Monday, March 8, 2010

रंगपंचमी

परवा रंगपंचमी झाली. सोसायटीतील लोकांनी साजरी पण केली. ४००,५०० रुपयाचा रंग हि असेल. पण ती मज्जा नाही आली जी पुर्वी येत असे. ४,५ रुपायाचा रंग असे पण मज्जा ४,५ लाखाची असायची?

माझी आजी नेहमी म्हणायची "माझी मुल हिच माझी दैवत" आणि खंरच आजीनं मुलाची (माझ्या वडीलाची, आत्याची) खुप काळजी घेतली आणि केली पण. तसच त्याच्यावर चांगले संस्कार होतील याच्यावर पण लक्ष्य ठेवले.

रंगपंचमी वरून आठवल. माझ्या वडीलाच्या लहानपणी आजी रंगपंचमीसाठी गरम पाणी करुन द्यायची. आज रंग खेळण्यासाठी "गरम पाणी" वाचुन थोडस हासू पण येईल पण आजीचा दृष्टीकोन फारच सरळ होता. "गार पाण्यामुळे मुलाना काही त्रास होऊ नये.  मुल आजारी पडू नये"

यापुढे जाऊन हि आणखी एक गंमत म्हणजे, हे गरम पाणी माझे वडील किंवा आत्या इतर मुलाच्या आंगावर उडवत आणि ती मुल मात्र यांच्या आंगावर गार पाणी उडवत. आजी म्हणायची माझी मुल काय आणि इतराची काय त्रास कोणालाही होऊ नये.

हेच संस्कार आजही जपायचे प्रयत्न करतो आहे. दुसरा आपल्यावर गारपाणी उडवत असला तरी आपण गरमपाणी उडवायच.

1 comment:

  1. This is really true Kalyan, though you call me Sir, actually you have taught me many new things in computer & any time I called you for solution you are always ready to answer.

    Satish Pandit

    ReplyDelete