"माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे." -ग्रेस
Thursday, February 25, 2021
ग्रेस
Wednesday, February 17, 2021
मजकूर-मंथन
मराठी विश्वकोश मंडळाने माझ्याकडून Text Mining वर मराठीत लेख मागितला होता. Text Mining ला 'मराठीत काय म्हणतात?' इथपासून माझी सुरुवात.
'मजकूर-मंथन' असा नवीन शब्द तयार करून हा लेख लिहायला सुरुवात केली. या लेखामध्ये असे अनेक नवीन शब्द तयार करण्याचा प्रयत्न केला. कमीतकमी तांत्रिक शब्दांचा वापर करून लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आज तो लेख प्रसिद्ध झाला.
मजकूर-मंथन (Text Mining) https://marathivishwakosh.org/48314/
हा लेख वाचा. आपल्याला कसा वाटतो? ते नक्की सांगा.
सदर लेखासाठी अनेकांनी समीक्षक म्हणून काम केले त्यांचे मनापासून आभार.
लेखातील काही शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी सांगितलेल्या आहेत.
Saturday, January 30, 2021
इलाही जमादार
अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा ||
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा ||
नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा ||
का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! ||
काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा ||
भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा ||
दारात ती उभी अन्, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा ||
माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही"
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा ||
इलाही जमादार
Sunday, May 31, 2020
Wednesday, November 20, 2019
Thursday, July 11, 2019
समारोप
नमस्कार
गेले १८ दिवस मी संताचे अभंग तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. यावर्षी हे कितपत जमते या बाबत थोडासा साशंक होतो. पण हे व्रत पूर्ण करून घेतलं गेले. हे अभंग वाचून बर्याच जणांनी मला प्रतिक्रिया/सूचना (सार्वजनिक अथवा वैयक्तिक)दिल्या. त्यातील जेवढ्या सूचनांचा समावेश करण शक्य होतं त्याचा समावेश केला.फाँन्ट चांगला असूनसुद्धा नीट वाचता येत नसल्याचे बर्याच जणांनी मला सांगितले. प्रत्येक दिवसादिवशी माऊलींची पालखी कुठून निघाली? कुठे मुक्काम आहे? यांची ही माहिती टाकावी अशी सूचना केली गेली. ती लगेच आमलात आणली.यावर्षी मनात नवविधा भक्तीचे अभंग सादर करावेत असं वाटत होते. निवडलेला अभंग हा अनेक भक्ती प्रकाराचे मिश्रण असू शकतो. तरी ही माझ्या अल्पबुद्धीने त्यांना नऊ भक्तीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे.१) श्रवण भक्ती : दिवस ५ संत नामदेव
२) कीर्तन भक्ती : दिवस ११ संत तुकाराम, दिवस १६ संत एकनाथ
३) स्मरण भक्ती : दिवस १ संत गोरा कुंभार, दिवस ३ संत चोखामेळा, दिवस १५ संत जनाबाई
४) वंदन भक्ती : दिवस २ संत सावतामाळी, दिवस ७ संत ज्ञानेश्वर, दिवस १४ संत सेना महाराज५) अर्चन भक्ती : दिवस ८ संत मुक्ताबाई, दिवस १० संत एकनाथ
६) पादसंवाहन भक्ती : दिवस ६ संत निव्र्तीनाथ,
७) दास्य भक्ती : दिवस ९ संत कान्होपात्रा, दिवस १२ संत बहेणाबाई
८) सख्य भक्ती : दिवस ४ संत जनाबाई
९) आत्मनिवेदन भक्ती : दिवस १३ संत सोयराबाई
आपल्या पुढील वर्षीच्या अभंग दिंडीसाठी काही सूचना असतील तर नक्की कळवा.
या वर्षीचे सर्व अभंग एकत्र केले आहेत. त्यांची लिंक
https://drive.google.com/file/d/1mc-Uy6TcUYyD1Bses6f7o6B_QZu8AbMU/view?usp=sharing
मागील वर्षीचे अभंग दिंडी
https://drive.google.com/file/d/1U1b7h74UCCCCPHAL6unENkVgXd4efDsI/view?usp=sharing
कल्याण
9423260836


