Friday, January 21, 2022

चित्रपट Richard Jewell


Richard Jewell 
 

Richard Jewell नावावरून या चित्रपटात बघण्यासारखा असेल का? असा प्रश्न मला पडला होता. पण तो चुकीचा होता हे संपूर्ण चित्रपट बघितल्यावर लक्षात आले.

चित्रपटाचा नायक(?) रिचर्ड(Richard Jewell) हा एका छोट्या विधी संस्थेत कारकून म्हणून काम करत असतो. वॅटसन (Watson Bryant) या वकिलाबरोबर त्यांची चांगली मैत्री होती. संरक्षण दलात काम करण्यासाठी तो नोकरी सोडतो. 

थोडे दिवस पोलिसात काम करतो पण त्याला काढून टाकण्यात येत. त्यानंतर काॅलेजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पण तिथून सुध्दा त्याला काढण्यात येत. कारण एकच असते, अती नियम पाळणे व पाळायला लावणे.

यानंतर तो  सेंटेनियल बागेत  (Centennial Park) सुरक्षा रक्षक म्हणून काम सुरू करतो. पण एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्याला एक बेवारशी पिशवी सापडते. नीट पाहिल्यानंतर त्यात बाॅम्ब असल्याच निष्पन्न होत. गर्दी बाजूला केली जाते. त्यानंतर बाॅम्बचा स्फोट होतो. त्यामुळे होणारी प्रचंड जिवित हानी कमी होते. 

या सर्व प्रकरणात रिचर्डला नायक ठरवून अनेक ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात. फेबीआयला (FBI) वाटत बाॅम्ब ठेवायचे व दाखवायचे काम रिचर्डनेच केले आहे. आतापर्यंत नायक असणारा रिचर्ड प्रसारमाध्यम त्याला खलनायक म्हणून दाखवायला सुरुवात करतात.

या वेळी रिचर्डचा मित्र व वकील वॅटसन मदतीसाठी धावून येतो. रिचर्डला अटक होते का? तो ही लढाई कशी लढतो? हे सर्व चित्रपटातच पाहणे उत्तम होईल.

चित्रपटात रिचर्डचे काम करणारा पॉल वॉल्टर हॉसर यांनी सुरेख अभिनय केला आहे. या कामाची तुलना मला मराठीतील दादांशी करावीशी वाटते. चित्रपटाच्या कथानकाला कुठे ही तिखट मीठ लावले नाही. प्रसारमाध्यम, समाज या सर्वांवर जळजळीत प्रहार करताना कुठेही चित्रपट स्वातंत्र्य घेतलेले नाही.

क्लिंट ईस्टवूड (Clint Eastwood) यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. क्लिंट ईस्टवूड हे म्हणजे नव्वदीत असणारे भीष्मपितामहच आहेत. यांनी दिग्दर्शित केलेले जुन्या चित्रपटापेक्षा मला सध्याचे चित्रपट  जास्त आवडतात. सुली (Sully), अमेरिकन  स्नायपर (American Sniper) ही काही नावे. अतिशय परिपक्व व साधेपणाने केलेली मांडणी हे यांच्या चित्रपटांचे  वैशिष्ट्य.

नक्कीच बघण्यासारखा चित्रपट

No comments:

Post a Comment