Sunday, January 17, 2010

माझे सांस्कृतीक जिवन

परवाच Spicmacay Heritage 2010 ची रात्रभर चालण्यार्या मैफिलीला गेलो होतो. खरतर रात्रभर चालण्यारी एक पण मैफिल ऐकण्याचा योग आला नव्हता म्हणुन जरा जास्तच उत्सुकता.


कार्यक्रमाची सुरवात बिरजू महाराज आणि शाश्वती सेन यांनी केली. महाराजानी ताल सर्वत्र कसा आहे यांची सुंदर उदाहरणे दिली. फोनची वाजणारी घंटा, मित्रामधील संभाषण, आणि आशी कितीतरी उदाहरणे दिली. "ताल नसतो तिथे प्रलय असतो" हे वाक्यतर कायमच मनात घर करुन गेल. महाराजानी केलेल मयुर नृत्य व शाश्वतीनी केलेला आहिल्या अभिनय तर वाखाण्यासारखच होता.
यानंतर उदय भावाळकर(Uday Bhawalkar मराठी माणसाच नाव मराठीत लिहताना त्रासच होतो.) चंद्रक़ंस सादर केला. धुपद गायनातील अनेक बारकावे त्यांनी उलघडुन सांगितले. त्यानंतर त्यांनी शंकरा रागात आणखी एक रचना सादर केली. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी सुरताल रचनेने केला.
माणिक मुंडेनी केलेली पखवाजाची साथ खंरच छान होती. कधीकधी धुपदमध्ये स्वंत्र पखवाज वादनाची काही पखवाजवादकाना सवय असते. thank god मणिकजी तसे नाहित.


रात्रीचा जवळपास १ वाजत आला होता. नयन घोष यांनी वाचस्पती या रागाने सुरवात केली. खरतर गाईये गणपती अनेक वेळा ऐकल्याने त्या गाण्यासारख ऐकायला मिळेल अस वाटल.पण तंस काही झाल नाही. त्यामुळे राग थोडा बोर वाटला. पण नंतर वाजवलेली धुन खरच खुप छान होती. त्यांना तबल्याची साथ मुकेश जाधव यांनी केली.

जवळपास ३ च्यासुमारास आश्विनीताई भिडे-देशपांडे यांनी गाण्याची सुरवात केली. त्यांनी राग मालकंस यांनी सुरवात केली. मालकंसमधली पहिली बंदिश मला थोडी बोर वाटली. पण ताई म्हणल्या तसं रात्री तीन वाजता गायला बसणे हेच खरतर आवघड आहे. त्यानंतर त्यांनी हिदोल हा राग गायला. रात्रभर चालण्यार्या मैफिलीची देणगी अस म्ह्टल तर फारस वावंग होणर नाही, कारण हा राग live ऐकणे आता दुर्मिळ होत चालल आहे. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी भजनानी केला. सुयोग कुडलकर आणि रामदा पळसुले यांनी त्यांना साथ केली


सरवर हुसैन

खरतर सांरगी वादक दुर्मिळ होत चालले आहेत. सरवर हुसैन हे अशेच एक सारंगी वादक. "चांगल्या गोष्टी माझ्या गुरुच्या आणि वाईट गोष्टी माझ्या" हे त्याच्या वाक्यानी वादनाला सुरवात केली. त्यांनीही बंसत मुखारी हा live कमी ऐकायला मिळणारा राग वाजवला. त्यानंतर त्यांनी खमाज मधील वैषव जन हे प्रसिध्द भजन वाजवल.

एकदंर सर्वच मैफिली सुंदर झाल्या. कार्यक्रमाचे नियोजन पण फारच सुरेख होते. तरुणवर्गाचा मिळणारा प्रतिसाद (मी म्हातारा झालो कि काय?) बघता शास्त्रीय संगिताला मरण नाही. Spicmacay च्या सर्वच कार्यकर्ताचे मनापासुन आभार

For more details of concerts:

http://spicmacay.com/events/tentative-schedule-heritage-2010

1 comment: