Thursday, January 28, 2010

कवी तुझे

देवा, तुझे किती, सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!

- ग. ह. पाटील

कवी तुझे
(ग.ह.पाटीलाची माफी मागुन, माझ्या सारख्या अनेक नवोदित कवींवरील कविता)
कवी तुझे किती | भंकस हे काव्य |
भंकस हे शब्द |मांडतोसी  ||१||

भंकस हा छंद| कल्पना भंकस |
ना जुळे यमक | हि त्याचे ||२||

भंकस हे काव्य| भंकस पुस्तक|
कोणी ही यास | विकत ना घई ||३||

चिडक्या बापाची| वात्रट ही मुले |
तसे काव्य असे | कवी तुझे || ४||

इतुके भंकस |काव्य तुझे जर |
किती तू भंकस |असशील || ५||

1 comment: