Monday, June 14, 2010

मत्सर

आज बरेच दिवसातून परत काही तरी लिहावस वाटल.


मागच्या महिन्यात मी घराच्या मंडळींबरोबर सहलीला (trip)गेलो होतो. पुर्ण सहली बद्दल लिहावस वाटत होत. पण जमलच नाही. म्हणुन काही किस्सेः

मला कायम दक्षिणेकडील राज्याच्या परिवहन मंडळाबाबत (मराठीत S.T.)  हेवा (हेवा कसला मत्सरच) वाटायचा. किती कमी पैशात किती चांगली सेवा! आमच्या प्रवासात आम्ही श्रीशैलम् वरुन विजयवाडाला आंन्ध्रच्या S.T ने प्रवास केला. आम्हाला बसायला जागा होती आणि बस पण रिकामीच होती. हळूहळू बस भरत गेली. आणि अनेकजण उभे पण राहिले. माझ्या शेजारी एक स्त्री, तिची मुलगी आणि मुलगा आशे उभे होते. अचानक मुलगा खिडकी कडे धावला. लहानपणी मला पण गाडी लागायची, त्यामुळे पुढे काय होणार हे माझ्या लगेच लक्षात आल. पण मुलगा काही खिडकी पर्यत जाऊ शकला नाही. त्यांन उलटी करुन गाडी घाण केली.

त्या बाईन स्वःताच्या bag तुन एक त्या मुलाचा एक शर्ट काढला. सर्व घाण स्वच्छ केली. आणि तो शर्ट खिडकीतुन टाकून दिला.

त्यावेळी मी जर महाराष्ट्रात असतो तर काय झाल असत हाच विचार करत होतो.

आपणच केलेली घाण आपणच स्वच्छ करायला पाहिजे?!. हे प्रवासी, चालक वाहक आणि शासनकर्ते या सर्वानाच लगू होत असाव?!.

1 comment:

  1. अगदी बरोबर आहे बघ निरीक्षण ...
    मला जवळपास तीन वर्ष पूर्ण झालीत आता बेंगलोर मध्ये.
    माझा अनुभव कर्नाटकाबाबत अगदी हाच आहे.
    कमी पैशात उत्तम सेवा, इतकंच नाही तर भरपूर बसेस आणि साधी बस ते एसी बस म्हणजे रु. ८ ते रु. ५० पर्यंतची तिकिटे.
    कंडक्टर नावाच्या इसमाला प्रवाश्यांसाठी थांबा नसताना गाडी थांबवताना मी फक्त इथेच पाहिलंय. ( तेही प्रवाश्यांनी हात न दाखवता; नुसता प्रवासी कडेला उभा आहे हे पाहून !)
    कधी कधी प्रवास करताना अस वाटत कि आपल्या एस.टी. च्या मान्यवरांनी एकदा इकडे येऊन व्यवस्थापन शिकायलाच हव.
    राहिलं स्वच्छतेबाबत तर, तुझे मत निर्विवाद योग्य आहे बघ ...

    ReplyDelete