Friday, July 9, 2010

एक दिवसचा वारकरी

गेले तीन चार वर्ष मी आणी माझे काही मित्र ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी बरोबर पुणे ते दिवेघाट जवळ जवळ २६ कि.मी. जातो. पहिल्या वर्षी आम्ही दिवे घाट पायथ्या पर्यंत गेलो आणि तेथुन कानिफनाथाचा डोंगर चढलो थोडासा त्रासदायकच होत पण आम्ही ते अंतर चढुन जाऊ शकलो.


२५,२६ किमी नुसत चालण खंरच खुप आवघड आहे. पण या चार वर्षातील अनुभवावरुन नक्कीच म्हणता येईल की माऊलीच्या बरोबर चाललो म्हणजे त्रास कमी होतो. अनेक वयोवृध्द वारकरी टाळ मृंदुगाच्या तालावर नाचताना बघितल की आपण तरुण (त्याच्यापेक्षा) असुन सुध्दा आपण काय करतो!

आज पण मनात एक सुप्त (सुप्त कसली???) इच्छा आहे की पुर्ण वारी चालत करायची बघू माऊलीच्या मनात काय आहेते?

काल माझ्या बरोबर माझा एक दक्षिणेकडील (मराठीत south Indian) मित्र होता, त्याने मला विचारले "what do you mean by "maaULI"?" खंरतर फारच आवघड प्रश्न होता, मी म्हणालो "maaULi means mother" दुस-या मित्रान आणखीन व्याख्या चांगली करत “Beloved mother who take care of children”. "माऊली" या शब्दाचा अर्थ समजुन सांगण खरच खुप आवघड आहे पण समजुन घेणे तितकच सोप.
                                
                                       विट्टल तात्या


                                                                  पुरुषोत्तम जतकर

ओटीवरती विट्टल तात्या टाळ कुटीत बसत असतं
कसं काय विट्टल तात्या म्हणता फक्त हसत असत
गळ्यामध्ये तुळशीमाळा कपाळाला नाम टिळा
अन् हसता हसता मध्येच एकदम मिचकवित एक डोळा
तसे त्यांच्यात पाप नव्हत जीवन अगदी निष्पाप होते
ओठवरचे खुले हास्य ते ही अगदी अमाप होते
सुखासाठी तात्या कधी ओटी सोडून गेले नाहीत
दुःखाचे डोंगर आले पण तात्या त्याला भ्यायले नाहीत
वारक-याला पहाताच क्षणी तात्या त्याच्या पाया पडत
खंर म्हणजे त्याच्यां वाचून त्यांचे काहीच नव्हते अडत
पण तो एक त्याचा भाव होता अंतरीचा ठाव होता
कारण पंढरीच्या वाटेवरच तात्यांचा गाव होता
पंढरीची पायी वारी नियम कधी मोडला नाही
भुकेलेल्या वारक-यास अन्नवाचुन सोडला नाही
एकदा त्यांनी पानामधलीच भिका-याला भाकर दिली
अन् उरली भुक पाणी पिऊन तेवढ्यावरच ढेकर दिली
तात्या आता वृध्द झाले हात पाय अगदीच थकले
पंढरीची वारी चुकेल म्हणून त्यांना आता दुःख झाले
आषाढीचा सोहळा आता तात्यांच्याच घरी भरतो
अन् पांडुरंग दिंडी घेऊन त्यांच्याच घरी वारी करतो