Thursday, June 24, 2010

जुनं ते सोनं

मला कायमच वाटत आपण फक्त जुनं ते सोनं असच म्हणत बसतो. माझ्यात पण हा दोष (का? गुण) आहे.


परवा एका वाहिनीवरुन (मराठीत channel) दुसरीकडं जाताना चुकुन दुरदर्शन लागल. कार्यक्रम होता चित्रहार. आणि मी परत माझ्या लहानपण्यातल्या टि.व्ही. कार्यक्रमात गेलो. चित्रहार मोजुन तिन गाणी, रंगोली रविवारी लवकर उठायच नसताना लवकर उठवणारा कार्यक्रम. चित्रगित मराठी गाण्याचा कार्यक्रम.

किती सुरेख होत जग! आज २४ तास गाण्याचे अनेक channels. पण एक तरी channel आपण अर्धातास बघतो का? संध्याकांळी कार्यक्रम सुरु होतानाचा दुरदर्शनचा लोगो. काय मस्त संगीत होत ते!

सुरभी, करमचंद, तहकिकात, गुल गुलशन गुलफाम, बुनियाद, रामायण,जंगलबुक कितीतरी नाव आजही पटकन सांगता येतात. पण सहा महिन्यापुर्वी संपलेल्या मालिकेच नाव आठवायला २ मिनिट लागतात.

मला पुर्वीचे कार्यक्रम तर सोडाच पण जहिराती पण आवडायच्या. "हमारा बजाज", "और मेरे लिये? पानपराग.", "निरमा", "कैलास जिवन" आणि आश्या कितीतरी आणि आज????????

फलटणला रामाचा रथ देवदिवाळीला निघतो. रथ ठेवायची जागा माझ्या घरापासुन जवळ असल्याने आम्हाला त्याचा अभिमान असायचा. गावात लाईटच वायंरीग रस्त्याच्या कडेने असायच. त्यामुळे रथ यायच्या वेळी लाईट बंद केली जायची. चुकुन रथ शनिवारी किंवा रविवारी आला तर मग चित्रपट चालू असताना लाईट जायची. किती मनस्ताप होयचा त्यावेळी. आज एकाच वेळीस अनेक सिनेमे बघतो, पण एकपण पुर्ण नाही.

मी माझ्या मुलाला नक्की सांगु शकेन "माझ्या लहानपणी टि.व्ही.वर काय कार्यक्रम असायचे! पण तो त्याच्या मुलांना काय सांगेल????"

शेवटी वपू म्हणतात तसं "आठवणी कुठल्या का असेनात त्या वाईटच. सुखाच्या असतील तर त्या वेळी असलेले सुख म्हणून दुःख, किंवा दुःखाच्या असतील तर ते भोगलेले दुःख"

No comments:

Post a Comment