अनेक वर्षांनी कळाले की तो नळ म्हणजे आमच्या व समोरच्या वाड्यात काम करणा-या चंद्राबाई.

पुढ़े बरेच वर्ष मला आग्रहच म्हणुन खायला घातले. त्याकाळी पोहे, उप्पीट हेच विशेष होत. आज अनेक पदार्थ मिळतात पण ते आग्रहाचे नसतात.

1 comment:

  1. sagle posts mast aahet. Khar tar aaplya aayushya rojach ase vag vegale prasang ghadat astat je aaplyala vegala vichar karayla lavtat. Tumhi ha blog suru karun ani tyat dusare kahi taknyapeksha swthache anubhav takun ek changale kam kele ahe. Jyane tumachya aathavanina pan ujala milat rahil ani aamhalahi kahi chnagale vachayala/shikayala milel.

    All the Best Kalyan!!!!

    ReplyDelete