Wednesday, June 22, 2011

फक्त सलामच


मागच्या आठ्यवड्यात सहजच विकीची पानं चाळत होतो. अचानक 'राजीव दीक्षित' या पानावर थांबलो.
खरं तर ८,९ वर्षापूर्वी पासुन मी या नावाशी परिचित. 'आझादी बचाव' असो किंवा स्वदेशी वस्तूचा आगह असो.
या ना त्या कारणाने त्यांच्या बद्दल ऐकलं होतं. एका ओळखीच्या व्यक्तीन मला त्यांचा आझादी बचाव हा ध्वनीमुद्रीकांचा संच(मराठीत cassette set) दिला. बस्स. अप्रतिम हा एकच शब्द दुसरा शब्दचं नाही.
कळत नकळत त्या माणसाचा मी भक्तच झालो. दिवस, वर्ष जात गेली. मी माझ्या कामात व्यग्र(व्यस्त नाही) होत गेलो.

परवा विकीच्या पानावर त्यांच्या नावची लिंक मिळाली. मला धक्काच बसला. 'राजीव दीक्षित' जन्म ३०-११-१९६७ आणि मृत्यू ३०-११-२०१०.

मला माहितच नव्हत की राजीवजीचा मृत्यू झाला आहे. मला १०,१५ मिनट काही सुचेना. मला आशी बातमी वाचलेली पण आठवेना. त्यानंतर मी माझ्या परीचयाच्या वेगवेगळ्या वयातील ३५ लोकांना विचारल "तुम्हाला 'राजीव दीक्षित' नावाची व्यक्ती माहित आहे का?"  २६ लोकं हो म्हणाले. त्या २६ लोकांना विचारलं "ते गेले हे तुम्हाला माहित आहे का?"  फक्त ३ जण "हो" म्हणाले. त्यांना ओळखण्या-यापैकी १२% लोकांनाच त्यांच्या मृत्यूबद्दल माहित होतं. हे काय??????

वर्तमानप्रत्र शांत का बसली? त्याचे अनेक सहकारी शांत का बसले? यावेळी कुणीच आदोलंन का केलं नाही? या प्रश्नाची उत्तर माझ्याकडं नाहित.
मला माहित असतं: सलमानचा नविन चित्रपट कोणता येणार आहे? एका जहिरातीसाठी धोनी किती पैशे घेतो? शाहरुखच्या बंगल्याचे नाव काय आहे? किंवा यासारख्या अनेक गोष्टी ज्यांचा मला काही उपगोग नाही. पण माहित आहेत.
काल सकाळमध्ये 'माकड आणि माकडीच्या लग्नाबद्दल बातमी होती' अश्या अनेक वृत्तपत्राना या बातमी पेक्षा 'राजीव दीक्षित' यांच्या मृत्य़ुची बातमी कमी महत्वाची वाटली!
दोष सगळ्याचाच आहे.
राजीव दीक्षित किंवा जे.डी. आशी अनेक उदाहरण आहेत. त्या सर्वाना सलाम या कवितेतून.

फक्त सलामच


ऐकून वाईट वाटलं आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत
पण या शिवाय मी अजुन काय करु शकतो
हा, जर असतास फेसबुकवर तर तुझ्या स्टेंटसला केल असतं लाईक
लाठ्या खातानाच्या फोटोवर टाकली असती कॉमेंट
“केवढ हे कौर्य!”
पण बस्स या पेक्षा जास्तची अपेक्षा करू नकोस
माझ जीवन अडकलं आहे त्याच त्याच गोष्टीत
तोच बॉस, तेच appraisal तेच तेच आणि तेच तेच
पण जेव्हा भरतो हप्ता तेव्हा कळतं काम करण्याच कारण
पण तुझ तसं नाही, हे विश्वची माझे घर
कधी वाटतं झोकुन द्याव तुझ्याबरोबर
पण पण
तुझं appraisal करती सामान्य जनता
थोडी जरी चुक झाली तरी बरसतात शिव्या
आता मला सवय झालीय
खोट्या नाटकी वागण्याची
तुझ्या सारखं खरं वागण जमणार नाही रे मला
ते तुला अनेक गोष्टी द्यायला तयार आहेत 
देतील तुला थोडे पैसे शांत बसण्याचे
पण मला माहीत आहे तू ते घेणार नाहीस
मग देतील तुला विष
स्वस्त आहेरे ते, शोधाव लागतील
तुझ्या सहका-याचे हात जे कालवतील तुझ्या जेवणात
पण काळजी करू नकोस सोपं फार ते
पैसे टाकल्यावर माणसं डोक्यांनी जास्त आणि मनानं कमी विचार करतात
किंवा शोधावी लागेल एखादी गोळी
जी जाईल तुझ्या शरीराच्या आरपार
थोडे पैसे दिल्यावर सापडेल बंदूक चालवणारा
निवड तुला करायची आहे
गोळी का पोळी, पुरणाची पोळी
पण मला माहीत आहे तू निवडलीस भाकर
तुझ काहीही होऊ शकणार नाही
मी फक्त करू शकतो सलाम
सलाम तुला
सलाम तुझ्या लढ्याला
आणि सलाम तुझ्या मरणाला

5 comments:

  1. Thanks Nilesh for quick response.

    ReplyDelete
  2. salam mazya mitrala jo itaka chan lihato pan ani janiv tari thevto kay chalala aahe hyachi ,

    ReplyDelete
  3. @Girish ya veles janiv yeyala 8 mahine gele. so sad.

    ReplyDelete
  4. Even I got the news from your blog only. Sad to hear that :(

    Keep up the blogging!

    ReplyDelete