Thursday, August 9, 2018

ती

तिला पाहतो मी आज अचानक अवेळी
अशी होय सांज आज सकाळी सकाळी
असा बोलतो मी कधी तिच्याशी तिच्याशी
की बोलतो मी माझ्या मनाशी मनाशी
असा स्पर्श सोनेरी तिचा जसा मोरपंखी
श्रावणाची भुल ही या तळपत्या वैशाखी
तिची चाहूल उघडी, मम मनाचे कवाडे
तिच्याच साठी मी गायले किती पवाडे
आलिंगे, ती निर्लज मौत, मजला सर्वासमोरी
म्हणती लोक, होता कवी, गेला आज देवाघरी
तिला पाहतो मी आज अचानक अवेळी

अशी होय साज आज सकाळी सकाळी

No comments:

Post a Comment