Saturday, January 15, 2022

चित्रपट Trial by Fire (2018)

 Trial by Fire (2018)

कॅमेराॅनाला {Cameron} (तापट डोक्याचा माणूस) त्यांच्या घराला लागलेल्या आगीमुळे जाग येते. प्रयत्न करूनसुध्दा त्याला आपल्या तीन मुलांचा प्राण वाचवता येत नाही.

प्रथम निकषात जाणवत की घरात पेट्रोल टाकलेल होत तसेच फ्रीज मुद्दामून दाराजवळ ठेवलेला होता. कॅमेराॅनाला संशयावरून अटक करण्यात येते.

कोर्ट केस दरम्यान त्याचा सह कैदी सांगतो, कॅमेराॅनाने त्याला सांगितले होते की त्यानेच आग लावली. कॅमेराॅनाच्या बायकोच्या साक्षीतील काही वेचक भाग व सह कैद्याची साक्ष यावरून कॅमेराॅनाला मृत्युदंड दिला जातो.

कॅमेराॅनाने आपल्याच पोटच्या पोरांचा बळी दिला आहे अस वाटल्यामुळे त्यांच्याबद्दल कुणाचेच मत चांगले नसते.

मृत्यूदंडची वाट पाहत असताना त्याचे व पोलिस तसेच इतर कैद्याबरोबर खटके उडतात. त्यामुळे त्याला एकांताची शिक्षा दिली जाते. त्या वेळेस तो आपला भूतकाळ आठवत बसतो. शिक्षेतून वाचण्याकरिता तो अनेक खटाटोपही करतो पण व्यर्थ.

त्याच वेळेस त्यांची ओळख होते, ग्रिलबर्ट {Gilbert} या स्त्री लेखिकेशी. ती घरच्या विरोधाला पत्करून कॅमेराॅनाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करते. अनेक साक्षीदारांना भेटून ती सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यात तिला लक्षात येते कॅमेराॅन निरपराध आहे.

मृत्युदंडासाठी थोडेच दिवस राहिले असताना ग्रिलबर्टचा अपघात होतो.

ती अपघातातून वाचते का? ती निरपराध कॅमेराॅनाला वाचवू शकते का? हे चित्रपटातच पहावे.

नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट. चित्रपटातील संवाद फारच सुरेख आहेत. अभिनय मस्त.

मॅटरसनच्या ("Bat" Masterson) एका वाक्याचा फारच सुंदर उपयोग या चित्रपटात केला आहे. "We all get the same amount of ice. The rich get it in the summer. The poor get it in the winter.” — Bat Masterson

© कल्याण जोशी

No comments:

Post a Comment