Friday, February 8, 2019

शून्य


मी लहान होतो त्या वेळेस
माझ्या आईने विचारला प्रश्न मला एक
एका झाडावर पक्षी पाच
एक मारला बंदुकीने उरले किती सांग
मी माझी लहानशी बोटे आणि त्याहून ही लहानस डोक्यांनी
खूप वेळ विचार करुन
तिला म्हणालो उत्तर आहे चार
तिने मला हसतच जवळ घेतले
बाळ जगात सगळ्याच वजाबाक्या पाच वजा एक चार होत नाहीत
काही वेळेस पाच वजा एक पाचच असते
तर काही वेळेस पाच वजा एक शून्य

आज तू गेल्यावर मला जाणवत
काही वेळेस पाच वजा एक पाचच  तर काही वेळेस पाच वजा एक .....

मूळ पंजाबी कवी अज्ञात
स्वैर भाषांतर : कल्याण