Wednesday, January 27, 2010

चहा पोहे

शिक्षकीपेक्षाची आवड असली तरी फार काळ मी शिक्षक म्हणून काम केले नाही. डि.एड. ला असताना १० दिवसे एक शाळा चालवावी लागते. आम्हाला आशीच एक शाळा मिळाली. मुख्याधापका पासुन ते शिपाया पर्यत सर्व कामे आम्हालाच करावी लागत. अर्थात "जवाबदारी"चे कामा माझ्या कडे आले. १० दिवसाचा हिशोब ठेवणे.


मला ६चा वर्ग शिकवायला आला पण हिशोबाच्या कामामुळे वर्गात जाणे जमत नव्ह्ते. पण एक दिवस वेळ काढुन वर्गावर गेलो. एक कविता शिकवायला सुरवात केली. कविता शिकवायला मला बिलकुल आवडत नव्हते. पण त्यादिवशी ती कविता मी २ तास (शाळेचे ३ तास) शिकवत होतो. शिक्षणशास्त्रात न बसणारी गोष्ट. पण मुलाना माझी पध्दत बहुदा आवडली.

शेवट्याच्या दिवशी एका विद्यार्थ्याने(शंकर) व विद्यार्थीने (कविता) चहा व पोहे खाण्यासाठी बोलाबले. एकटे कसे जायचे म्हणून आणखी एका शिक्षकमित्राला बरोबर घेतले. कविताच घर म्हणजे झोपडीच होती. घराबाहेरील बाजेवर आम्ही बसलो. १०-१५ मिनीटानी पोहे घेऊन कविता आली. पोह्यात पोहे व शेंगदाणे याच प्रमाण अगदी सारख होत. मला वाटल पुर्ण महिन्याचे शेंगदाणे तिने पोह्यात टाकले की काय? पोहे संपवून चहा पिण्यासाठी शंकरकडे जाणार होतो. शंकरच घर याहुन खराब असणार म्हणून घरी नेण्याऐवजी आम्हाला आहे तिथेच बसवणे त्याने पसंत केल. चहा येथेच घेऊन येतो अस म्हणत शंकर घरी निघुन गेला. ५ मिनीटात दोन कपबश्या घेऊन शंकर आला. चहा कपात तर पुर्ण भरला होताच पण बशीपण भरली होती. चहाचा पहिला घोट घेताच यात साखर दुप्पट टाकली आहे हे लक्षात आल. कसातरी तो चहा संपवला. दोघाच्या चेहर्यावरील आनंद लपता लपत नव्हता.

परत येताना माझा मित्र मला म्हणाला "तुला माझ्या पेक्षा कमी गोड चहा लागतो, शंकरचा चहा तर मला गोड लागत होता." त्याला म्हटला "बाबारे, पोह्यात जेवढे शेंगदाणे तेवढे पोहे चांगलेः चहात जेवढी साखर तेवढा चहा चांगला आशी समजुत असते. त्यांनी टाकलेली साखर व शेंगदाणे हे त्याचे महिन्याचे असतील. चहा पोह्याबरोबर त्यांनी दिलेल प्रेम जास्त महत्वाच आहे."

खरच आशे चहा पोहे मी आयुष्यात परत कधीच खाल्ले नाहीत.

No comments:

Post a Comment