नमस्कार
गेले १८ दिवस मी संताचे अभंग तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. यावर्षी हे कितपत जमते या बाबत थोडासा साशंक होतो. पण हे व्रत पूर्ण करून घेतलं गेले. हे अभंग वाचून बर्याच जणांनी मला प्रतिक्रिया/सूचना (सार्वजनिक अथवा वैयक्तिक)दिल्या. त्यातील जेवढ्या सूचनांचा समावेश करण शक्य होतं त्याचा समावेश केला.फाँन्ट चांगला असूनसुद्धा नीट वाचता येत नसल्याचे बर्याच जणांनी मला सांगितले. प्रत्येक दिवसादिवशी माऊलींची पालखी कुठून निघाली? कुठे मुक्काम आहे? यांची ही माहिती टाकावी अशी सूचना केली गेली. ती लगेच आमलात आणली.यावर्षी मनात नवविधा भक्तीचे अभंग सादर करावेत असं वाटत होते. निवडलेला अभंग हा अनेक भक्ती प्रकाराचे मिश्रण असू शकतो. तरी ही माझ्या अल्पबुद्धीने त्यांना नऊ भक्तीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे.१) श्रवण भक्ती : दिवस ५ संत नामदेव
२) कीर्तन भक्ती : दिवस ११ संत तुकाराम, दिवस १६ संत एकनाथ
३) स्मरण भक्ती : दिवस १ संत गोरा कुंभार, दिवस ३ संत चोखामेळा, दिवस १५ संत जनाबाई
४) वंदन भक्ती : दिवस २ संत सावतामाळी, दिवस ७ संत ज्ञानेश्वर, दिवस १४ संत सेना महाराज५) अर्चन भक्ती : दिवस ८ संत मुक्ताबाई, दिवस १० संत एकनाथ
६) पादसंवाहन भक्ती : दिवस ६ संत निव्र्तीनाथ,
७) दास्य भक्ती : दिवस ९ संत कान्होपात्रा, दिवस १२ संत बहेणाबाई
८) सख्य भक्ती : दिवस ४ संत जनाबाई
९) आत्मनिवेदन भक्ती : दिवस १३ संत सोयराबाई
आपल्या पुढील वर्षीच्या अभंग दिंडीसाठी काही सूचना असतील तर नक्की कळवा.
या वर्षीचे सर्व अभंग एकत्र केले आहेत. त्यांची लिंक
https://drive.google.com/file/d/1mc-Uy6TcUYyD1Bses6f7o6B_QZu8AbMU/view?usp=sharing
मागील वर्षीचे अभंग दिंडी
https://drive.google.com/file/d/1U1b7h74UCCCCPHAL6unENkVgXd4efDsI/view?usp=sharing
कल्याण
9423260836
No comments:
Post a Comment